समंजस मुले


                       🐸 🤵 समंजस मुले🤵🐸

              विद्यार्थी शाळेच्या पटांगणात जमले होते. प्रत्येकाजवळ दुपारच्या जेवणाचा डब्बा होता.
     काही जणांनी बॅट, चेंडू, लोगोऱ्या, रिंग वगैरे आणले होते. आज वनभोजन होते. सर्व आनंदात होते.                      शिक्षकांनी सूचना केल्या. सर्वजण गावाबाहेरच्या तलावाकडे निघाले. ते मजेत गप्पा मारत, गाणी म्हणत जात होते.
      थोड्यावेळाने तलावाजवळ पोहोचले. चांगली शी जागा पाहून सर्वांनी डब्बे ठेवले.
       काहीजण गाणे गाऊ लागली. गटागटांनी खेळ सुरू झाले. काही मुले खेळता - खेळता दमली म्हणून विश्रांतीसाठी तळ्याजवळ येऊन बसली.
    गप्पा मारता- मारता सहज पडलेले छोटे मोठे दगड तलावात फेकू लागली. यातून कोणाचा दगड लांब वर जातो हा खेळ सुरू झाला आणि सर्व मुले दगड मारू लागली.
       तलावात बेंडकांची वस्ती होती. अचानक दगडांचा वर्षाव होऊ लागल्याने बेसावद बेडूक जखमी झाली.      काय झाले त्यांना समजेना. सारे जण घाबरून गेली.    शेवटी एक म्हातारा बिंडू पुढे आला. व म्हणाला," घाबरू नका. अशा अनेक संकट दूर होणार नाही. मी वर जाऊन काय प्रकार आहे ते पाहतो ".
     म्हातारा बिंदू पाण्यावर आला. त्याने पाहिले तर मुले मजेत दगड मारत होती.
     म्हातारा बेडूक मुलांना म्हनाला," काय करता आहात तुम्ही ?"
     मुले म्हणाली," आज आम्ही सहलीला आलोत, खेळ  खेळतो आहोत आम्ही!"
      बेडूक म्हणाला," मुलांनो, तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो. या तलावात आम्ही राहतो. तुमच्या या दगडाच्या माराने कितीतरी बेडूक जखमी झाले आहेत.
      तुमच्या प्रमाणे आम्हाला देखील जगण्याचा अधिकार आहे, आम्हालाही जगू द्या सुखाने."
        मुलांना बेडकाचे म्हणणे पटले. त्यांनी दगड मारणे थांबविले. व ती तिथून निघून गेली. आपण केलेल्या कृत्याने मुलांना खूप वाईट वाटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या