डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भाषण
"करून जीवाचे रान
दिला सर्वांना समतेचा मान
अशी भीमरावांची शान
लिहिले भारताचे संविधान"
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव.....................
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपणा सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भिमाबाई असे होते
डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.
त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती.
सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,शैक्षणिक, धार्मिक ,पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात.......
आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या ,अंधकारमय जीवनाला तेजोमय संदेश दिला. गुलामगिरीच्या विळख्यात अडकून कोमेजून गेलेल्या मनामनातून समाज क्रांतीची मशाल चेतवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काच्या प्रति जागृत केले.
जो प्रतिकूल लोकमतला घाबरून जात नाही.
दुसऱ्याच्या हाताचे बाहुले न होण्याची बुद्धी ज्याच्याकडेअसते. आणि ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वातंत्र्य आहे.
असे मी समजतो.
असे डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते.
भ्रष्टाचार, अनिती ,अत्याचार ,अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता .
जातीभेदाच्या ते विरोधात होते.
जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड ते मानत असत.
ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एक संघ होणार नाही.
असे त्यांचे मत होते.
" शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषान करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. "
म्हणून शिका संघटित व्हा संघर्ष करा असे त्यांचे मत होते.
त्यांचे जीवन संघर्षाने व्यापलेले होते .
या संघर्षातून त्यांनी समाजात मोठी क्रांती घडवून आणली.
अशा या महान मानवाबद्दल जेव्हडे सांगावे आणि जेव्हडे बोलावे तेव्हडे थोडेच.
अशा या महामानवाच्या पावन प्रतिमेला माझे कोटी कोटी नमन.
जय हिंद
जय महाराष्ट्र
धन्यवाद
0 टिप्पण्या