शलभासन


 शलभासन

मूळ स्थिती : पोटावर झोपा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंना, हाताचे तळवे वरच्या दिशेला. पाय एकत्र ,चवडे ताणलेले. हनुवटी जमिनीवर टेकलेली.
एक : दोन्ही पाय एकत्र घ्या.हात मांड्या जवळ, मुठी वळलेल्या. हातांचा मागचा भाग जमिनीवर, दुमडलेली बोटी वरच्या दिशेला.हनुवटी जमिनीवर टेकवा.
दोन : दोन्ही मुठींवर जोर देत दोन्ही पाय एकत्र वर उचला.
तीन : पाय जेवढे अधिक वर घेता येतील तेवढे घेतल्यावर या स्थितीमध्ये शक्य होईल तेवढा वेळ थांबा.हनुवटी जमिनीवर टेकलेल्या स्थितीत असु द्या.
चार : दोन्ही पाय सावकाश खाली जमिनीवर घ्या.मुठी सोडा मूळ स्थिती.
हे आसन करीत असता हात आणि पाय सरळ ठेवा. पाय एकत्र ठेवा.अंतिम स्थितीमध्ये अधिक वेळ राहू नका.
फायदे
१) या आसनामुळे कमरेचे स्नायू बळकट होतात.
२) पोटाचे स्नायू बळकट होतात तसेच पोटातील अवयवांची कार्यक्षमता वाढते.भूक लागते पोट साफ होते.
३) श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या