कुशाग्रह राजा

 




🌳🦁 कुशाग्रह राजा🦁🌳
    एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात अनेक प्राणी राहत होते.
          एकदा जंगलाचा राजा सिंह लढाईची तयारी करत होता. सिंहाने कोल्ह्याला बोलावून घेतले.
        सिंह म्हणाला, "मंत्री, युद्धाबाबत चर्चा करायची आहे.
     आपल्या अरण्यातील सर्व प्राण्यांना ताबडतोब बोलवा."
कोल्हा म्हणाला, "महाराज, एक प्रश्न विचारू का?" "विचारा," सिंह म्हणाला,
      कोल्हा म्हणाला, महाराज, "गाढव मठ्ठ आहे आणि ससा तर खूपच भित्रा आहे. त्यांना उगाचच का बोलवायचं?"
           महाराज म्हणाले," गाढवाचा आवाज दूरवर ऐकायला जाणारा आहे. तो लढाईच्या वेळी रणशिंगन           फुंकेल, ससा चपळ आहे.
         संदेशाची ने आण करण्यास त्याचा चांगला उपयोग होईल."
  " महाराज, मला गाढव आणि ससा यांच्यातील फक्त दोष दिसले ;पण तुम्हाला त्यांच्यातील चांगले गुण दिसले.           प्रत्येकात काहीतरी चांगले असतेच.
त्याचा कसा उपयोग करून घ्यावा, हे आज मला कळाले."
तात्पर्य : प्रत्येक व्यक्तीत चांगले व वाईट गुण असतात. चांगल्या गुणांची प्रशंसा करावी.👏👏👏👏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या