अनोखी एकाग्रता


 


अनोखी एकाग्रता
पिता विश्वनाथ बाबू हे मात्र आपल्या या लाडक्या मुलाला नरेंद्र म्हणून हाक मारीत .नरेंद्रची कुशाग्र बुद्धी याचा एकपाठीपणा कोणताही विषय हा चटकन आत्मसात करण्याची त्याची क्षमता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वयाच्या सहाव्या वर्षीच नरेंद्रला शाळेत घालण्यात आले.
मात्र जेव्हा नरेंद्र आपल्या मित्रांच्या संगतीने बिघडेल की काय अशी शंका विश्वनाथ बाबांच्या मनात आली तेव्हा घरी खास शिक्षक वर्ग नेमून त्यांच्याकडून अभ्यास करवून घेतला गेला. वयाच्या सातव्या वर्षी नरेंद्रला ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शिक्षण संस्थेत दाखल करण्यात आले.स्वत विश्वनाथ बाबू यांचे इंग्रजी भाषेवर मोठे प्रभुत्व. त्यामुळेच स्वाभाविक पने त्यांना असे वाटे की नरेंद्रानेपन ही भाषा शिकावी.मात्र इंग्रजी ही तर परकीयांची भाषा आहे. ती विदेशी भाषा आहे.तर आपण भारतीयांनी ती भाषा का शिकायची. नरेंद्रला त्या भाषेची आवड नव्हती.ती भाषा आपण प्रयत्नपूर्वक शिकावे असेही त्याला वाटत नव्हते.
आपल्या भाषा आपली संस्कृती यांचा अभ्यास करण्याकडे नरेंद्रचा फार ओढा होता. माता भुवनेश्वरी देवी यांना मात्र असे वाटत होते की श्री काशिविश्वेश्वर यांच्या आशीर्वादाने प्रमाणेच उद्या जर माझा पुत्र हा जगतवंद्य व्हायचा असेल तर त्याला ती विश्व मान्य भाषा यायला नको का ? एक विदेशी भाषा म्हणून नव्हे तर जगमान्य असल्याने अवघ्या जगातल्या मानव समाज उपयोगी पडेल म्हणून. आईनेच नरेंद्रला ती भाषा शिकवली.त्या भाषेबद्दल त्यांच्या मनात प्रेम जागवले आणि त्या भाषेतही त्याला चांगले तयार केले.
नरेंद्र चा स्वभाव जिज्ञासू होता प्रत्येक गोष्ट का आणि कशासाठी हे नीट जाणून घ्यायची यावर त्यांचा विशेष भर असे.
एकदा नरेंद्रने आपल्या एका शिक्षकांना एक प्रश्न विचारला एकाग्रता म्हणजे काय ती कशी साधायची.
खरं तर हा प्रश्न नरेंद्रच्या वयाच्या मानाने फार मोठा होता. पण त्याहीपेक्षा तो विषय नीट समजावून घेण्याची त्यांची जिज्ञासा त्याहून मोठी होती.
बाळ नरेंद्र आपल्याला जी गोष्ट साध्य करून घ्यायची असेल.त्या एकाच गोष्टीकडे आपले मन लक्ष एकाग्र करायचे त्या वेळी अन्य कोणत्याही इतर गोष्टींचा थोडासुद्धा विचार मनात न आणता त्या एका ठिकाणी समर्पित भावाने एकाग्र होणे याला एकाग्रता असे म्हणतात .असे शिक्षकांनी सांगितले.
आता हा असा प्रश्न तोही एवढ्याशा वयात नरेंद्रने विचारला होता.कारण बालवयापासूनच त्याला ईश्वरचिंतन ध्यान याची विशेष आवड होती.मुलांच्या खेळण्यात ही त्यांची ही खास आवड दिसून येते.नरेंद्र आपल्या काही मित्रांना घेऊन देव देव खेळत होता.आणि हे बघा मित्रांनो आपण सारे मिळून आता या देवाचे ध्यान करू या असे म्हणून नरेंद्र त्यांना शिकवू लागला.
असं बसायचं अशी मांडणी घालायची पाठीचा कणा असाता ठेवायचा असे डोळे मिटायचे देवाचे रूप डोळ्यासमोर आणून तोंडाने त्यांची नामस्मरण करायचे हे नाम घेताना हे ध्यान करताना एकाग्र होऊन जायचे नरेंद्र असं सांगत होता आणि मित्र त्याचप्रमाणे करत होते. मित्र नरेंद्रची नक्कल करीत होते तर नरेंद्र स्वतः कधीच त्या भावात पूर्णपणे एकाग्रता पावला होता.
थोडा वेळ असाच शांततेत गेला आणि दुसर्‍या क्षणी कोपऱ्यात कसलीतरी सळसळ ऐकू आली मुलांनी कान टवकारले डोळे उघडुन समोर पाहीले तो काय एक भला मोठा साप त्या मुलांना दिसला त्याचबरोबर इतर सर्व मुले घाबरली बाहेर पडले आरडाओरडा साप साप म्हणत त्या खोलीतून बाहेर पडली.
अरे काय झालं नरेंद्रच्या आईने विचारले आई साप साप असं ओरडत मुलं निघून गेली.अरे खोलीत साप आहेत तर मग माझा नरेंद्र कुठे आहे.असं म्हणत आईने आत जाऊन पाहते तो काय त्याच्या समोरच तो सापही बापरे असं म्हणताच भुवनेश्वरी देवी च्या हातातली काठी खाली पडली. आवाज झाला आणि दुसर्‍याच क्षणी तो साप जनावर सळसळ करीत निघून गेला .असतानाही त्या बालकाची ध्यान एकाग्रता काही मोडली नाही तिथेच बसून राहिला नरेंद्र बाहेर आला तेव्हा त्यांनी समोर आईला पाहिले आणि विचारले सर्व प्रकार सांगितला तेव्हा तो मला यातलं काहीच माहित नाही.औ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या