चतुर शाम

                                   


   चतुर शाम

                 एक प्रतापगड नावाचे गाव होते. त्या गावात श्याम नावाचा मुलगा राहत होता .तो खूप धीट होता.            गावच्या पलीकडे एक डोंगर होता .त्या डोंगरा पलीकडे त्याची मावशी राहत होती .
           दुपारची वेळ झाली .तो आपल्या मावशीकडे जात होता .उन्हाळ्याचे दिवस होते. त्याला चालता चालता तहान लागली .
         रस्त्याच्या बाजूला विहीर होती. तो विहिरीवर पाणी पिऊ लागला .
         तितक्यात त्याला एक माणूस दिसला. तो खूप लठ्ठ होता. त्याच्या झुपकेदार मिशा व लाल भडक डोळे यावरून तो चोर असावा ,असे शामला वाटले.
          शामने आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी काढली व खिशात ठेवली.
      चोर जवळ येऊ लागला हे पाहून श्याम खाली बसला व जोरजोराने रडू लागला.
         चोराने विचारले ,"मुला, तू का रडतोस?"
 शाम म्हणाला ,"माझी मावशी दुसऱ्या गावाला राहते, ती खूप आजारी आहे .तिला पैशाची गरज आहे .
आईने मला पाच हजार रुपये दिले होते.
 मी ते घेऊन जात होतो .
परंतु त्या झाडाजवळ एका माणसाने माझे पैसे घेतले व तो पळून गेला.
       दादा ,माझे पैसे मला मिळवून द्या. मला खूप गरज आहे त्या पैशाची ,"
       चोराने समोर पाहिले एक माणूस धावत जात होता.                 त्याला पाहताच तो त्या माणसाच्या मागे धावला.
         शामने पाहिले तो चोर त्या माणसाचा पाठलाग करत खूप दूर गेला आहे.
 शाम हळूच उठला. त्यांने मावशीच्या घराच्या दिशेने धुवून ठोकली .
       त्याने सारी हकीकत मावशीला सांगितली.
" अरे शाम तू तर खूपच हुशार आहेस !"
असे म्हणून मावशीने त्याचे कौतुक केले व त्याला लाडू खायला दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या