🌙🐵 माकडांची फजिती 🐵🌙🌳
एका रानात एक नदी होती. नदीकाठी जांभळाचे झाड होते.
त्या झाडावर तीन माकडे राहत होते. झाडाची एक फांदी नदीच्या पाण्यात वाकलेली होती.
एके दिवशी एक नारळ नदीच्या पाण्यात वाहताना माकडांनी पाहिला. एक माकड चटकन फांदी पकडून नारळ पकडण्याचा प्रयत्न करू लागले.
त्यांचा पुढचा पंजा पाण्यापर्यंत पोहोचत नाही हे पाहून दुसरी माकडेही भरभर खाली आली.
त्यांनी एकमेकांची शेपटी पकडली, मोठी साखळी तयार करून त्यांनी नदीतून नारळ काढला.
दुसऱ्या दिवशी रात्री आकाशात चंद्र उगवला होता. ती पौर्णिमेची रात्र होती.
🐵 माकडांनी पाण्यात पाहिले. 🌙त्यांना चांदोबा पाण्यात पडलेला दिसला.🌙 त्यांनी विचार केला," अरेरे, चांदोबा पाण्यात पडला वाटत.
त्याला पाण्यातून काढायला पाहिजे',
मग त्यांनी एक युक्ती केली. एका माकडाने एका हाताने फांदी घट्ट पकडली.
त्याच्या दुसऱ्या हाताला पकडून इतर दोन माकडांनी साखळी तयार केली .चांदोबाला धरण्यासाठी ती लोंबक ळू लागली.
पाण्यातील चांदोबाला हात लावणार इतक्यात वरच्या माकडाचा फांदीवरचा हात निसटला.
त्यामुळे माकडांचे साखळी तुटली आणि माकडे पाण्यात पडली.
पाणी हल्ल्यामुळे चांदोबा दिसेनासा झाला. नेहमी खरा चांदोबा आकाशातच असतो.
पाण्यात त्याचे प्रतिबिंब दिसते.
तात्पर्य : कोणतेही काम अविचाराने करू नये.
0 टिप्पण्या