स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद म्हणतात तेजस्वी चेहरा ,पाणीदार डोळे, पिळदार शरीरयष्टी, दोन्ही हात छातीवर बांधून भाषण करणारा फोटो किंवा हिंदी महासागरातील शिराशळाखंडावरील शिल्प किंवा त्यांचा फोटो असा नजरेसमोर येतो. दोन्ही तू नही जाणवते, तेजस्वी करारीदृष्टी. तितकीच शक्तिशाली होती त्यांची अंतर्दृष्टी. स्वामीजी म्हणात पश्चिमेचे जीवन भोगवादी आहे. या नश्वर देहाला अधिकाधिक सुख देण्यासाठी युरोपीय लोक सतत विचार करतात, निरनिराळे शोध लावतात. उत्साह त्यांच्यात ओतप्रोत भरलेला असतो. ही कार्यमग्नता कार्यतत्परता भारतीयांनीघ्यायला हवी. आणि आपली त्याग वादी संस्कृती पश्चिमेला शिकवायला हवी. आपली संयम शिकवणारी, या जड देहाबरोबरच बाजूच्या चराचर सृष्टीचा विचार करणारी संस्कृती त्यांना शिकवायला हवी. भारताला विश्वगुरू पदी विराजमान झालेले पाहणे हे त्यांचे स्वप्न होते. असे स्वप्न बघणारे आणि ते सत्यात उतरविणारे तहहयात झटणारे स्वामीजी म्हणजेच पूर्व आश्रमाचे नरेंद्रनाथ दत्त. यांचा जन्म १२ जानेवारी १८६३चा. वडील विश्वनाथ बाबू आणि आई भुवनेश्वरी देवी. १८८० मध्ये त्यांचे विश्वविद्यालयीन जीवन सुरू झाले. पाठ्यपुस्तकां खेरीज कितीतरी पुस्तके ग्रंथालयातून घेऊन नरेंद्र वाचीत असत. सृष्टीचे गुढ विज्ञान,-तंत्रज्ञान, तत्वज्ञान साऱ्याच विषयात ते रस घेत. त्यामुळे त्यांची विचारशक्ती वाढत गेली. तसतशा शंका ही वाढत गेल्या. विचारवंत, बुद्धिवंतांकडे, प्राध्यापक वर्ग पुढे ते आपल्या शंका मांडीत. त्यांच्या युक्तिवादाने नरेंद्राचे समाधान होत नसे."आपण भगवंताला पाहिले आहे का?" हा तर नरेंद्र चा नेहमीचाच पेटेंट, खास प्रश्न 'होय' असे ,ठामउत्तर आतापर्यंत कोणाही व्यक्तीने त्यांना दिले नव्हते. एकदा मित्रांबरोबर ते दक्षिणेश्वराला काली मंदिरात गेले. तेथे राम कृष्ण परमहंस शिष्यांच्या समवेत ईश्वर विषयक चर्चा करण्यात दंग होते. तथाकथित विद्वान तर नव्हतेच उलट निरक्षर होते. मात्र त्यांना प्रसन्न आहे अशी लोक मान्यता होती. कोपऱ्यातल्या कंपूकडे विशेषतः नरेंद्र कडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि रामकृष्णांच्या भावनांचे तरंग उठू लागले. शरीरात जणू विद्युत् लहरी उसळू लागल्या. नरेंद्रची अंग खाती आणि पाणीदार डोळे यावर त्यांची दृष्टी खेळली. रामकृष्णांनी त्यांना एखादे पद गाण्याचीविनंती केली. ऐकता- ऐकता ते भावविवश झाले. भाववेशात ते नरेंद्रला म्हणाले," तुझ्या भेटीसाठी व्याकूळ होतो. तू न रुपातला नारायण आहेस. पुन: पुन्हा ते सांगत राहिले. प्रथमत: नरेंद्रला ते वेडेच वाटले. त्यानी रामकृष्णांना त्यांच्या खास ठेवणीतला प्रश्न केला,"तुम्ही देव पाहीला आहे का?" अहो आश्चर्यम्!"होय. तुझ्या इतकाच स्पष्टपणे मी इश्वर आहे. त्यांच्याशी बोललो आहे."समोरून खणखणीत स्वरात उत्तर आले. लगेच विश्वास ठेवला, तर तो नरेंद्र कसला अनेक वार तपासून-पारखून मगच त्यांनी रामकृष्णांना गुरू मानले. एकदा असेच नरेंद्र रामकृष्ण च्या खोलीत गेले रामकृष्णांनी त्यांना जवळ बसवून घेतले व डावा पाय त्यांच्या मांडीवर ठेवला. हळूहळू त्यांना बाह्यजगाचा विसर पडू लागला, आपले शरीर विरघळतेआहे,असा भास होऊ लागला. ते एकदम ओरडले,"थांबवा हे मला आई-वडिलांकडे जायचे आहे" रामकृष्ण हसले. त्यांनी पाय काढून घेतला. नरेंद्र भानावर आला. रामकृष्णांची थोरवी त्यांना पटू लागली. अक्षरपंडित नरेंद्र निरक्षर रामकृष्णांचे शिष्य झाले. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे सर्व काही नव्हे. दृश्य सृष्टीपलीकडेही काही आहे. आत्मानुभूती, आत्मभान, आत्मज्ञान,असे नरेंद्रचे ज्ञान वाढत गेले. दैवी प्रेरणेने रामकृष्ण नरेंद्रला घडवीत होते. कधी संवादातून, कधी ध्यान- धारणेतून तर कधी स्पर्शज्ञानातूनसुद्धा. तरीही नरेंद्र चे मन बंड करून उठे. अतींद्रिय अनुभव मानायला ते तयार नसत. अहं ब्रह्मस्मी. मी ब्रह्म आहे किंवा शिव आहे असे म्हणणे त्यांना हास्यास्पद वाटे. मूर्तीपूजे वरही त्यांचा रोष होता. मात्र एक उद्दिष्ट साध्यकरण्यासाठी अनेक तऱ्हेने, मार्गांनी प्रयत्न करता येतात. कोणाचा, कोणता मार्ग बरोबर हे सांगण्याचा अधिकार कोणालाच नाही. आपल्या शक्ती पलिकडचे आहे ते चूक आहे, किंवा खोटे आहे, असे मानण्याचे काहीच कारण नाही, असे रामकृष्णांचे सांगणे असे. ते मात्र नरेंद्रला पटत असे. एकदा रामकृष्ण नरेंद्रला म्हणाले,"अनेक वर्षांच्या साधनेने मला काही सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. जसे की दुसर्याच्या मनातले ओळखणे, बसल्या जागेवरून वस्तू हलवणे, त्या मी तुला देऊ का कां,?"ताबडतोब नरेंद्रने विचारले,"त्यामुळे मला ईश्वर प्रत्यक्ष दिसेल का?" रामकृष्णांनी नकारार्थी मान हलवली."तर मग मला नकोत त्या सिद्धी. मला ईश्वर बघायचा आहे. नरेंद्र उत्तरला. या दरम्यान नरेंद्र चे पितृछत्र हरपले. त्यांचे कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत आले. सावकारांचा ससेमीरा पाठी लागला. ते बी.ए.होते पण बेकार होते. नोकरीसाठी निरनिराळ्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. घरच्यांची उपासमार त्यांना बघवत नव्हती. रोजचे अन्नवस्त्र देखील त्यांना महाग झाले होते. चिरडीला येऊन एक दिवस रामकृष्णांना म्हणाले,,,"काली माता तुमचे ऐकते ना. मग तिला सांगून कमीत कमी माझ्या घरच्यांची भूकभगवा." राम कृष्ण म्हणाले,"पण तू तर तिला माहीत नाहीस. तिच्यावर तुझा विश्वास नाही. मग ती हे म्हणणे का मान्य करील? त्यापेक्षा तू तिची प्रार्थना कर. तिला शरण जा. तिच्यावर विश्वास ठेवून तुला हवे ते मागून घे." नरेंद्रने तसेच केले. एकदा नव्हे दोनदा, तीनदा अनन्य भावाने नरेंद्रने प्रार्थना केली.चिन्मयी माता मृंण्मयी झाली. नरेंद्र डोळे विस्फारून बघत राहिला. त्यांच्या वाणीतून शब्द गेले,माते मला ज्ञान दे, वैराग्य दे,"रामकृष्णांनी बजावूनदेखील जे मागायचे होते ते राहूनच गेले. तेव्हा श्री. रामकृष्ण म्हणाले,"तुझी वैखरी सत्य तेच बोलून गेली. रोजीरोटीची चिंता करणे हा तुझा मार्गच नव्हे.जा,अध्यात्ममार्गात अग्रेसर हो. तुझ्या कुटुंबाला पोटापुरते अन्न, गरजेपुरते वस्त्र मिळत राहील." गुरूच्या आशीर्वादाने त्यांना विद्यासागराच्या शाळेत शिक्षकांची नोकरी मिळाली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय झाली. नोकरी बरोबरच त्यांनी स्वतःच कायद्याचे शिक्षण घेणे सुरू केले. मात्र या घटनेनंतर नरेंद्र अंतर्बाह्य बदलून गेले. नास्तिक नरेंद्र आस्तिक झाले. ईश्वरी साक्षात्कासाठी अनुसलेला कोणताही मार्ग निषिद्ध नाही. अज्ञानी, निरक्षर माणूस सुद्धा अनन्य श्रद्धेने, पूजाअर्चेने, भक्तिभावाने ईश्वराप्रत पोचू शकतो, हे त्यांना पटले पुढे त्यांनी ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग अशी अनेक मार्ग उलगडणारी पुस्तके लिहिली. नरेंद्र भौतिक आणि आधिभौतिक दोन्ही मार्गात विचारणा करत, प्रगती पथावर चालत राहिले. दिवस पालटत गेले. काळ उलटत गेला. श्री. रामकृष्णांच्या घशाला गळू झाले. अनेक उपाय झाले. पण दिवसागणिक ते वाढतच गेले. त्यांना यातना सहन होईनात. नरेंद्रनी स्वतःला गुरु सेवेत रुजू करून घेतले. एक दिवस श्रीरामकृष्णांनी नरेंद्रला जवळ बसून स्पर्श केला. एक अनुभूत लहर नरेंद्रच्या शरीरभर पसरत गेली. काही वेळाने ते शांत झाले. गुरूंनी केवळ स्पर्शातून आपली सारी अध्यात्मिक शक्ती शिष्यात संक्रमित केली. यालाच शक्तिपात असेही संबोधिले जाते. ह्याच वेळी गुरूंनी हे सारे अध्यात्मिक ज्ञान केवळ लोककल्याणार्थ वापरण्याची आज्ञा केली होती. नरेंद्र नीही गुर्वाज्ञा यथातथ्य पाळली. वास्तविक समाधी सुख त्यांना सहज साध्य होते. तथापि देशबांधव दारिद्र्यात खितपत पडले होते. अन्न-वस्त्र-निवारा ही जनतेला दूर्लभ होता. देशाला उर्जितावस्था कशी येईल, हेच विचार नरेंद्रच्या मनात सतत घोळत. त्याकरिता त्यांनी देशभर भ्रमण करण्याचे ठरविले. त्याआधी नरेंद्रनी वराहनगरात आपल्या गुरूबंधूसोबत एक मठ स्थापन केला. तेथे वास्तव्य करून गुरुबंधूंना मठात आचारण्यांचा नित्यक्रम दिला. आणि ते तिथून बाहेर पडले. संन्याशाला कशाचाच मोहन नको.अगदी मठाचासुद्धा. प्रथमतः ते काशीला गेले.काषाय वस्त्र आणि दंडकमंडलू एवढीच पुंजीत्यांच्याजवळ असे. निष्कांचन अवस्थेत पायी फिरताना त्यांना वाटेतील सर्व तीर्थस्थानांचे दर्शन घेत. मठ- मंदिर, मशीद-चर्च काहीच त्यांना वर्ज्य नव्हते. कित्येक पंडिताशी नरेंद्र नि शास्त्रार्थ, धार्मिक चर्चा केली. प्रत्येक ठिकाणी ते विजयी झाले. हळूहळू या स्वामींचे नाव सर्वतोमुखी होऊ लागले. पुढे ते आयोध्या, आग्रा, वृंदावन आदी ठिकाणी गेले. चांभाराघरी हुक्का,पंचमाकडचे पाणी तर मातंगा कडचे भोजन त्यांनी घेतले. महाराज मंगलसिंगयांची भेट काही मुसलमान भक्तांकडेच झाली. महाराजांना मुर्तीपुजा मान्य नव्हती. स्वामीजींना त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवले असावेत. त्यांनी दिवाणाना बोलावून महाराजांच्या चित्रावर थुंकायला सांगितले. दिवांण कां-कूं करू लागले. तेव्हा स्वामीजी म्हणाले,"ही तर केवळ प्रतिमा आहे. खरे महाराज नव्हेत."दिवाण म्हणाले,"तरीही, छायाचित्रत महाराजांचाच निर्देश करते. दोघांप्रतीही आमच्या भावना सारख्याच आहेत."स्वामीजींनी एकवार महाराजांकडे पाहिले, ते म्हणाले, "मूर्ती ईश्वराचे स्मरण देते. आकारापेक्षा सरकार मूर्ती आठवणे, तिचे ध्यान करणे सोपे जाते. तो एक संकेत आहे. जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव. कोणताही मार्ग तुच्छ नाही. श्रद्धेनुसार मार्गक्रमण केली जाते. हे ऐकून महाराजांचे डोळे उघडले. त्यांनी स्वामींची क्षमा मागितली. असेच कधी कोणी पैसे दिले तर ते रेल्वेने प्रवास करीत. त्यांच्या बावळ्या- गबाळ्या वेशाची कुणाला टिंगल करावीशी वाटली तरी त्यांची धट्टी कट्टी शरीरयष्टी पाहूनच ते चूक राहत. पुढे व्याख्यानातही स्वामीजी युवकांना शरीरसंपदा कमविण्याचे सांगत. देवापुढे नाक धरून बसण्यापेक्षा मैदानी खेळ खेळा त्याने शरीर सुदृढ होते सुदृढ शरीरातच सुदृढ मन असते. केवळ आणि केवळ सुदृढ तनमन ध्येय प्राप्ती करू शकते. ईप्सित साध्य करू शकते. पुढे ते दक्षिणेत पोहोचले. मैसूर, रामनाथ ,मद्रास आताचे चेन्नई, कन्याकुमारी अशी भ्रमंती स्वामीजींनी केली. तेथील विद्वत संभा मधून त्यांनी संस्कृतातून भाषण केले. ते ऐकून म्हैसूरच्या महाराजांनी आणि दिवान शेषाद्री अय्यर यांनी स्वामीजींशी विशेष वार्तालाप केला. केल्याने तीर्थाटन, पंडित मैत्री सभेत संचार परिव्राजक अवस्थेत झाला.'शास्त्रग्रंथवीलोकंन,' त्या पूर्वी झालेले होते. त्यामुळे स्वामीजींनी सुस्पष्ट तर्कशुद्ध पद्धतीने आपले विचार मांडले. ते महाराजांना म्हणाले, भारत भटकंतीनंतर मी या निर्णयाप्रत आलो आहे. की भारतात धर्म आणि तत्त्वज्ञान उदंड आहे. पाश्चात्य देशात विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. या दोहोंचा मेळ घातल्यास सर्वांचेच उन्नती होऊ शकते. म्हणूनच वेदांच्या वेदांताच्या प्रचाररास्तव मी अमेरिकेत जाण्याचा विचार करतो आहे." महाराज स्वामीजींच्या ज्ञानाने खूपच प्रभावित झाले होते. ते तात्काळ प्रवासाकरिता आवश्यक वित्त देण्यास, सारा खर्च उचलण्यास तयार झाले. आवश्यक तेव्हा द्रव्य मगवेन असे सांगून धन्यवाद देत स्वामीजींनी त्यांचा निरोप घेतला. रामनाडचे राजे सेतुपतिदेखील खर्चाचा भार पेलण्यास राजी होते. त्यांनी गळ घातली की शिकागो येथील विश्व धर्म संमेलनास स्वामीजींनी जरूर जावे. हे विचार मनात घोळवत स्वामीजी कन्याकुमारीला पोहोचले. दक्षिण तटावर ते उभे होते. समुद्रात महाकाय लाटा उसळत होत्या. किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. तसेच स्वामीजींच्या मनातही विचारांच्या लहरीवर लहरी उठत होत्या. त्यांना भारतभूच्या शेवटच्या शिळेवर जावेसे वाटले. जवळ फुटकी कवडी नव्हती. सहाजिकच हिंदी महासागरात नौका घालण्यास नावाड्याने नकार दिला. स्वामीजींच्या मनात एक तीव्र इच्छा प्रकटली होती. नेसक्षत्या वस्त्रानिशी स्वामीजींनी आपला देह त्या अथांग सागरावर झोपून दिला. पोहोत- पोहत स्वामीजी शिळेवर पोहोचले. तिथे उभे राहून स्वामीजींनी उत्तरेकडे पाहिले. परिव्राजक अवस्थेत विचरण करीत उभा- आडवा पालथा घातलेला विशाल भारत त्यांना दिसला.इथवरच्या प्रवासातल्या अनंत आठवणींनी त्यांच्या मनात गर्दी केली. विचारांचा कल्लोळ माजला. गरिबांच्या झोपडी पासून श्रीमंताच्या मांडीपर्यंत जातीयतेचे स्तोम माजले होते. ती कोळीष्टके टाकल्याशिवाय देशाचे कल्याण होणार नाही. झोपडीत होते दारिद्र्याचे मोहोळ तर वाड्यामाड्यातल्याना पडली होती पाश्चात्याची भुरळ. वेस्ट इस द बेस्ट अशी अभिजनाची धारणा झाली होती. म्हणूनच आपल्या देशातील वेदवेदांन्त, तत्त्वज्ञान यातील विचारधन, अध्यात्मविद्या, ओपन उपनिषदांचे सार या सार्यांचा डंका पश्चिमी देशात वाजविला तर या राष्ट्रात, भारतात झोपलेल्या सुपुत्रांना जाग, तीही लवकरच, येईल असे त्यांना वाटू लागले. विचारांच्या गर्तेत खोल गेले. तब्बल तीन दिवस तीन रात्र उलटल्यावर स्वामीजी भानावर आले. मात्र आता स्वच्छ उजाडलेले होते. मनावरचे मळभ दुर झाले होते. ७२ तासाच्या चिंतन समाधीनंतर राष्ट्रोत्थानाकरिता पश्चिम दिग्विजय आवश्यक, हा निर्णय पक्का झाला. या आधी केलेल्या विचारांवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर मद्रास, हैदराबाद पुन्हा मद्रास अशा अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली. जनमानसावर त्यांचा चांगलाच प्रभाव पडत होता. अमेरिकेत जाण्याच्या विचाराला खास करून मद्रासमध्ये विशेष मान्यता मिळाली. परदेशवारीचा तयारी सुरू झाली. धनराशी गोळा होऊन लागली. आवश्यक तेवढी च रक्कम घेऊन ३१ मे १८९३ ला पश्चिम विजय याकरिता स्वामीजींनी प्रस्थान ठेवले. कोलंबो, सिंगापूर, हँग कॉग,टोकिओ करत अखेर स्वामीजी जुलैमध्ये शिकागोत पोचले. जवळच्या छोट्या शहरात बेस्टनमध्ये फिरतअसताना स्वामीजींचा एका महिलेशी परिचय झाला. स्वामीजींचा वेष गबाळ पण मुखावर अलौकिक तेज पाहून ती व्यक्ती असामान्य नव्हे हे त्या महिलेने ओळखले.ती स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेली. जॉनहेन्री स्वामीजींचे मित्र बनले. तेथे राहून स्वामीजी छोट्या-मोठ्या क्लबमधून 'भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म' या विषयावर बोलत असत. त्यांच्या मनात येई," महिलेच्या रूपात कालीमातेनेच माझी सोय केली.," तिच्याकडे असतानाच हार्वर्ड मधील ग्रीकांचे प्राध्यापक यांच्याशी ओळख झाली. स्वामीजींची भाषणे ते ऐकत असत. त्यांच्या विद्वत्तेने राईट साहेब प्रभावित झाले होते.राईट साहेबांना कळाले की स्वामीजींचे परिचय पत्र जे विश्वधर्म संमेलनाला आवश्यक होते, ते हरविले आहे. संमेलनाच्या व्यवस्थापकांना प्रा राईट यांनी स्वतः परिचय पत्र दिले. त्यात लिहिले होते, "स्वामीजी आम्हा सर्व प्राध्यापक कामापेक्षा अधिक विद्वान आहेत." ते पत्र घेऊन स्वामीजींनी पुन्हा शिकागो गाठले. स्वतःजवळ काही बाळगण्याची सांभाळण्याची सवय नसलेल्या स्वामीजींचे त्या एवढ्याशा प्रवासातही सारे सामान हरवले. परिचय पत्र काही व्यक्तींचे दिलेले पत्ते सारेच गेले. रात्र झालेली काय करावे.? निरुपायाने स्टेशन वर च्या रिकाम्या पेटीत थंडीने कुडकुडत स्वामीजींनी रात्र काढली. सकाळी उठून भुकेलेल्या स्वामीजींनी काही घरातून भिक्षा मागितली पण त्यांना अपमान सहन करावा लागला. रिकाम्या पोटी ते जवळच्या मैदानात बसून राहिले. भारत, गुरुदेव ,कालीमाता सर्व सर्व आठवत होते. पुन्हा एकदा तीच मदतीला आली. समोरच्या घराचा दरवाजा उघडला. त्यातील महिलेने पुढे येऊन चौकशी केली."आपण विश्वधर्म संमेलना करिता आलात का?"स्वामीजींनी होकार देताच तिने त्यांच्या राहण्याची व संमेलनाला नेण्याची सुद्धा व्यवस्था केली. तिचे नाव होते श्रीमती ज्वार्जहेल्स. पुन्हा एकदा मातेच्या शक्तीचा, नियतीच प्रत्यय आला. ११ सप्टेंबर१८९३ विश्व धर्म संमेलन सुरू झाले. आता हा दिवस विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा होतो.Universal Brotherhood day. स्वामीजींच्या बंधू तेच या कल्पनेने ज्या दिवशी अमेरिका रोमांचित झाली त्याच दिवशी २००१ मध्ये -twin towers-बेन टेन गों वरच्या दहशतवादी हल्ला यांनी जबरदस्त शहरली. किती हा दैवदुर्विलास असो १८९३ मध्ये विश्व संमेलनात आपापल्या धर्माचे महत्त्व सांगण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून विद्वान आले होते. मनोमन गुरुदेव रामकृष्ण परमहंस व शारदा माता नमन करून संथ पण दमदार पावलांनी ते व्यासपीठाच्या मध्यभागी आले. समोरच्या विद्वत जणांवर दृष्टी फिरवून ते म्हणाले," अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो..." आपण अकस्मात टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. थांबेचना दोन-तीन मिनिटे झाली शांतता झाल्यावर विवेकानंद बोलू लागले. आकाशात पतित तोय, यथा गच्छति सागरम्' आकाशातून पडणारा पावसाचा थेंब अनेक नद्यांमधून वाहतो. शेवटी त्या सरिता सागराला जाऊन मिळतात.' सर्वदेव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति' तसेच कोणत्याही धर्म मार्गाचे आचरण केले, परम सत्याला, ब्रह्माचा कोणत्याही नावाने संबोधले तरी त्याला केलेले वंदन एकाच शक्तीप्रत, परमेश्वरापर्यंत पोहोचते. हा हिंदुधर्माचा वैदिक धर्माचा, वैदिक धर्माचा, भारतीय धर्माचा विचार आहे. विश्वास आहे. म्हणूनच आमच्या राष्ट्राला कोणत्या धर्माचे वावडे नाही. विविध धर्माचे पालन करूनही आपण सर्व मानव या पृथ्वीतलावर राहू शकतो ही आमची श्रद्धा आहे. 'वसुधैव कुटुंबकम'विविध समुदायाच्या वैशिष्ट्यांनी वसुधा हे विश्वच आमचे कुटुंब आहे. घर आहे. अशी हिंदूंचीधारणा आहे. तुम्ही, आम्ही सर्व बंधू आहोत. समानआहोत. श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव असताच कामा नये. ही हिंदू धर्माची महती स्वामीजींनी उच्चर वात गायली. हो अगणित उदाहरणातून त्यांनी ती पटवून दिली. जमलेल्या सर्व प्रतिनिधींनी स्वामीजींची पर्यायाने हिंदू धर्माची मुक्तकंठाने स्तुती केली. वृत्त पत्रातून छायाचित्रासह त्यांचे भाषण छापले गेले. एका दिवसातच स्वामीजी विश्व विख्यात झाले. इंग्लंड होऊन वारंवार निमंत्रणे येऊ लागली. म्हणून संमेलन आणि छोटे-मोठे कार्यक्रम संपल्यावर स्वामीजी लंडनला पोहोचले. तिथेही त्यांची भाषणे गाजली. त्यांची कीर्ती उत्तरोत्तर वाढतच गेली. ाही लोक त्यांचे शिष्य बनले. भारतात येऊन स्थायिक झालेल्या भारतमातेची एकनिष्ठेने सेवा करणाऱ्या भगिनी निवेदिता म्हणजे पूर्वाश्रमीच्या लंडनवासी मार्गारेट यांच्या भाषणामुळे भारताबद्दलचे ची भारतीय बद्दलचे गैरसमज दूर झाले. प्रगतीशील अशा सार्याच राष्ट्रात भारताला गौरव होण्याचे स्थान मिळाले. भारतीय संस्कृती गौरवाविथझाली. हे सारे करीत असताना त्यांच्या स्वतःच्या योगाभ्यासात चालू होता. शिवाय ते युरोपीय संस्कृती डोळसपणे अभ्यासत होते. ख्रिस्ती धर्माचे याचे सखोल ज्ञान घेत होते. युरोपियन सच्च्या वागण्या- बोलण्याचे व्यवहाराबाबत बारकाईने निरीक्षण करीत होते. व्यापारी वृत्ती तले मर्म अभ्यासत होते. तेथील जनतेच्या प्रचंड चळवळ या वृत्तीचे प्रयत्न वादाचे थोडक्यात राजेस स्वभावाची पुरेपूर कौतुक करीत होते. भारतातील मित्रांना लिहिलेल्या पत्रातून भारताला आवश्यक गुणांचे ठोस प्रतिपादन करीत होते. हिंदू धर्माबद्दल बोलताना कधी कधी स्वामीजी मग ते लंडन असो वा शिकागो, त्यावेळच्या समाज माणसावर परखड टिप्पणी करीत. धर्मा धर्माध वृत्तीचे लोक समाजात्अशती माजवीत आहेत. प्रचार-प्रसाराची च्या नावाखाली हिंसा करीत आहेत. सुंदर वसुधरेला माणसाच्या रक्ताने स्नान घालीत आहेत. सर्वच राष्ट्रांना अधोगतीला नेत आहेत. किमान विश्वसंमेलनानंतर तरी सध्या परिस्थितीत सर्व धर्मांना सारखाच सन्मान मिळावा अशी अपेक्षा स्वामीजी बोलून दाखवीत. कधी ते विहिरीतल्या बोकडांची गोष्ट सांगून धर्मांतर वृत्ती सोडण्याचा उपदेश करीत. आणि सर्व धर्माचे संमेलन भरविले याबद्दल अमेरिकेचे आभार मनित व परस्पर सामंजस्य निर्माण करण्याच्या प्रयत्नाचे कौतुक करीत. स्वामीजी म्हणत हिंदू तत्त्वज्ञान आजच्या विज्ञान प्रयोगाशीळा अशी जवळीक दाखवते तसेच ख्रिस्ताचाकरुणा वाद, जैन बुद्धाचा अहिंसावाद-संवाद, मुस्लिमांचा निराकार निरीश्वरवाद, असे सारे- सारे धर्म पंथ उपासना मार्ग हिंदू धर्मात सामावलेले आहेत. असे जर आहे तर प्रश्न पडतो तो हा की या सर्व समावेश तिचा एवढा मजबूत, भरभक्कम पाया आहे तरी कुठे? याचे उत्तर स्वामीजींनी परिषदेत वाचलेल्या एका निबंधात दिले होते. हिंदूंना त्यांचा धर्म वेदातून मिळाला. वेद हा त्यांचा पाया आहे. जो सदैव उत्क्रांत होतो असतो. वेद अनादि- अनंत आहेत. त्यांना सुरुवात व शेवट काहीच नाही. काहींना पुस्तकाला आरंभ नाही. हे चमत्कारिक वाटेल. परंतु हिंदू साठी वेद म्हणजे. निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या विद्वत जणांनी लावलेल्या आध्यात्मिक शोधाचे उच्चतम सत्याचे संकलित केलेले विचारधन. हे पटवून देण्यासाठी स्वामीजी गुरुत्वाकर्षणाच्या शोधाचे उदाहरण देत. या शोधा पूर्वीही ते होते, आजही आहे. व मनुष्यमात्र नियम विसरला तरी पुढेही गुरुत्वाकर्षण राहणारच आहे. अशा विद्वत जणांना आम्ही हिंदू मात्र ऋषी म्हणून संबोधतो. अशा तऱ्हेने चार वर्षे झंजावाती दौर करून भारतीय संस्कृतीचा डंका स्वामीजींनी देश-विदेशातनिनादत ठेवला. वित्त राशी आवश्यक ती जमविली.ं व ते भारतात परतले. पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याच्या काळात स्वामीजी विचारांची लढाई विचारांनीच लढले. हिंदू धर्मावरील आरोपांचे सोदाहरण खंडन केले आणि 'योद्धा संन्यासी'ह्यात किर्त म्हणून झाले. विश्वविख्यात झाले करून विलायत वारी करून आल्यावर स्वामी विवेकानंदांनी खूप ठिकाणी भाषणे दिली. त्यात ते सांग," शक्तिसंपन्न व्हा, ताठ कण्याने चाला, आत्मविश्वा सानी व्यवहार करा." या गुणांच्या अभावामुळे 33कोटी आम्हा भारतीयांच्या वाट्याला मूठभर परकीयांची गुलामगिरी आली. व ती वर्षे सहन करावी लागली." हे वर्ष होते१८९७ चे. मद्रास (चेन्नई) मध्ये भारताच्या ओघात ते म्हणाले की, पुढची पन्नास वर्षे आपण सर्वांनी सर्व देवांना गळून फक्त" राष्ट्र देवो भव "हाच मंत्र जपला पाहिजे. विचार करण्याजोगी गोष्ट आहे पन्नास वर्षानंतर १९४७ मध्ये आपण स्वतंत्र झालो .अशा तऱ्हेने युरोप अमेरिकेत किती मिळविणार्या भारत मातेच्या सुपुत्रा ची संख्या वाढत होती. त्याच वेळी सामान्य हिंदूंची संख्या गेली काही शतके सातत्याने घटत होते. याबद्दल स्वामी विवेकानंद नेहमी व्यक्त करीत. ख्रिश्चन व मुस्लिम आक्रमनकामुळे हिंदू पाठविले गेले. त्यांना शुद्धीकरणाच्या मार्गाने स्वधर्मात आणले हा विचार देखील स्वामी विवेकानंदांनी मांडला. होता. भूतकाळात आपल्या गेले पाहिजे आपल्या पूर्वजांनी धर्मरक्षणासाठी लढे दिले. अहिंदू जर धुडगूस घालू लागले आपले तर मात्र आपण विजिगीषू वीरवृत्ती व्यवहारात आणायलाच हवी स्वामी विवेकानंदांची शिकवण आहे. स्वामीजींच्या गुरु बांधुनी मिळून गुरुदेवांच्या स्मरणार्थ रामकृष्ण मठाची स्थापना केली. होती, त्या कामासाठी त्यांना त्या कामासाठी त्यांना बेलूर जवळ सात एकरजागा मिळाली होती. त्यां जागेत आता स्वामीजी सर्व शिष्याचा यांचा निवास आहे. स्वामी यांच्या सांगण्यावरून त्यांच्यातले काहीजण युरोपात जाऊन हिंदू धर्माच्या प्रसाराचे कार्य करीत होते. तर काही त्यांच्या सारखेच परतले होते. या सर्वांनी त्याची संघटना पशात त्याची त्याची संघटनाशक्ती सूत्रबद्ध काम करण्याची पद्धत, वक्तार्यप्रवणता कार्यप्रवणताहे गुण जाणले होते. ते सर्व सारखेच रामकृष्णांची शिष्य होते तरीही ते स्वामी विवेकानंदांना आपले प्रमुख मानीत त्यांना सांगत मी मदत तिला आहेस. मात्र कोणीही व्यक्तीचे स्तोम माजवू नका अगदी माझे सुद्धाअर्थ बनायला हवे. दुसऱ्याच्या हितासाठी सेवेसाठी आपण देह झिजविला पाहिजे. म्हणूनच सारी युरोपिअन वैशिष्ट्ये आत्मसात करून व त्याला रामकृष्ण भक्तीचे अधिष्ठान देऊन आजही रामकृष्ण मिशन चे काम चालू आहे. भगिनी निवेदिता यांनादेखील संपूर्णपणे हिंदू संस्कृती मिळवून घेऊन महिलांसाठी पाठशाळा चालविण्यास उद्युक्त केले. महिलांसाठी मठ, विद्यालय पुज्य शारदा गुरु पत्नीच्या नावे चालतात. स्वामीजी हळूहळू निरवानिरव ई ची भाषा बोलू लागले होते. काही बंद अजूनही चुकले नव्हते काही नव्हते त्यांच्या कुटुंबातील होते त्यांच्या मातोश्री तीर्थयात्रेची इच्छा स्वामीजींनी पुरी केली. नंतर लहान-थोर साऱ्यांना एकत्र बसवून त्यांच्या मतांचा आदर करत. कुटुंबाच्या भरण-पोषणाची तसेच जमा खर्चाची तजवीज करून दिली. कुटुंबाच्या ऋणातून मुक्त झाले. आणखी एक आशिष स्वामीजींना त्रास देत होता. रामकृष्ण मठा ची जागा त्यांच्य नावे होती.मठाची सर्व कामे पाहण्यासाठी त्यांनी राम कृष्णाच्या अंतरंग शिष्याचे त्यांच्याा गुरू बंधू च्या अनुमतीने एक विश्वस्त मंडळ बनविले. या विश्वस्त मंडळाच्या नावे जागा करण्याची कागदोपत्री प्रयत्न जारी होते. अखेर एक दिवस काम झाले. एक जीवनातील शेवटचा कर्मपाश ही तुटला. गुरुदेवांनी सांगितले राष्ट्र उद्धाराचे कार्य मार्गी लागले होते. दैव बलवत्तर म्हणून कर्मकांडात अडकलेला भारतीयांना काही खडबडून जागे केले होते. काळाची दिशा ओळखा आणि राष्ट्र उन्नतीसाठी कर्मयोगाची कास धरा असा मंत्र दिला होता. अवतार कार्य संपल्यावर स्वामीजींना पुन्हा समाधीची अनुभूती घेता येईल. हेही गुरुदेव परमहंस रामकृष्णा नीसांगितले होते. तसेच घडत होते. स्वामीजी दिवस दिवस ध्यानमग्न असं कधी-कधी संध्यासमयी गंगातीरावर ते एकटेच गात बसत.'अब शिबो पार करून मेरी नैया'! आत्यंतिक करून आर्त स्वरात चे भगवान रामकृष्णांना विनवीत असंत. त्यांच्या आवाजात जबरदस्त मोहिनी होती. होते गुरुदेव सुद्धा त्यांच्या गायनावर लुप्त होते. त्या गाणं कडे व वर देखील स्वामीजींनी काही ग्रंथ लिहिले. स्वामीजींना सतत राजे महाराजांकडून निमंत्रणे येत. त्या सर्वांचा ते स्वीकार करीत. सततच्या प्रवासामुळे येणारा शीन सततच्या संभाषणामुळे यंत्रणा वर येणारा ताण यामुळे आताशा त्यांची प्रकृती खालावली होती. स्वतःची हेळसाड झाली तरी ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत. ते म्हणत या महाराजांकडे सत्ता आणि पैसा दोन्ही असते. सत्य मुळी ते अधिकाधिक लोकांपर्यंत व त्यामुळे ते अधिकाधिक लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचतात. धनसंचय यामुळे सेवका यांना सहाय्य करू शकतात. आपण फक्त गुरुदेवांची विचारसरणी त्यांच्या पर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नाला दिशा देण्याचे काम करावे. त्यात आळस नको. या निमित्ताने त्यांची पुन्हा पुन्हा भारत भ्रमंती होत असे. मध्यंतरी भगिनी निवेदिता बरोबर हिमालयाची यात्रा करून आले. प्लेगच्या साथीतस्वतःला रुग्णसेवेत गुंतवून घेतले. त्यासाठी स्वतःला रुग्णसेवक घेतले परिणाम काही काळ का होईना त्यांनी विश्रांती घेण्याचे ठरविले. त्यामुळे फक्त दौरे बंद झाले एवढेच. जिज्ञासू, श्रद्धाळू च्या प्रश्नांना उत्तरे देणे . कुतूहल शमविणने हा वागयज्ञ चालूच होता . तऱ्हेतऱ्हेच्या च्या उपासना करणाऱ्या उपासकांना ते म्हणत की कोणतेच उपास जे नित्य नाही. वर्जन आही. किंबहुना श्रीकृष्णाने उपदेश लिहिली गीता तर कुणाचीच उपासना सांगत नाही. निष्काम कर्मयोगाने मोक्षप्राप्ती होते. भगवान श्रीकृष्णांनी तर कधी दुष्ट तर कधी सृष्टी वाटतील अशी ही कर्मे केली. पण आसक्तीविनाउदाहरणार्थ युधिष्ठिराला अर्धसत्य बोलण्यास सांगणे. आणि तरीही स्वतः मात्र सत्य वचनी, करुणामयीच ठरणे. श्रीकृष्ण चरित्र असे गुंतागुंतीचे भरले आहे. यातून एकच सिद्ध होते. ते म्हणजे ने केलेले कोणतेही कर्म शुभ-अशुभ चांगले-वाईट राहत नाही. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करीत राहा. हा गीतेचा संदेश स्वामीजींनी दिला. 'स्व' पलीकडे पाहायला शिकविणारे ग्रंथ ही स्वामीजींनी अभ्यासले होते. फार पूर्वी वराहणगरात त्यावर चर्चा झडत. स्वामीजींचे म्हणणे होते की वेदान्त वेदांत ही चर्चेची नव्हे तर प्रत्यक्ष अनुभूतीची बाब आहे. श्रावण, ममनन, चिंतन, निदिध्यास यांनी ते साध्य होऊ शकते. कोण म्हणे योग हा मुक्तीचा सोपा मार्ग आहे. स्वामीजी म्हणत अरे बाबा मनाच्या संपूर्ण पावित्र्य शिवाय तो साध्य होत नाही. करीत आत्मसात कसा होतो त्याचे साधन काय स्वरात स्वामीजी सांगत. "गुरु; गुरुभक्तीशिवाय गुरुकृपेने सोपान चढताच येत नाही. गुरुदेवांच्या नुसत्या आठवणीनेही ते भावा वेशात जात. हल्लीच्या त्यांच्या प्रकृतीला तो आवेग असह्य होईल. काही का ते स्तब्ध होतो. नीरव शांतता सभोवतालचे लोक श्वासोच्छवास सही जपून करत थोड्याच वेळात स्वामी भानावर येई. त्यांच्या गुरुदेवांचे शब्द आठवत. स्वतःच्या मुक्ती पेक्षा सामान्यांना मार्ग दाखवणे त्यावर चालण्यास प्रेरणा देणे यात अधिक आनंद आहे. तेव्हा हे समाधी सुख अजून काही काळ बाजूला सारायला हवी. एक दिवस स्वामीजींनी सर्व शिष्यांना स्वहस्ते भोजन वाढले व ते प्रक्षालन केले. कालीमाते समोर ते गायले. मनचलों निकेतने गर्भगृहातच ते काही पुटपुटत असलेले एका शिष्याने ऐकले." पोटात वाली दिवसा गणित प्रकृती ढासळत होती. स्वतःच्या चितेची जागा त्यांनी शिष्यांना दाखवून ठेवली पंचांग पाहून त्यांनी महा प्रया नाचा दिवस निश्चित केला. कालिकामाता समोसे गायले गर्भगृहात असलेले या विवेकानंदाचे कार्य शकला असता. कालांतराने गुरु देवाच्या कृपेने आणखी विवेकानंद अवतर तीन थोड्यावेळाने स्वामीजी खोलीत गेले. पद्मासनात बसून जपमाळ ओढण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात त्यांनी स्वतःला कालाच्या गाढ निद्रेत अलगतत लोटले. दिवस होता. ४ जुलै १९०२. महाराष्ट्रातील जनतेचे, मराठीजनांचे महत्त्व भाग्य असे की असामान्य कर्मयोगी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी विचार केला होता. टिळकांवरील खटल्यातही स्वामीजींची मदतझाली होती. स्वामीजींच्या मृत्युनंतर त्यांच्या जीवन कार्याची महती गाणारा मृत्युलेख लोकमान्यांनी लिहिला." एकोणीसशे म्हणजे अधिभौतिक शास्त्रांचा उत्कर्षाचे उच्च स्थान मानले जाते. या शतकाच्या उत्तरार्धात हजारो वर्षांपूर्वी हिंदुस्थानात प्रचलित असलेले आध्यात्मिक शास्त्र पश्चिमेकडील विद्वानांस समजावून त्यांच्याकडून सदर शास्त्राचा अपूर्व ते बद्दल मान्यता मिळवणे आणि ज्या राष्ट्रात असे शास्त्र निर्माण झाले त्या राष्ट्रातील जनतेबद्दल सहानुभूती उत्पन्न करणे .हे काही लहान-सहान काम नव्हे. पश्चिमात्य आधिभौतिक शास्त्राचा व इंग्रजी विदेव बरोबर इतका काही झपाट्याने होत होता की तो परतवून लावण्यासाठी असामान्य धैर्याचा व बुद्धीचा पुरुष उत्कर्ष होणे आवश्यक होते. तो स्वामी विवेकानंदाच्या रुपात अवतरला होता. किती अर्थगर्भ आहे हा मजकूर अचूक शब्दात स्वामीजींच्या जीवन कार्याचा गौरव झाला. याच मृत्यू लेखात लोकमान्यांनी या गौरवाला अधिक गहिरी स्वामी विवेकानंदांना श्रद्धासुमन अर्पण करताना एक संबोधन वापरून' एकोणिसाव्या शतकातल्या शंकराचार्यांना' शतशः नमन.
- Term and Condition
- Sitemap
- Privacy policy
- Home
- English Grammar test
- Disclaimer
- Contact us
- About us
- स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी
- सामान्य ज्ञान सराव परीक्षा
- शिष्यवृत्ती सराव परीक्षा
- शारीरिक शिक्षण
- वर्ग 8 वा
- वर्ग 7 वा
- वर्ग 6 वा
- वर्ग 5 वा
- वर्ग 4 था
- वर्ग 3 रा
- वर्ग 2 रा
- वर्ग 1 ला
- योगासने
- बोधकथा ( माध्यमिक वर्गासाठी )
- बोधकथा ( प्राथमिक वर्गासाठी )
- प्रश्नमंजुषा सराव परीक्षा
- पत्रलेखन
- निबंधलेखन
- नवोदय सराव परीक्षा
- जीवन परिचय
- खेळ खेळूया
- कार्यानुभव
- कला
0 टिप्पण्या