जिजाऊ भाषण
ना वाकायचे ना झुकायचे
अन्यायावर पलटून वार करायचे
सन्मानाने जगायचे आणि
सन्मानानेच मरायचे.....
अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती .
सर्वप्रथम सर्वांना राजमाता जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला.
जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते.
शहाजीराजे भोसले यांच्या जिजा बाईंचा विवाह झाला.
जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाचे परंपरा जिजाबाईंच्या ठायी होती.
रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते.
राजमाता जिजाऊ यांनी पुत्र शिवबाला लहानपणापासून शौर्याच्या, पराक्रमाच्या कथा सांगुन घडविले.
राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मनातील स्वराज्याचे भगवे निशाण उभारले. राजमाता जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे स्वतःचा विचार न करता छत्रपती शिवाजी महाराज इतरांच्या कल्याणासाठी जगले व धर्मासाठी लढले .
अंगणातील तुळस
गोठ्यातील गाय
आणि घरातील माय
यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही .
असे राजमाता जिजाऊ यांनी स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना ठणकावून सांगितले.
स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः तलवार हती घेतली.
राजमाता जिजाऊ या शूर ,चाणाक्ष व युद्धनीती मध्ये कुशल होत्या.
शिवबांना ही त्यानी युद्धनीतीचे शिक्षण दिले होते.
जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. जिजाबाईंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले.
जिजाबाईंनी आपल्या कर्तुत्वाने असामान्य इतिहास घडविला. राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल सांगावे तेवढे थोडेच
अशा आदर्श राजमाता जिजाऊंचे 17 जून १६७४ रोजी निधन झाले .
पण त्यांनी महाराष्ट्राच्या कणाकणात व मनामनात जगविलेला स्वाभिमान आजही कायम आहे.
जिजाऊंच्या कार्य व इतिहास आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
एवढे बोलून मी ते थांबते
जय जिजाऊ,
जय शिवराय,
जय महाराष्ट्र,
धन्यवाद🙏
0 टिप्पण्या