शहाणी मधुमक्षिका

 


                             शहाणी मधुमक्षिका
      

          एका शेतात आमराई होती. तिथे बरेचसे पक्षी, प्राणी आनंदाने राहात .एका आंब्याच्या झाडावर मधमाशी, मैना ,कोकिळा, चिमणी आनंदाने राहत होते.       आणि त्याच झाडावर एक वृद्ध माकडही राहत होते.            त्या सर्वांची खूप मैत्री होती.
 एकदा माकडाला झाडावर बसून कंटाळा आला.
 म्हणून तो बाहेर फिरायला गेला .त्याला जमिनीवर खाली पडलेले वाळलेले सूर्यफूल सापडले. माकड ते घरी घेऊन आले व त्यातील चार- चार बिया त्याने सगळ्यांना वाटून दिल्या.
 कोकिळा हातात आलेल्या बिया पाहून विचार करू लागली.
      मला याचा काहीही उपयोग नाही'. ती खूप आळशी होती. तिने बिया कावळ्याच्या घरट्यात नेऊन ठेवल्या.             कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला," कशाला आणला आहे कचरा माझ्या घरट्यात!"
      त्यानेही त्या बिया फेकून दिल्या.
 चिमणीने त्या बिया हातात घेतल्या.
 चिमणी खूप हावरट होती.
 तिने एक एक बी सोलली व खाऊन टाकली. 
मैना तर फारच कंजूस होती.
 तिने त्या बिया कापसात बांधल्या व घरट्यात एका कोपऱ्यात लपवून ठेवल्या.
        हे सगळं मधमाशी पाहत होती.
 ती फारच शहाणी होती. तिने त्या बिया शेतात झाडाखाली रुजत घातल्या.
 पाऊस पडताच त्या बिया रुजल्या. 
रोपटी भरभर वाढू लागली. 
पिवळी फुले फुल लागली. 
वाऱ्यावर डोलू लागली.
 मधमाशी फुलातील मध पिऊन गाऊ लागली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या