एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ रावणाच्या लंकेतून सीतामाईला सोडवायचे होते. प्रभू रामचंद्रांच्या पुढे फार मोठा प्रश्न होता. समुद्र कसा ओलांडायचा ? समुद्रावर सेतू कसा बांधायचा ? हनुमानाच्या आदेशानुसार सगळे वानर कामाला लागले.अगदी खारींनीही आपल्या कामाचा वाटा उचलला.पाहता पाहता सेतू उभा राहिला आणि प्रभूचे इप्सित साध्य झाले. सेतू बांधण्याचे महान कार्य एकमेकांना सहाय्य करूनच पार पडले.
विना सहकार नाही उद्धार ! हे आपल्या शासनाने जाणले आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक अशक्य कामे सहकाराने पार पडली. सहकारी पतपेढ्या निघाल्या सहकारी साखर कारखाने उभे राहिले सहकारी शिक्षण संस्था निघाल्या. अशा सहकारी संस्थात कोणी एक मालक नसतो.तर सहकार्यासाठी एकत्र आलेला प्रत्येक जण येथे मालक असतो. स्वाभाविकच संस्थेविषयी कामाविषयी आपुलकी वाटू लागते.
तशी ही एकमेकांना मदत करण्याची कल्पना काही आपल्याला नवीन नाही पूर्वी खेडेगावात एखाद्याच्या घरी अडचण आली तर गावातले सर्वजण त्याच्या शेतावर राबत आणि योग्य वेळेत काम पार पाडत.
इसापनीतीतील अनेक कथांतून आपल्याला सहकार्याची शिकवण मिळते. पाण्यात पडलेली मुंगीचे प्राण कबुतराने वाचवले तर मुंगीने शिकाऱ्याच्या पायाला डसून कबुतराचे प्राण वाचवले. सिंहाने पंजात सापडलेल्या उंदराला सोडून दिले. त्याच उंदराने जाळ्यात सापडलेल्या त्या सिंहाला आपल्या दातांनी जाळे कुरतडून मुक्त केले.
आजच्या यंत्र युगातील माणूस या सर्व गोष्टी विसरला आहे. आपली कामे यंत्राने होतात आपणाला कोणाची गरज नाही असे त्याला वाटते.आजच्या मानवाची वृती अत्यंत स्वंय केंद्रित झाली आहे.आपल्या देशातील बहुजन समाज गरीब आहे. त्याच्याकडे पैशाचे बळ नाही.पण एकता साधून तो अशक्य कामे शक्य करू शकेल. मोठमोठ्या योजना कोणा एकाच्या हातून साकार होणार नाही. त्यासाठी सर्वांचा सहभाग हवा कुटुंब समाज गाव राज्य राष्ट्र याहीपुढे जाऊन काही वैश्विक समस्या सोडविण्यासाठी विविध राष्ट्रांना एकत्र यावे लागत आहे. अंतराळात नवेनवे प्रयोग करताना अंन्ट्राटीकाच्या दुर्गम प्रदेशात संशोधन करताना अनेक राष्ट्रीय एकमेकांना सहकार करतात व सहकाराचे महती अशी आहे.
0 टिप्पण्या