मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण


 

            (17 सप्टेंबर भाषण)

‌ जेव्हा स्वातंत्र्याचे मांगले गीत


‌ गात होती भारत भूमी


‌ तेव्हा मात्र पारतंत्र्याचे चटके


‌ सोसत होती मराठवाडा भूमी


सांगतात आजी - आजोबा आजही तेव्हाची परिस्थिती निजामाच्या गुलामगिरीने त्रस्त झालेल्या जनतेची करून कहानी.....
           मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वृंद आणि माझे बाल मित्र-मैत्रिणींनो मी...............
    आपणा सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या भाषणात सुरुवात करते.
           दरवर्षी आपण 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो.
मित्र-मैत्रिणींनो आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला . आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात छोटी - मोठी अशी 565 संस्थाने होती.
             त्यापैकी 562 संस्थाने स्वातंत्र्य भारतात सामील झाली. परंतु जम्मू-काश्मीर ,जुनागड आणि हैदराबाद या संस्थानांनी स्वातंत्र्य भारतात सामील होण्यास नकार दिला.                                                                यापैकी आपला मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता.
      मराठवाड्यातील जनतेस स्वातंत्र्य भारतात सामील व्हायचे होते. परंतु हैदराबादचा निजाम स्वातंत्र्य राहून पाकिस्तानात पाठिंबा देत होता .तेव्हा स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनतेने लढा उभा केला.
            जनतेची स्वातंत्र्य भारतात सामील होण्याची मागणी मोडून काढण्यासाठी निजामांचा सरदार काझीम रजवी रझाकार यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने मराठवाड्यातील जनतेवर अनेक अत्याचार केले. परंतु मराठवाड्यातील जनता त्यास शरण आली नाही . शेवटी स्वातंत्र्य भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई करून 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान स्वातंत्र भारतात विलीन केले आणि तेव्हापासून आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालो. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते .
        जय हिंद ,
                  जय महाराष्ट्र,
                                      जय मराठवाडा ,
                                                              धन्यवाद .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या