स्वातंत्र्याची किंमत

 

               

स्वतंत्र्याची किंमत 
 
रस्त्यावर गर्दी जमली होती. एका पक्षीविक्या पिंजऱ्यात विविध पक्षी घेऊन आला होता. व ते पक्षी तो विकत होता. वेगवेगळ्या रंगाचे पक्षी बघण्यासाठीच ती सारी गर्दी होती. 
            एक वयस्कर थकलेला माणूस तेथे आला.त्याची दाढी पांढरी शुभ्र झालेली होती. त्याचे नाव होते सुजानसिंह. त्याला शत्रू सैन्याने पकडल्यामुळे तो तीस वर्षे तुरुंगात घालवून आपल्या घरी परतत होता. 
         सुजानसिंह हा शुर सैनिक होता. परंतु लढाईत तो शत्रूच्या हाती सापडला. शत्रुने त्याला तुरुंगात डांबून ठेवले होते. तुरुंगात नाना परिने त्यांचा छळ झाला होता. या 30 वर्षात त्याला कोणतीच माहिती घराविषयी नव्हती आणि तो युद्धात कामी मला असावा अशी वार्ता गावात त्याच्याविषयी पसरली होती. 
 रस्त्यातून घरी जाताना त्याला खूप गर्दी दिसली. त्याने गर्दीत डोकावले. पिंजऱ्यातील पक्षी पाहून सुजनसिंहला आपल्या कारावासाची आठवण झाली. त्या पक्षाविषयी त्याला दया आली. त्याने पक्षी विक्याला सर्व पक्ष्याची किंमत विचारली. 
       त्याने ते सर्व पक्षी खरेदी केले. लोक त्याच्याकडून आश्चर्याने पाहू लागले. त्यांने तो पिंजरा हाती घेतला. व त्या सर्व पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त केले.
        लोक सुजासिंहाकडे कुतूहलाने पाहून लागले. हा माणूस वेडा आहे की काय ,असेच त्यांना वाटले असावे, पण सुजनसिंहाने गुलामितील दुःख अनुभवले होते. स्वातंत्र्याचे मोहन त्याला उमगले होते .त्या पक्ष्यांना मुक्त केल्यामुळे त्याला बरे वाटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या