झुंबर तयार करणे.


 झुंबर तयार करणे.

साहित्य व साधने:कागदी किंवा विविध प्रकारचे मणी (उदा. काचेचे, प्लास्टिकचे )सुई- दोरा ,पुठ्ठा ,डींक इत्यादी.
कृतीक्रम:
१)पुठ्ठ्या वर एक मोठे वर्तुळ काढून गोल व्यवस्थित कापून घ्या.
२)पुठ्ठ्याच्या गोलावर त्याच मध्य बिंदूतून दुसरे लहान वर्तुळ काढून घ्या.
३)मोठ्या वर्तुळावर समान अंतरावर छिद्रे पाडुन घ्या. लहान वर्तुळावर समान अंतरावर छिद्रे पाडून घ्या. 20 सेमी लांबीची मन्यांची एक माळ (पुठ्ठ्याच्या गोलाच्या) मध्य बिंदूतून ओऊन घ्या. व पुठ्ठ्याच्या वरील बाजूस गाठ मारून घ्या जेणेकरून ती माळ झुंबरच्या मध्यभागी येईल.
४)15 सेमी लांबीच्या आवश्यक तेवढ्या (मण्यांच्या) माळा करून त्या लहान वर्तुळावरील छिद्रातून वर घेऊन ,(वरच्या बाजूला )दोर्याना जाडसर गाठ मारा.
५)10 सेमी लांबीच्या मन्यांच्या आवश्यक तेवढ्या मळा करून मोठ्या वर्तुळावरील छिद्रातून वर घेऊन वरच्या बाजूला गाठी मारा.
६)मारलेल्या सर्व गाठी दिसू नये. म्हणून त्यावर रंगीत कागद चिटकवा.
७)झुंबर टाकण्यासाठी पुठ्ठ्याच्या वरील बाजूस समान अंतरावर तीन दोरे बांधा व त्यांची एकत्र गाठ मारा

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या