🐍नागपंचमी🐍 नागपंचमी माहिती महत्त्व कारणे ;
श्रावन महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला.
भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात .
या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाहीत. घरी पण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही हे नियम पाळत असतात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लायाचा नैवेद्य दाखवतात .गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना केली जाते.
नागपंचमी माहिती मराठी
नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये. तळू नये चुलीवर तवा ठेवू नये, वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणूनही शेतामध्ये नांगर चालवू नये असेही म्हटले जाते.
श्रावणातील बहुतेक सणांना इतिहास आहे. आणि तो इतिहास कथांच्या स्वरूपात पिढ्यां पिढ्या पुढे पोहोचविला जातो. नागपंचमीच्या बाबतीत सुद्धा अशीच एक कथा प्रचलित आहे .ती आपण पाहू.
एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते त्या शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकऱ्यांकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेला किल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकऱ्या विषयी सुडाची आग धगधगू लागली.
एके दिवशी तिने शेतकऱ्याचा सूड घ्यायचे ठरविले रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागिन शेतकऱ्यांसह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली .दुसऱ्या दिवशी नागिन पुन्हा शेतकऱ्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागिनीला पाहताच शेतकऱ्याच्या मुलीने नागीनी समोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली.
शेतकऱ्याच्या मुलीचे श्रद्धा पाहून नागिन तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिनी ने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमीला नागाचे विविध पूजन केले जाते.
नागपंचमीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या विविध कृती व त्या करण्यामागची कारणे
नागपंचमीचे महत्व मराठीत
दुधाला चंद्राचे प्रतीक मानले जाते. भगवान शंकराच्या कपाळावर चंद्र विराजमान आहे. चंद्र हा मनाचा ग्रह आहे. मनात भगवान शंकराची भक्ती म्हणून नागपंचमीला नागाला दूध अर्पण करतात. नागाला शंकर देव यांचा सेवकही म्हटले जाते. नाग भगवान शंकराच्या गळ्यात विराजमान आहे असं मानलं जातं की नाग पृथ्वीला संतुलित करतात.
त्यामुळे नाग पूजनाला पुरानात महत्त्व आहे.
नागपंचमी उपवासाचे महत्त्व
पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता .सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्नग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतर आयुष्य व अनेक आयुधाची प्राप्ती होवो, आणि तो प्रत्येक दुःख व संकट यातून तारला जावो', हेही उपवास करण्यामागचे एक कारण आहे.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्यांचा भावाला 75 टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते असे मानले जाते.
नागाची पूजा करण्यामागील शास्त्र
सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझे भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्यादिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.
नवीन वस्त्रे व अलंकार घालण्याचे कारण
सत्येश्वरीचा भावासाठीचा शोध पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजविले त्यातून सत्येश्वर समाधानी झाला .त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात .
नागपंचमीला मेहंदी लावण्याचे महत्त्व
सत्येश्वर नागराजाच्या रूपात सत्येश्वरीला पुढ्यात उभा राहिला.' तो निघून जाईल', असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले.
ते वचन देतांना सत्येश्वरीच्या हातावर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढतात.
नागपंचमीला झोका खेळण्याचे महत्त्व
दुसऱ्या दिवशी सत्येश्वरीला नागराजा दिसला नाही.
तेव्हा ती जंगलात सैरावैला भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोका खेळू लागली.
त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात .त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असतो. जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यात असलेल्या सर्व अडचणी व दुखे खाली जाऊ देत.
नागपंचमी केव्हापासून साजरी करतात?
भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली असे हि म्हणतात.
नागपंचमीचे महत्व काय?
दुधाला चंद्राचे प्रतीक मानले जाते. भगवान शंकराच्या कपाळावर चंद्र विराजमान आहे .चंद्र हा मनाचा ग्रह आहे. मनात भगवान शंकराची भक्ती म्हणून नागपंचमीला नागाला दूध अर्पण करतात.
0 टिप्पण्या