सुख दुःख

                         


                        😀  
सु
ख दु:ख 😔

            एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले" गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का...?"              त्या वेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.
        गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले.
    त्या नंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले, 
         "पाण्याची चव कशी वाटली ?
 तेव्हा शिष्य म्हणाला, "अतिशय खारट"
    त्या नंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले...
                   सोबतआणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?
       शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर. 
             गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले.
         दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. 
         पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परीणाम होत नाही."
       विशाल मनाने जगा...
        मनाची संकुचीत अवस्था टाकून द्या...
जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही..
              पण काही पेल्यासारखे लहान मन करुन             जगतात ते सदैव दुःखीच असतात 
         आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परीणाम होत नाही.. !

             नेहमी सकारात्मक विचार मनात आसुद्दा आनंदीच रहाल 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या