राजमाता जिजाऊ
मराठी भाषण
माननीय अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो .आज 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. या थोर मातेस प्रथम माझा मानाचा मुजरा........
"त्रिवार असावा मानाचा मुजरा......
त्या जिजाऊ मातेला.....
रचली स्वराज्याची जीने गाथा...."
राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.
सिंदखेडचे लघुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आई म्हाळसाबाई जाधव ह्या होत्या.
लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.
डिसेंबर इ.स.1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला.
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोलेली पहाट काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला. त्या म्हणजे राजमाता.
जिजाऊ यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले. आणि फक्त बघितलेच नाही. तर ते सत्यात देखील सत्यात देखील उतरविले .त्या म्हणजे राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवराय यांना ज्ञान, चातुर्य ,चरित्र ,संघटन व पराक्रम अशा राजस व सद्गुणांचे बाळकडू बाजले .
राजमाता जिजाऊ यांनी प्रत्येक मावळ्याच्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनविला. त्यांनी प्रत्येक मावळ्यात शिवबा घडविला.
राजमाता जिजाऊ शिवरायांना थोर, पराक्रमी पुरुषांच्या गोष्टी सांगत असत.
सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता. बकासुराचा वध करून दुबळ्या गरीब लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. दुष्ट कंसाचा नाश करणारा कृष्ण किती पराक्रमी होता.
अशा प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते. ते म्हणजे लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे. अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिली.
राजमाता जिजाऊंच्या अशा शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली. आणि राजमाता जिजाऊ यांची स्वप्न साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
अशा या महान राजमाता जिजाऊ यांचे 17 जून 1674 रोजी निधन झाले.
मित्रांनो राजमाता जिजाऊ यांच्या विषयी बोलावे तितके थोडेच आहे.
शेवटी मी एवढेच म्हणेल
"मुजरा माझा माता जिजाऊला,
घडविले तिने शूर शिवबाला.
साक्षात होती ती आई भवानी,
जन्म घेतला तिच्या पोटी शूर शिवबांनी.
जय जिजाऊ ,
जय शिवराय,
जय महाराष्ट्र .
धन्यवाद
- Term and Condition
- Sitemap
- Privacy policy
- Home
- English Grammar test
- Disclaimer
- Contact us
- About us
- स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी
- सामान्य ज्ञान सराव परीक्षा
- शिष्यवृत्ती सराव परीक्षा
- शारीरिक शिक्षण
- वर्ग 8 वा
- वर्ग 7 वा
- वर्ग 6 वा
- वर्ग 5 वा
- वर्ग 4 था
- वर्ग 3 रा
- वर्ग 2 रा
- वर्ग 1 ला
- योगासने
- बोधकथा ( माध्यमिक वर्गासाठी )
- बोधकथा ( प्राथमिक वर्गासाठी )
- प्रश्नमंजुषा सराव परीक्षा
- पत्रलेखन
- निबंधलेखन
- नवोदय सराव परीक्षा
- जीवन परिचय
- खेळ खेळूया
- कार्यानुभव
- कला
0 टिप्पण्या