☘️तुळस ☘️ तुळशीच्या पानांचे एक-दोन नाहीत तर आहेत अनेक आरोग्यदायी फायदे
🥶 थंडीतल्या त्रासापासून संरक्षण -
रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्यावर सर्दी, खोकला, घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
❤️हृदयाचे आरोग्य राखणे -
रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो त्यामुळे हृदय नेहमी सुरक्षित राहते.
🧘पोटाच्या समस्या दूर होतील -
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, पोटाची सूजही कमी होते तसेच अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, आंबट ढेकर यांसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
🤭दुर्गंधीपासून मुक्त होणे. -
श्वासात दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने नियमित घ्या. यामध्ये आढळणारे गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाची दुर्गंधी कमी करतात.
😊त्वचेचीसाठी फायदेशीर -
तुळशीच्या पानांमध्ये आढळणारे अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म त्वचेत खोलवर जाऊन ते स्वच्छ करतात.
0 टिप्पण्या