पायांची निगा
फक्त 10 दिवसात पायांच्या
भेगा नाहीशा करण्यासाठी
उपाय :-
बदलत्या ऋतूनुसार पायांना भेगा पडतात.
चेहऱ्याइतके लक्ष आपण आपल्या पायांकडे देत नाही. पायांना भेगा पडल्यास बऱ्याच वेदना सहन कराव्या लागतात. शिवाय पायाचे सौंदर्यही लुप्त होते. पायाला भेगा पडायला लागल्या की त्या भरून येण्यास वेळ लागतो. तसेच या भेगा जर खोलवर गेल्या तर त्यातून रक्त यायला लागते, पायांच्या भेगा कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरीदेखील काही उपाय करू शकता.
१) पिकलेल्या केळ्यांनी फाटलेल्या टाचांचा इलाज हा सर्वात स्वस्त आणि उपायकारक उपाय आहे. केळ्यामध्ये असणारे मॉयश्चराइजर पायांना कोमल ठेवतात.
२) भेगा पडलेल्या ठिकाणी रात्री ग्लिसरिन लावून पायमोजे घालून ठेवावेत.
सकाळी गार पाण्याने पाय धुवावेत.
३) आंघोळीच्या आधी कोमट पाण्यात व्हिनेगर घालून त्या पाण्यात पाय बुडवून ठेवावेत.
४) लिंबू पायाला स्वच्छ आणि भेगा भरण्यास मदत करते एक लिंबू कापून तळपायांना घासा हि कृती आठवड्यातून दोन वेळा करा.
५) कोमट पाण्यात एक कप मीठ (Salt) टाकून त्यामध्ये तळपायाचा भाग भिजू घाला याने सुद्धा फायदा होतो.
६) गुलाब जल, लिंबू रस आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन हे मिश्रण फाटलेल्या भेगांवर लावा. हे मिश्रण रात्रीचे लावून, पायमोजे घालून झोपा.असे केल्यास थोड्याच दिवसात आपल्या आराम मिळेल.
७) तिळाच्या तेलामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते.तिळाचे तेल जखम बरी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
८) कडूलिंबाचा पाला कुटून, रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.
९) जर पावलांना खोल भेगा पडल्या असतील, तर रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत, व त्यानंतर भेगांना वितळलेले मेण लावावे. मेणामुळे खोल भेगा लवकर भरून येण्यास मदत मिळते.
१०) चंदन उगाळून लेप लावल्यासही भेगा कमी होतात.
११) ग्लिसरिन, गुलाबपाणी, लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश केल्यास भेगा कमी होतात.
१२) हळदीमध्ये कोमट तेल टाकून ते मिश्रण भेगांमध्ये भरल्यासही हा त्रास कमी होतो.
१३) भेगा पडू नयेत, यासाठी आंघोळ करताना रोज पायांचे तळवे प्युमिक स्टोनने घासावेत.
१४)आठवड्यातून एकदा बदाम आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश करावे.
१५) पायांना पडणाऱ्या भेगा भरून येण्याकरिता सर्वात उत्तम पर्याय म्हणजे पेट्रोलियम जेली. हा उपाय करण्याकरिता रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून घेऊन कोरडे करून घ्या आणि त्यानंतर पावलांना पेट्रोलियम जेली लावा.
१६) पायांवर कोमट खोबरेल तेलाने मालिश करा घरातही चप्पल वापरावी. बाहेर पडताना तळपायाचा मातीशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. या सर्व उपायांनी पायांचे सौंदर्य जपणे सहज शक्य आहे.
0 टिप्पण्या