💗💪 रक्तवाहिन्या💪💗
रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कमजोर होतात?
हे संकट टाळायचं
तर खा ४ पदार्थ, रक्तप्रवाह राहील सुरळीत
मानवी शरीर हे रक्तवाहिन्या आणि धमन्यांच्या एका जटील मार्गाने तयार झाले आहे.
मानवी शरीराचे कार्य नसांद्वारे वाहणाऱ्या रक्तातून होते, रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचतात.
त्यामुळे नसा योग्यरित्या कार्य करणे गरजेचं आहे.
या नसा शरीरातील इतर अवयवांना पोषक घटक, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रोलाइट्स पुरवतात.
शिरा कमकुवत झाल्यामुळे, व्हेरिकोज व्हेन्स, डीप व्हेन थ्रोम्बोफ्लिबिटिस, शिरासंबंधी व्रण, आर्टिरिओव्हेनस फिस्टुला यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.
त्यामुळे नसांमध्ये मजबूती असणं गरजेचं आहे.
नसा नेहमी मजबूत आणि योग्यरित्या कार्य करावे असे वाटत असेल तर, नियमित ४ पदार्थ आवर्जून खा
🌿🌿हिरव्या पालेभाज्या 🍃☘️:
यूएसवेंस क्लिनिकच्या मते, 'हिरव्या पालेभाज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे नसांमध्ये सूज निर्माण होत नाही. आपण हिरव्या पालेभाज्यांमध्ये फ्लॉवर, कोबी, स्ट्रॉबेरी, अननस, मेथी, पालक, द्राक्ष, संत्री, भोपळी मिरची इत्यादींचे सेवन करू शकता.
🥥🌾सुकामेवा आणि बिया🌾🥥 :
बदाम आणि इतर प्रकारच्या सीड्समध्ये पॉलीसॅच्युरेटेड फॅट्स आणि व्हिटॅमिन ई असते. नसा मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आहारात सुकामेवा आणि इतर बियांचा नक्कीच समावेश करा. काजू, सीड्स, एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, भोपळा, आंबा यासह इतर पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई पुरेशा प्रमाणात आढळते.
☘️☘️ग्रीन-टी☘️☘️ :
ग्रीन टीमध्ये फ्लेव्होनॉइड कंपाउंड जास्त प्रमाणात आढळतात. फ्लेव्होनॉइड्स रक्तवाहिन्या मजबूत करण्यास मदत करतात. यासाठी आपण आपल्या आहारात बेरी, सफरचंदाची साल, ग्रीन टी, मोसंबी इत्यादींचा समावेश करू शकता.
🥛🌧️भरपूर पाणी प्या🥛🌧️ :
नसा मजबूत करण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. यामुळे शिरांमधील द्रवांचे संतुलन राखले जाते.
0 टिप्पण्या