पाय मोजा पासून कठपुतळी बाहुली काम करणे.

 



पाय मोजा पासून कठपुतळी बाहुली काम करणे.
साहित्य व साधने :एक पायमोजा, जाड कागद, कात्री ,स्केचपेन ,रंग, रंगीत टिकल्या, रंगीत कागद, मासिकातील/ वर्तमानपत्रातील माणसाची चित्रे इत्यादी.
कृतीक्रम:
१)जाड कागदाचा एक गोल कापा.
२)त्या गोलावर पात्रास आवश्यक /आवडीप्रमाणे चेहरा काढा किंवा त्या आकाराचे चेहर्याचे चित्र असल्यास ते घ्या.
३)चेहऱ्याच्या खाली चेहर्‍यास रंगीत कागदाचा साजेसा पेहराव तयार करून चिटकवा.
४)पायमोजा मध्ये हात घालून अंगठा व करंगळी यांच्या खालच्या बाजूस लक्षात घेऊन पाय मोजावर त्या ठिकाणी छिद्रे करा.
५)या छिद्रातून अंगठा व करंगळी पायमोजाच्या बाहेर काढा. पायमोजातील तीन बोटांवर चित्र चिटकवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या