फुलांच्या माळा तयार करणे.

 



फुलांच्या माळा तयार करणे.
साहित्य व साधने: विविध प्रकारची फुले ( उदा .झेंडू, शेवंती, निशिगंध, लाली इत्यादी )जाड दोरा , लाम सुई,कात्री व सुशोभना साठी पाने.
कृतीक्रम:
१)ज्या लांबीचे माळ तयार करावयाची आहे, त्यांच्या दुपटीपेक्षा थोडा अधिक लांबीचा दुहेरी दोरा सुईत ओऊन घ्या.
२)एकाच प्रकारची ४अथवा ५फुले दोर्‍यात ओवून घ्या .त्यानंतर वेगळ्या रंगाची २ते ३ फुले ओवा.
३)४ ते ५ पाने ओऊन त्यांची आकर्षक मांडणी करा.
४)पहिल्या प्रकारातील ४ ते ५ फुले पुन्हा ओऊन पहिल्या कृती प्रमाणेच सर्व कृती पुन्हा पुन्हा करून आवश्यक मापाची माळ तयार करा .दोऱ्याच्या टोकास गाठ मारून आवश्‍यकतेनुसार माळेचा वापर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या