आरोग्यासाठी चांगले काय
गूळ की साखर?
गूळ की साखर, तुमच्या त्वचेसाठी काय आहे चांगले? पेस्ट्री, डोनट्स किंवा चॉकलेट्स तुम्हाला खायला आवडत असेल .पण तुम्हाला माहीत असले पाहिजे की, गोड पदार्थ फक्त तुमच्या आरोग्यावरच नव्हे तर तुमच्या त्वचेवरदेखील परिणाम करतात;
कारण साखर हे दाह आणि पुरळ होण्यामागचे मुख्य कारण आहे. त्वचेतील कोलेजन (collagen) खराब करते आणि तुमची त्वचा लवकर वृद्ध होते. दरम्यान, गूळ हा साखरेला आरोग्यदायी पर्याय म्हणून ओळखला जातो .
गुळ त्वचेसाठी चांगला आहे का?
गुळ आणि साखर या दोन्ही गोड पदार्थांची तुलना केली आहे. ”हे दोन्ही पदार्थ कॅलरीजने समृद्ध आहेत. गूळ हा साखरेसाठी चांगला पर्याय आहे. पण साखरेपेक्षा गूळ हा पोषक तत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असल्यामुळे तुमच्या शरीरासाठी आरोग्यदायी पर्याय ठरतो. तसेच तो शरीरामध्ये हळूहळू शोषला जातो. त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाणही कमी होते.
त्वचेवर साखरेचा हानीकारक प्रभाव...
रिफाइंड साखर तुमच्या त्वचेसाठी चांगली नाही, “रक्तप्रवाहात जास्त साखरेमुळे ग्लायकेशन होऊ शकते, ही एक नैसर्गिक केमिकल रिएक्शन आहे जे रक्तप्रवाहात साखरेची पातळी वाढल्यावर घडते.
कोलेजन आणि एलास्टिन हे त्वचा निरोगी दिसण्यासाठी महत्त्वाचे असू शकते. जेव्हा हे दोन प्रोटीन साखरेच्या घटकांशी संबंधित असतात तेव्हा ते आणखी कमकुवत होतात. जेव्हा चांगली त्वचा तयार करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या घटकांचे नुकसान पोहचते तेव्हा वृद्धवाची चिन्हे अधिक स्पष्ट होतात. त्वचा कोरडी पडते आणि लवचिकता कमी होते, ज्यामुळे त्वचेला सुरकुत्या पडतात आणि त्वचा आणखी निस्तेज होते. शरीरावर दाह निर्माण होतो, ज्यामुळे त्वचेवर तेल आणि सेबम निर्माण होते, जे पुरळ होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
साखर की गूळ, त्वचेसाठी काय आहे योग्य...? “साखर आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उसाच्या रसापासून तयार केलेले आहेत. आणि दोघांमध्येही जास्त कॅलरी असूनदेखील तुमच्या त्वचेसाठी साखरेऐवजी गूळ हा एक चांगला पर्याय आहे. या दोन्ही पदार्थांच्या उत्पादनांच्या प्रक्रियेत फरक आहे. गूळ हा आरोग्यदायी पर्याय म्हणून ओळखला जातो,” असे ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या कॉस्मेटिक त्वचाशास्त्रज्ञ आणि त्वचासर्जन, सल्लागार त्वचाशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. रिंकी कपूर, यांनी सांगितले.
गुळाचे फायदे
“गूळ तुमच्या त्वचेचा रंग हलका करेल, त्वचेवरील डाग नाहीसे करेल आणि तुमची त्वचा साफ दिसेल. कारण गुळात ग्लायकोलिक ॲसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करते आणि मुरुम बरे करण्यास मदत करते.
रिफाइंड साखरेपेक्षा गूळ खाणे आरोग्यदायी...? याबाबत, अग्निवेश हेल्थ केअर सेंटचे एमडी डॉ. सांगतात , रिफाइंड साखरेपेक्षा गूळ खाणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे, कारण त्यात ‘अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे’ मुबलक प्रमाणात आहेत. पण, त्यांनी सावधानतेचा इशारा देत असेही सांगितले की, “जास्त साखरयुक्त अन्न खाणे, मग ते नैसर्गिक असो किंवा शुद्ध, कधीही शहाणपणाचे नाही. संयम नेहमीच महत्त्वाचा असतो. मधुमेह असलेल्या लोकांनी कोणत्याही प्रकारचे साखरयुक्त पदार्थ खाण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे.
गुळाचे इतर काही आरोग्य फायदे...!
गूळ हा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करतो, त्यामध्ये भरपूर लोह उपलब्ध आहे. तसेच तो रक्त शुद्ध करण्यासाठी आणि ॲनिमियाचा सामना करण्यासाठी मदत करतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे, हा मधुमेहाच्या रुग्णांसाठीदेखील एक चांगला पर्याय ठरतो.
गुळाचे फायदे
गूळ हा पदार्थ श्वसनाच्या आजारांवरील उपचारांमध्ये अत्यंत प्रभावी आहे; कारण त्यामध्ये अँटी-ॲलर्जिक गुणधर्म आहे, जो श्वसन प्रणालीतील विषारी आणि चिकट घटक साफ करतो. हे श्वासनलिका साफ करते .
0 टिप्पण्या