व्यावहारिक पत्र लेखन (विनंती पत्र)


विनंती पत्र
दहावीच्या वर्गाने तिळगुळ समारंभ आयोजित केला आहे. त्याच उपस्थित राहण्याबद्दल वर्ग प्रतिनिधी,गुरुजनांना विनंती पत्र लिहीत आहे.
अरविंद चौथे,
वर्ग प्रतिनिधी,
दहावी अ,
हुतात्मा चाफेकर विद्यालय,
गणेश खिंड,
पुणे 410038,
दिनांक 14 जानेवारी 2019.
प्रति,
माननीय गुरुवर्य
हुतात्मा चाफेकर विद्यालय,
पुणे 410038.
विषय - तिळगुळ समारंभासाठी निमंत्रण.
आदरणीय गुरुजन,
सादर नमस्कार,
आम्ही दहावी अ त्या सर्व विद्यार्थ्यांनी आज आमच्या वर्गात तिळगुळ समारंभ साजरा करण्याचे ठरविले आहे.आमचे यंदाचे वर्ष हे शाळेतील शेवटचे वर्ष आहे. म्हणून आम्ही हा समारंभ आयोजित केला आहे.
या समारंभासाठी आपण आमच्या वर्गात कृपया ठीक तीन वाजता उपस्थित राहावे. आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे.माननीय मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत.
तरी आपण आमचे निमंत्रण स्वीकारून आमचा तिळगुळ समारंभ गोड करून घेण्यास यावे. आम्ही आतुरतेने आपली वाट पाहत आहोत.
आपला नम्र विद्यार्थी,
अरविंद चौथे,
वर्ग प्रतिनिधी,
वर्ग दहावी अ.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या