आभार पत्र तुमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पाहुण्यांना आभार पत्र लिहा.
विद्यार्थी प्रतिनिधी
आदर्श विद्यालय
मिरज 416410
दिनांक 4 जानेवारी 2021
प्रति,माननीय श्री जोशी साहेब,
प्रमुख शिक्षणाधिकारी पुणे विभाग,
महाराष्ट्र राज्य,
पुणे 411 005.
सन्माननीय महाशय,
गेल्या महिन्यात 22 डिसेंबर 2019 रोजी आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या सोहळ्यासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीलात.याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी आपले अतिशय आभारी आहोत.
आपण अनेक महत्त्वाच्या कामात मग्न असताना ही इतक्या लांब मिरज येथे आलात आमच्यासाठी संपूर्ण एक दिवस सवड काढली आणि विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत कृतज्ञ आहोत.
आपल्या व्याख्यानातून आम्हाला शिक्षण विषयक मोलाचे विचार ऐकायला मिळाले.मोठ्या शहरातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या अध्ययनात अंतर का पडते याची मौलिक चिकित्सा करून आपण आम्हाला प्रेरणादायी मौलिक सूचना केल्या.तसेच अवांतर वाचनाचे महत्त्व ही तुम्ही आम्हाला पटवून दिले.
खरोखरच आपले मार्गदर्शन आम्हाला फार मोलाचे ठरले आहे.त्याबद्दल आम्ही आपले पुनश्च आभार मानतो.
कळावे,
आपला नम्र,
विद्यार्थी प्रतिनिधी,
आदर्श विद्यालय.
0 टिप्पण्या