चतुर कावळा


 

                             चतुर कावळा 

               एका झाडावर एक कावळा बसला होता. त्याच्या चोचीत एक भाकरीचा तुकडा होता. त्याच झाडाखालून एक कोल्हा जात होता .
      कावळ्याच्या चोचीतील भाकरीचा तुकडा पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला.
      ' अरे वा !कावळे दादाला आज चांगला लाभ झालेला दिसतो .त्याच्या चोचित भाकरीचा तुकडा आहे. तो मिळवायला हवा, पण मिळवायचा कसा ?काहीतरी युक्ती करून कावळ्याला चोच उघडायला भाग पाडलं पाहिजे.'
          असे त्यांनी ठरविले.
 कोल्हा म्हणाला," काय कावळे दादा ,आज तुम्ही खूपच आनंदी दिसत आहात .
        तुमचं गाणं ऐकून खूप दिवस झाले .एक छान गाणं म्हणा ना ."
      'अरे वा! दगड फोडला का माझ्याशी गोड गोड का बोलतोय ?
        त्याचा या भाकरीवर डोळा दिसतो. ठीक आहे. त्याचा डाव त्याच्यावरच उलटून टाकू या' , असा विचार कावळ्याने केला.
         कावळा भाकरीचा तुकडा पायात धरून गाणे म्हणू लागला.
        कावळा म्हणाला ,"कोल्होबा गाणं आवडलं का?"                  'कावळा जरा हुशारच दिसतोय .भाकरीचा तुकडा मिळविण्यासाठी दुसरी युक्ती शोधली पाहिजे.'
असे कोल्ह्याला वाटले.
       कोल्हा म्हणाला,"वा !कावळे दादा गाणं छानच होतं,
पण तुमचा नाचही छान  असतो म्हणे, जरा नाचुन दाखवलं, तर काय मज्जा येईल!"
          'अरे लबाडा, समजलं मला.
 मी नाचताना पायातला भाकरीचा तुकडा खाली पडेल आणि तो घेऊन तुला पळता येईल, असा तुझा  डाव आहे ना ?
       थांब ,तुझी चांगली फजिती करतो ,'असे कावळा मनात म्हनाला.
    कावळा भाकरीचा तुकडा चोचित धरून नाचू लागला. 
         ' हा कावळा तर खूपच चतुर दिसतो .एवढं करूनही भाकरीचा तुकडा मिळाला नाही .फुकट आपला वेळ गेला. बघून आता दुसरीकडे काही मिळतं का ते !'.असे ठरवून शेवटी  कोल्हा खाली मान घालून निघून गेला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या