आरोग्याची गुरुकिल्ली
आहार, विहार आणि व्यायाम ही उत्तम आरोग्यासाठी ची त्रिसूत्र
सकस आणि पोषणमूल्य देणारा आहार, मोकळ्या हवेत चालणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे , पुरेसा व्यायाम करणे हे उत्तम आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे.
🏋️व्यायामचे महत्व🏋️
चांगले आरोग्य ठेवण्यासाठी किवा चांगले शरीर ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. व्यायाम ही एक अशी निर्मिती आहे जी आपल्या शरीराला आकार द्यायचं काम करते. नियमित व्यायाम करणे हा निरोगी जीवन जगण्याचा एक महत्वाचा घटक आहे.
व्यायामाचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर असंख्य असे चांगले फायदे होतात.
नियमित व्यायाम केल्याने शारीरिक हालचालींमद्धे तंदूरस्ती राहते, हृदय व रक्तवाहिन्याचे आरोग्य वाढते, शारीरिक ऊर्जा वाढते आणि शरीराचे वजन निरोगी राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग यासारख्या विविध रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा व्यवस्थापित करण्यात व्यायाम महत्त्वपूर्ण आहे. शारीरिक फायद्यांव्यतिरिक्त,
😇व्यायामाचे मानसिक फायदे 😇
व्यायामाचे मानसिक फायदे देखील आहेत. व्यायाम केल्याने फील गुड नावाचे हार्मोन्स तयार होतात जे चिंता कमी करण्यास, तणाव कमी करण्यास , जीवनाचा सामना करण्यास मदत करतात.
आपण नियमित व्यायाम केल्याने आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो, चांगल्या कार्याला प्रोत्साहन मिळते.
नियमित व्यायमाचे फायदे स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी, लवचिकता येते .मानसिक आरोग्य आणि मानसिक संतुलन वाढवण्यासाठी आणि एकूण शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.
चालणे, धावणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम हृदय , हृदयविकार व रक्तवाहिन्यासंबंधी क्रिया असलेले , किंवा वेटलिफ्टिंग, योगासने असो, असा प्रत्येक व्यायाम प्रकार शरीराच्या विविध भागांना अधिक फायदे पोहचवण्याचे काम करतो.
🏃🏃 व्यायाम म्हणजे काय?🏃🏃
व्यायाम म्हणजे काय तर संपूर्ण आरोग्य किंवा शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी केलेली शरीराची हालचाल म्हणजेच व्यायाम होय. ज्यामध्ये जॉगिंग, पोहणे, सायकलिंग किंवा हालचालींचा समावेश असतो यामुळे आपल्याला फिट राहण्यास मदत होते, स्नायूंना मजबूत आणि बळकट करणे,अश्या क्रियेला आपण व्यायाम म्हणू शकतो.
🤸🤸 व्यायामाचे फायदे 🤸🤸
आपल्याला सर्वांना माहितीच आहे की व्यायाम केल्याने आपल्या शरीराला किती फायदे होतात प्रामुख्याने व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यासाठी फायदे मिळतात. वाढते वजन , हृदयरोग, म़धुमेह, असे बरेच आजार दूर राहतात आणि चांगल्या त्वचेसाठी नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.
🧘🧘व्यायामाचे प्रमुख फायदे🧘🧘
Benefits of एक्सरसाइज
वजन नियंत्रित राहन्यास मदत
नियमित व्यायाम केल्याने वजन नियंत्रित रहण्यास मदत होते. निरोगी शरीराचे वजन योग्य ठेवण्यासाठी व्यायाम अतिशय मुख्य भूमिका बाजवतो. व्यायामाने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. व्यायाम केल्याने शरीरातातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. संतुलित आहारासोबतच व्यायाम हे वजन कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. यासाठी तुम्ही घरातली रोजची काम स्वतः करू शकतात. लिफ्टच्या ऐवजी तुम्ही जिना चढ उतार करू शकतात. सकाळी किवा संध्याकाळच्या वेळेला बाहेर जाऊन काही वेळासाठी पायी चालू शकतात.
हृदय व रक्तवाहिन्यासंबधितचे आरोग्य सुधारेल आपल्या शरीरात वाढलेला रक्तप्रवाह शरीरात ऑक्सीजन ची पातळी वाढवत असतो, ज्यामुळे कोरोनरी धमनी रोग उच्च कोलेस्ट्रॉल, आणि हृदयविकारचा झटका ह्या रोगांची शक्यता असते. ऐरोबिक व्यायाम जसे की पोहणे, धावणे किवा मग सायकल चालवणे हे सर्व व्यायाम हृदयाला बळकट करतात आणि यामुळे रक्त पंप होण्याची क्षमता वाढते. नियमितपणे व्यायाम केल्याने रक्तदाब कमी होतो, सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित रहण्यास मदत मिळते. शरीरातील रक्ताभिसरण सुधरून हृदय मजबूत बनते.
🧘🧘 Benefits of एक्सरसाइज🧘🧘
हाडे आणि स्नायू बळकट होतात
स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम, जसे की वेटलिफ्टिंग किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग, स्नायू तयार आणि मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे शारीरिक शक्ती वाढते, सोबतच स्नायूंची सहनशक्ती सुधारते आणि एकूण शारीरिक कार्यक्षमता वाढते. नियमितप्रमाणे व्यायाम केल्यास स्नायूंचे सामर्थ्य वाढवण्यास मदत होते. शरीराला बळकटपणा ही येतो. जुन्या आजारांचा धोका कमी नियमित व्यायाम केल्याने उच्च रक्तदाब आणि मधुमेह यसारख्या रोगांना नियत्रित करता येते.
🥰🥰 मानसिक आरोग्य व मनस्थिती
सुधारण्यास मदत-🥰🥰
व्यायामाचा आपल्या मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होतो. हे एंडोर्फिन सोडण्यास उत्तेजित करते, जे नैसर्गिक मूड बूस्टर आहेत आणि कॉर्टिसोल सारख्या तणाव संप्रेरकांची पातळी कमी करते. नियमित व्यायामामुळे नैराश्याची लक्षणे दूर होण्यास, चिंता कमी करण्यास, संज्ञानात्मक कार्य सुधारण्यास आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते व्यायामातून आपल्याला तणवातून मुक्तता मिळते.
😴😴 चांगली झोप येणे😴😴
व्यायाम केल्याने शरीरास आधिक चालना मिळते. शारीरिक हालचालीमुळे झोपेची पद्धत सुधारते. नियमितप्रमाणे व्यायाम केल्यास लवकर झोप येते.
त्याचप्रमाणे शांत आणि खोल झोप येते. आरोग्यातील झोपेची गुणवत्ता सुधारते. जर तुम्ही इनसोम्नियाने त्रासले असणार तर शारीरिक हालचालीमुळे तुम्ही ते सावरू शकतात.
🚵🚵 ऊर्जा पातळी वाढते🚵🚵
जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर आपली भूक वाढ होते आणि अश्या मध्ये जर तुम्ही स्वताला काही पोषक अन्न खायला दिले तर तुमची ऊर्जा वाढेल. नियमित व्यायाम केल्याने ऊर्जा पातळी वाढते व थकवा कमी जाणवतो. शरीराची आक्सिजन आणि पोषकता वाढते म्हणजेच चैतन्य वाढवते व थकवा कमी करते.
👩💻👩💻 मेंदूचे आरोग्य👩💻👩💻
व्यायाम हा मेंदूच्या कार्याशी आणि तुमच्या सकारात्मक क्षमतेशी जोडला गेलेला आहे. याने तुम्हाला स्मरणशक्ती,एकाग्रता आणि मानसिक आरोग्य स्थिरावते.
*
👴👵 दीर्घायुष्य👵👴
नियमित व्यायाम केल्याने जुन्या आजारांचा धोका कमी होतो व दीर्घायुष्य लाभते. नियमित केलेल्या शारीरिक हालचालीमुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठ पन्ना ह्या विकारांपासून मुक्ति मिळते व आरोग्य लाभते
👩🧒 त्वचा टवटवीत होते 🧒👩
नियमित व्यायाम केल्याने ब्लड फ्लो म्हणजेच रक्तभिसरण चांगले राहते आणि यामुळे तव्चेला ऑक्सीजन आणि न्यूट्रिएंट्स मिळतो व त्वचा अधिक सुधारते तसेच शरीराच्या चयपचयच्या गतीमध्ये सुधारणा होते.
🕺💃शरीरातील चरबीचे व्यवस्थापन होते🕺💃
नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी किंवा Fat loss होण्यात मदत होऊन आपण आणखी उत्साही आणि हलके होऊ शकतो.
अतिरिक्त चरीबीमुळे सुद्धा अनेक आजारांचा सामना करावा लागतो, गुड्गेदुखी,सांधेदुखी,यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. साहजिक आहे, योग्यरीतीने व्यायाम केल्याने गुड्गेदुखी, सांधेदुखी यासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
आपण व्यायामामध्ये लेग, शोल्डर अश्या सर्व प्रकारच्या व्यायामाचा समावेश करत असल्याने आपले स्नायू हे बळकट झालेले असतात.
💪व्यायाम केल्याने शरीर हे निरोगी
आणि बांधेसूद बनते💪
व्यायाम केल्याने शरीर हे निरोगी आणि बांधेसुद बनते. तुमच्या शरीराची बनावट ही एक खेळाडू सारखी होते. ज्याने तुम्ही पटकन उठू बसू शकतात आणि आपले कामे करू शकतात. व्यायाम केल्याने कोणतेही कार्य पटकन होते, स्र्फुती मिळते, आत्मविशावस वाढतो.
🏋️🧘🏃 नियमित प्रमाणे व्यायम केल्यास
कोलेस्ट्रॉल कमी होतो 🏃🧘🏋️
नियमित व्यायामाने शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी होण्यास मदत होते व तुम्ही आणखी ताजेतवाने असता.
व्यायामाने दिवसभर आळस सुद्धा येत नाही व्यायाम केल्याने दिवासभराचा थकवा आणि आळस हा नाहीसा होतो. दिवसभर आपण ऊर्जावाण असतो.
व्यायामामुळे रोगप्रतिकार शक्ति वाढते व्यायामामुळे रोगप्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते, जेणेकरून आपण नको नको त्या आजारांपासून लांब असतो. एखादी जखम, आजार असल्यास लवकर बरा होण्यास मदत होते.
व्यायामामुळे नैराश्य दुरावते
🤗आपले आरोग्य आपल्या हाती🤗🤗🤗🤗
0 टिप्पण्या