कार्डशिट वर स्टेन्सिलीने नक्षी कापुण आकाशकंदील तयार करणे.


 कार्डशिट वर स्टेन्सिलीने नक्षी कापुण आकाशकंदील तयार करणे.

साहित्य व साधने :पिवळ्या रंगाचा कार्डपेपर, रंगीत पतंगी कागद, मोजपट्टी, कातर,डिंक इत्यादी
कृतीक्रम:
१)पिवळ्या कार्ड पेपर चे चौरसाकृती 7 सेमी × 7 सेमी मापाचे तुकडे कापून घ्या.
२)तयार चौरसाकृती आकारांना करणावर दुमडून तुटक रेषेवर उलट घड्या घाला .तसेच खालील बाजूस सरळ रेषेवर त्रिकोणी घडी घालून ती त्रीकोण कापून घ्या.
३)7सेमी×7 सेमी मापाचा जाड चौरसाकृती कागद घेऊन त्यावर कालात्मक आकार काढून तो कापुन स्टेन्सिल तयार करा.
४)घड्याळ उघडून त्यावर कलात्मक आकाराचे स्टेन्स स्टेन्सिल ठेवून तो आकार कात्रीच्या साह्याने कापून काढा.
५)प्रत्येक कार्ड पेपरच्या चौरसाकृती आकाराला मधुमध घडी घालून तो आकार कात्री च्या सहाय्याने कापुण काढा.
६)काप घेतलेल्या चारही प्रकारांवर आतील बाजूस रंगीत पतंगी कागद चिटकवा.
७)कार्ड पेपरची चारही आकार बाजूच्या त्रिकोणी आकारावर डिंक लावून एकमेकांवर चिटकवून घ्या.
८)कार्ड पेपर चे आकार जोडून तयार झालेल्या पट्टीच्या लांबच्या मापाचा रंगीत पतंगी कागद घेऊन त्याला शक्य तेवढ्या उभ्या घड्या घाला व त्या घड्याळ उघडून त्यांच्या वरील बाजूने साधारण एक सेमी अंतर सोडून घड्यावर कात्रीच्या सहाय्याने एकसारखे काप द्या.
९)कापलेल्या रंगीत पतंगी कागद उलगडून आकाश कंदील च्या खालील बाजूला चिटकवून घ्या.
१०)आकाश कंदील अडकविण्यात करिता वरील बाजूस सारख्या अंतरावर दोरे बांधून ते एकत्र करून त्याला एक गाठ मारा. आकाशकंदील तयार झाल्यावर आवडीप्रमाणे सजावट करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या