छत्रपती शिवाजी महाराज भाषण
नमस्कार विद्यार्थी
मित्र-मैत्रिणी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कना-कानावर आणि विश्वासाच्या
प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.
अख्ख्या जगाला हेवा वाटेल
असा मराठ्याचा कैवारी!
शत्रूला पाणी पाजू स्वराज्याची अखंड पताका फडकवणाऱ्या
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी
किल्ल्यावर झाला.
शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव
जिजाबाई होते.
शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्रह होते.
राजमाता
जिजामाता शिवाजी महाराजांना लहानपणी शूरवीरांच्या गोष्टी सांगत असत.
राजमाता
जिजाऊ शिवरायांना म्हणत असत. शिवबा आपला जन्म सरदारकी किंवा चाकरी करण्यासाठी
झाला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे.
त्यासाठी
आपण स्वराज्य निर्माण करा.
राजमाता जिजाऊंचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी
महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची
प्रतिज्ञा घेतली. व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.
शिवाजी
महाराजांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. रयते
वरील अन्याय दूर केले. म्हणूनच ते एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोक कल्याणकारी
राजा, नव्या युगाचा निर्माता, दुर्जणांचा नाश कर्ता, सज्जनांचा कैवारी झाले.
अशा
शिवरायांना माझा मानाचा मुजरा,
शेवटी मी एवढेच म्हणेल
शब्दही पडती अपुरे
अशी
शिवरायांची कीर्ती
राजा शोभून दिसे जगती
अवघ्या जगाचा शिवछत्रपती
जय जिजाऊ !
जय
शिवराय!
0 टिप्पण्या