बाहुली काम
पाय मोजे पासुन मांजर तयार करणे
साहित्य व साधने: मांजराच्या रंगाशी मिळताजुळता रंगीत पाय मोजा. दोन लहान व एक मोठा रबर बंड ,काळ्या रंगाच्या टिकल्या , काळ्या रंगाचा लोकरीचा धागा ,स्केचपेन ,कापूस, सुई, दोरा, कात्री इत्यादी.कृतीक्रम:
१) पाय मोजा घेऊन त्यात मांजराच्या चेहऱ्यास आवश्यक तेवढा कापूस भरा.
२)वरच्या बाजूला दोन ठिकाणी लहान रबर बँड लावून कान तयार करून घ्या. कान भरीव दिसावेत यासाठी थोडासा कापूस भरून रबर बंड लावा.
३) कापूस भरतांना मांजराच्या चेहर्या प्रमाणे थोडासा चपटा गोलाकार करून मोठा रबर बंड लावा.
४) या गोलाच्या समोरील भागावर पांढऱ्या रंगाच्या कापडाचे <>अशा आकाराचे दोन तुकडे चिटकवा. त्यावर कळ्या रंगाच्या टिकल्या चिटकवा. म्हणजे हे मांजरीचे डोळे तयार होतील .
५)पांढऱ्या रंगाच्या कापडाचे तीन छोटे गोल कापा. ते एकमेकांवर चिटकवा या तीनही गोलाच्या मध्यावर लाल रंगाचा अंडाआकाराचा कापडी तुकडा चिटकवा.
६) तीन गोला पैकी वरच्या दोन गोलावर कळ्या स्केचपेनने मिशा काढा .आणि मांजराच्या तोंडाच्या जागी चिटकवा. मिशा साठी काळ्या रंगाची लोकरी वापरता येते.
७) पायमोजेच्या उलट बाजूस शेपटीच्या जागी कळ्या रंगाच्या लोकरीच्या धाग्या ची वेणी तयार करून शिवा.
0 टिप्पण्या