डोळे येणे 😎
अर्थात
सध्या सगळीकडे डोळे येणे अर्थात काँजूंक्टिव्हिटीस ह्या आजाराची साथ आलेली आहे, रोज शेकडो नवीन रुग्ण हया आजाराने त्रस्त होत आहेत
ह्या आजाराविषयी थोडेसे.
डोळे येणे म्हणजे काय?*
ज्ञडोळ्याच्या पापणी आड एक पारदर्शक पडदा असतो, ज्याला वैद्यकीय भाषेत conjunctiva असे म्हणतात, ह्या पडद्याला सुजन येण्याचा आजार म्हणजे डोळे येणे
*
डोळे का येतात व साथ रोग स्वरूपात का येतात?* सध्या सुरू असलेली साथ ही विषाणूजन्य असून, विषाणू किंवा व्हायरस च्या जनुकीय रचनेत कालानुरूप बदल झाल्याने दर काही वर्षांनी लहान मोठया स्वरूपात अश्या साथी पसरतात.
डोळे येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
हा विषाणू जन्य साथ रोग असून संसर्गित रुग्ण पासून सामाजिक अंतर राखावे गर्दी व वर्दळीच्या जागी जाणे टाळावे
शाळा व कामाच्या जागा कार्यालये अशा ठिकाणी डोळे आलेल्या रुग्णास सुट्टी द्यावी
बाहेरून आल्यावर हाथ व चेहरा स्वच्छ धुवावा
जिथे इतरांचे हाथ वारंवार लागतात अशा ठिकाणी स्पर्श करू नये.
लिफ्ट, जिनाइ हा आजार कसा पसरतो?
हा आजार संसर्गित रुग्ण च्या नेत्र स्त्राव व बोलताना उडणाऱ्या थुंकी ( ऐरोसोल ) ह्यांच्या संपर्कात आल्याने पसरतो
रुग्णाचा डोळ्या कडे पाहिल्याने पसरत नाही तो गैरसमज आहे .
डोळे येण्याची काय लक्षणं असतात?
डोळे लाल होणे, चुरचुरने, पाणी येणे, पापण्या सुजने, उजेडात पाहायला त्रास होतो.
अन्य शारीरिक लक्षणे काय असू शकतात?
सर्दी, खोकला, ताप, अंग कणकणने, कानाजवळ गाठ येणे , टॉन्सिल्स वाढणे, थकवा ही लक्षणे जाणवतात.
डोळे आल्यास काय करू नये?
गर्दी व कामाच्या ठिकाणी शक्यतो जाऊ नये. घरगुती उपाय जसे बकरी चे दूध, ऐरणीचे पाणी , शाई डोळ्यात टाकू नये
परस्पर मेडिकल दुकानात जाऊन किंवा इंटरनेट वर आधारित ज्ञानावर विसंबून स्वयं उपचार टाळावा
घरातील लहान मुले, म्हातारी माणसे, गर्भवती महिलांच्या संपर्कात येऊ नये
डोळे चोळू नये, वारंवार पुसू नये
शेकू नये .
डोळे आल्यास काय करावे?
घाबरून जाऊ नये
बहुतांश रूग्ण मध्ये लक्षणे व आजार सौम्य स्वरूपात असतो, व शारीरिक प्रतिकार क्षमतेने व योग्य उपचार नी पूर्ण पणे ३ ते ५ दिवसात बरा होतो .चष्म्या किंवा गॉगल पूर्णवेळ घालावा
दिवसातून दोन ते तीन वेळा हाथ व चेहरा स्वच्छ धुवावा
थंड पाण्याची पट्टी किंवा प्लास्टिक मध्ये गुंडाळून बर्फ डोळा वर ठेवावा
जवळच्या नेत्र रोग तज्ञ ह्यांची भेट घेऊन प्रमाणित उपचार करावा, स्वयं उपचार किंवा दुसरा रुग्ण वापरतो म्हणून तशीच औषधे घेऊ नये. कधी कधी साथ रोग काळात अन्य नेत्र रोग असल्यास चुकीचा उपचार होण्याची भीती असते .
हा आजार बरा होण्यास किती अवधी लागतो?
व्यक्ती च्या प्रतिकार क्षमता, वय व शारीरिक परिस्थिती व अन्य संलग्न शारीरिक आजार ह्यामुळे बरा होण्यासाठी लागणारा कालावधी वेगवेगला असु शकतो,
साधारण पणे ३ ते १० दिवसात रुग्ण बरे होतात
हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो का?
कधी गंभीर होतो?
स्वयं उपचार
दुर्लक्ष
घरगुती उपाय
वृध्द व गर्भवती स्त्रिया
ह्यामध्ये आजार गंभीर होतो
आशा वेळी बुबुल ला संसर्ग होणे, कायमस्वरूपी काँजूंक्टिव्हिवा व बुबुळ वर चट्टा पडणे, अल्सर होणे हे दुष्परिणाम होऊ शकतात.
कोणास जास्त धोका आहे?
वयोवृद्ध लोक, लहान मुले, गर्भवती स्त्रिया, डायबेटीस रुग्ण, वात रोग रुग्ण, हृदय रूग्ण, प्रतिकार क्षमता कमी करणारी औषधे घेणारे रुग्ण जसे कि ट्रान्सप्लांट पेशंट
नुकतेच आपण कोरोना साथ रोग काळात , साथ रोग पसरू नये म्हणुन बरीच काळजी घेतली, त्यातील बहुतांश काळजी घ्या साथ रोग काळात घेतली तर ही साथ लगेच आटोक्यात येईल.
0 टिप्पण्या