🏃🌄 मॉर्निंग वॉक🌄🏃
मॉर्निंग वॉकची सवय निरोगी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. फिट शरीर, लठ्ठपणा आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी अनेक जण मॉर्निंग वॉक हा व्यायाम प्रकार निवडतात. सर्व वयोगटांतील लोकांमध्ये सध्या मॉर्निंग वॉकचा ट्रेण्ड अंगवळणी पडला आहे. काही जणांना एक दिवस वॉकला गेले नाही तर दिवसभर कशातही मन लागत नाही. या वॉकमुळे अनेक आजारांपासून दूर राहता येते. जर तुम्ही वेगाने चालत असाल तर हा एक उत्तम कार्डिओ व्यायामदेखील होऊ शकतो. असे केल्याने शरीर केवळ टोनच राहत नाही तर दिवसभर फ्रेशही वाटते.
१) चालताना वेग वाढवा...
तुम्ही तुमच्या चालण्याचा वेग जितका वाढवाल तितक्या वेगाने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होऊ लागतात. यामुळे तुमचे वजनही कमी होऊ लागते. त्यामुळे दररोज आणखी काही वेळ वॉक करण्याचा प्रयत्न करा.
२) थोडे वजन कॅरी करा...
जर तुम्ही तुमच्यासोबत काही वजन कॅरी करून चालत असाल तर त्याचा अधिक लवकर फायदा होतो. यासाठी तुम्ही वेटेड वेस्ट, वेटेड एंकल बॅण्ड इत्यादी घालून चालू शकता.
३) चढणावर चाला...
जर तुम्ही चढणीवर चालत असाल तर ते तुमच्या पायांच्या आणि शरीराच्या स्नायूंना अधिक फायदेशीर मानले जाते, यामुळे स्नायूंची जोड अधिक घट्ट होते. यासाठी ट्रेडमिलवर चढाच्या वळणाचा वापर करा आणि चालत जा.
४) पोश्चरची काळजी घ्या...
जेव्हा तुम्ही चालत असाल तेव्हा तुमच्या शरीराच्या पोश्चरची विशेष काळजी घेतली पाहिजे. नेहमी समोर बघत चालले पाहिजे, या वेळी पोटाचे स्नायू घट्ट ठेवत लांब पावलं टाका.
५) दररोज पावलांची संख्या वाढवा...
दररोज कालपेक्षा अधिक पावले चालण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही ट्रॅकर वापरा आणि काउंटिंगकडे लक्ष द्या!
0 टिप्पण्या