लोकमान्य टिळक यांचा जीवन परिचय


 लोकमान्य टिळक

जन्म व बालपण
रत्नागिरी जिल्ह्यात, दापोली तालुक्यात चिखलगाव या गावी 23 जुलै 1856 रोजी टिळकांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर राव तर त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. पार्वतीबाई व गंगाधरपंत यांनी बाळाचे नाव केशव ठेवले; पण मुलाला हाक 'बाळ' म्हणूनच मिळाली. शाळेत नावाची नोंद बाळ गंगाधर टिळक अशीच झाली. पुढे हेच नाव रूढ झाले.
बाळाचे वडील अतिशय विद्वान होते. त्यांनी बाळाला विद्येचा छंद लागावा अशी शिकवण दिली.ते संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांच्याप्रमाणेच बाळाने ही संस्कृत भाषा आत्मसात केली. लहानपणी खेळण्या-बागडण्याच्या वयात बाळ पुस्तकात रममान होऊ लागला. विदेशी मैत्री करणे बाळाला आवडू लागले.
प्राथमिक शिक्षण
बाळ आईचा अधिक लाडका होता. पण वडिलांचे संघर्षमय जीवन पाहता आपण खूप शिकायचे ,खूप मोठे व्हायचे असे विचार बाळाच्या मनात बालपणीच खेळू लागले. टिळक यांच्या वयाच्या दहा वर्षाचा काळ वडिलांकडून शिक्षण घेण्यात गेला इ.स.1866 साली गंगाधर पंतांची बदली पुण्याला झाली. येथे बाळाचे शिक्षण 'अल्गो व्हर्णाक्युलर' या शाळेत सुरू झाले. प्राथमिक शिक्षणा वेळी बाळ टिळकांना शाळेत विद्वान शिक्षकांचा सहवास लाभला. यामुळे बुद्धीलाही उत्तम चालना मिळाली. संस्कृत व गणित विषयात तर त्यांचा हातखंडा होता. संस्कृत भाषेतील प्रसिद्ध 'बाणभट्ट' कादंबरी वाचायला मागितली .यावर गंगाधरपंत यांनी बाळाला सांगितले की 'ते काव्य वाचायला व समजायला फार कठीण आहे. ' पण बाळाने वडिलांना उत्तर दिले, 'जे कठीण तेच मला हवे आहे.' बाळ टिळकांची बुद्धिमत्ता बालवयातच मोठ्या वयाच्या मुलांप्रमाणे विकसित होती.
लग्न
एकोणिसाव्या शतकाचा काळ हा पूर्वापार चालत आलेल्या परंपरांना घेऊन चालणारा काळ होता. छत्रपती शिवाजींचा काळ आणि या नंतर पेशवाईत चालत आलेला काळ परंपरा जोपासत वाटचाल करत आला. या काळात बालवयात मुला-मुलींची लग्ने जुळवली जायची.इ.स.1871साली म्हणजे बाळाच्या वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी गंगाधर पंतांनी मुलांचे लग्न करण्याचे विचार मनात आणले. योगायोग ही फार लवकरच जुळला. दापोली तालुक्यातील मुलगी पसंत आली. सत्यभामा मुलीचे नाव होते.
वैशाख महिन्यात बाळ टिळक यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. बाळ मॅट्रिक वर्गापर्यंत जाऊन पोहोचला. त्यांचे लग्न ही आटोपुन झाले. गंगाधर पंतांना जबाबदारीतून मुक्त झाल्याचे वाटले. बाळाच्या भविष्याविषयी चिंता त्यांना दिसत नव्हती. आणि एवढेच पाहणे गंगाधर पंथांच्या भाग्यात होते. लग्नानंतर पुढील वर्षी बाळ मॅट्रिकच्या वर्गात गेला. आणि गंगाधरपंत स्वर्गवासी झाले. बाळाचा मोठा आधार गेला. बाळावर मोठे दुःख कोसळले. पण दुःखातून स्वतःला सावरुन पुढे वाटचालीला लागावे हा बाळाचा स्वभाव. हे दुःख पचवून बाळाने मॅट्रिकचा अभ्यास केला व1872 मध्ये ही परीक्षा पास सही केली.
डेक्कन कॉलेज मध्ये प्रवेश
बाळ टिळक यांचे वडील यांना म्हणायचे की," तुला खूप शिकले पाहिजे ,मोठा नामवंत झाला पाहिजे." आणि या प्रमाणेच बाळाचे विचार ठरले.इ.स.1872 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर नातेवाईकांनी बाळाला समजून द्यायचा प्रयत्न केला की," तुला आता नोकरी करायला हवी." पण बाळाने सर्वांना स्पष्ट सांगितले की," मला नोकरी करायची नाही मला खूप शिकायचे आहे."
सोळा वर्षाच्या वयातच बाळाचे विचार क्रांतिकारी स्वरूपाला आले होते. देशाची स्थिती त्याला या वयातच कळाली. इंग्रजी हे परदेशी आहेत. त्यांनी आपल्या देशातील लोकांना फसवून राज्य मिळवले.ते आपले शत्रू आहेत. असा समज या कोवळ्या वयातच त्यांचा झाला. एवढ्या समजण्याच्या पलीकडे इंग्लंड देशात काय आहे ती माहिती ही बाळाने या वयापर्यंत मिळविली होती. इंग्रज येथे यायच्या अगोदर सोन्याचा धूर या देशात निघत होता. या इंग्रजांनी ही संपत्ती लुटली व आपला भारत दरिद्री केला. इंग्लंडमध्ये लोखंड व दगडी कोळसा या शिवाय दुसरे काही मिळत नाही पण तेथे मोठी संपन्नता आहे.
अशा सर्व स्पष्ट ते मुळे इंग्रजां विषयी बाळ टिळकांच्या मनात क्लेश निर्माण झाला. आपल्या देशाला स्वतंत्र करण्याकरिता आपण कार्य करू असे विचार त्यांच्या हृदयात या कोवळ्या वयातच कोरल्या गेले.1873 मध्ये बाळ टिळक यांनी डेक्कन कॉलेजमध्ये पुढील शिक्षणाकरिता प्रवेश घेतला.
कॉलेजच्या पहिल्या वर्षी मात्र अभ्यासात अधिक लक्ष न घालता शरीरप्रकृती दणकट करण्याकडे त्यांनी अधिक लक्ष दिले. बाळाची प्रकृती बालपणापासूनच नाजूक होते शरीर हडकुळे असल्याने दुखणे सुरूच असायची. मित्र मंडळ व नातेवाईक थट्टा करत की, 'बलाढ्य इंग्रजांना देशातून हाकलून लावायचे बोलतो पण शरीर हडकुळे आहे. अशा शरीर प्रकृतीने कसा काय तुझा उद्योग साध्य होणार?'
मॅट्रिक परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सहल काढली . सहलीत गडावर चढताना बाळाला फार थकवा जाणवला .तेव्हाच त्यांनी निश्चय केला की प्रकृति दणकट करायची. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर पहिल्या वर्षी त्यांनी आपल्या निश्चयावर अंमल सुरू केला .
या प्रक्रियेत त्यांना दाजी खरे नावाचा उत्तम सोबती लाभला .दाजी खरे त्यांना कुस्ती खेळायला प्रोत्साहन देऊ लागले. सोबतच त्यांनी पाहणेही सुरू ठेवले .योग्य व्यायाम व आहार यामुळे त्यांचे शरीर मजबूत झाले.
कॉलेजमधील पहिलं वर्ष त्यांनी व्यायामाकडे लक्ष देण्यासाठी घालविले. अभ्यासाकडे लक्ष दिले नाही म्हणून या वर्षी परीक्षाही दिली नाही. दुसऱ्या वर्षापासून नियमित अभ्यास सुरू केला. कॉलेजमध्ये त्यांच्यासोबत गोपाळ गणेश आगरकर ही होते. तेव्हाच टिळकांचा व त्यांचा परिचय झाला व मैत्री जुळली. दोघांचेही निरनिराळ्या विषयावर वाद-विवाद व्हायचे.
नेहमी रात्री टिळक व सर्व मित्र मंडळ यांच्या दहा- अकरा वाजेपर्यंत गप्पा रंगात व नंतर सर्व मुले झोपी जातात. पण टिळकांचा क्रम वेगळा होता. ते रात्री 11 नंतर सकाळी चार वाजेपर्यंत अभ्यास करायचे. कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी बाळ टिळकांना लाभली होती. शिवाय लक्षपूर्वक अभ्यासाचा ध्यासही असायचा. त्यामुळे त्यांनी बी. ए. चीपरीक्षा प्रथम श्रेणीत पास केले. नंतर त्यांनी एल.एल.बी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला व नियमीत अभ्यास करून परीक्षा पास केली.
न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असता बाळ टिळकांची गोपाळ गणेश आगरकराशी जवळची मैत्री होता. ती नेहमी चर्चा करीत असायचे. एकदा चर्चेचा विषय होता आधी स्वतंत्र मिळवाव की आपला समाज सुधारावा. आगरकरांचे मत होते की, आधी समाज सुधारावा पण टिळक म्हणाले आधी स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. अशा शाळा आपण काढून कि ज्या तून देशभक्त निर्माण होतील.1873- 74 मध्ये शाळा काढण्याविषयी चर्चा झाली.व हा विषयी यांनी मजबुतीने जागृत ठेवला. विष्णुशास्त्रीसारखे तेजस्वी व्यक्तिमत्व सोबतीला असल्यामुळे लवकरच ही योजना अमलात आली. 1 जानेवारी 1880 हा तो सुवर्ण दिवस! या दिवशी शाळा सुरू करण्याचे स्वप्न साकार झाले. टिळक -आगरकर-चिपळूणकर या त्रयींची 'न्यू इंग्लिश स्कूल' ही शाळा सुरू झाली.
केसरी व मराठा
वर्तमानपत्र सुरु करायचे विचार टिळकांच्या मनात कॉलेज जीवनापासूनच होते. योग्य वेळ आता आहे असे वाटताच त्यांनी वर्तमानपत्र सुरू करण्याची योजना आखली, आगरकर जोडीला होतेच. नववर्षाच्या सुरुवातीलाच टिळकांनी 'केसरी' व 'मराठा'ची सुरुवात केली. जानेवारी 1881 पासून 'केसरी' आगरकर यांच्या लेखणीने पुण्याहून मराठीत निघू लागला. तर इंग्रजी भाषेत टिळकांनी 'मराठा' मुंबईहून सुरु केला. दोन्ही वृत्तपत्र सिंहाच्या गर्जनेने घुमू लागली .लोकांचे दुःख त्यांच्यावरील अन्याय यांना आपल्या वर्तमानपत्रात टिळकांनी स्थान दिले.
मोठी धाडसी पावले टिळक उचलू लागले .सरळ सरकारवर टीका करायची लेख लिहिणे सुरू केले .सरकारविरोधी लिहिण्याणे कसा प्रसंग ओढवेल ही पूर्ण कल्पना टिळकांना होती. पण भ्याडपणा धरून स्वतंत्र उद्योग साधतात येणार नव्हता! टिळकांनी समाज जागृतीचा कार्यक्रम वर्तमानपत्राद्वारे सुरू केला होता. यासाठी 'सरकार तुरुंगात डांबेल' ही पूर्ण कल्पना त्यांना होती. आणि घडलेही तसेच!
कोल्हापूरच्या महाराजांना इंग्रजांनी वेडेपणा चा दाखला दिला. त्यांचा अनेक प्रकारे छळ करू लागले. या कामात दिवान बर्वे इंग्रजांना मदत करीत आहेत असे पुरावे टिळक-आगरकर यांनी मिळवले व याबद्दलची माहिती आपल्या 'केसरी' व 'मराठा'त छापली दिवाण बर्वे यांनी दावा ठोकला. या केसचा निकाल 17- 7 -1882 रोजी 'केसरी' 'मराठा' च्या बाजूने लागला नाही. या केसमध्ये त्यांना चार महिने कैदेची शिक्षा झाली. मुंबईच्या येथील तुरुंगात त्यांची रवानगी झाली.
फर्ग्युसन कॉलेज
'न्यू इंग्लिश स्कूल' व दोन्ही वर्तमानपत्रांची लोकप्रियता वाढू लागली. 2 जानेवारी1885 पासून ,'फर्ग्युसन कॉलेज'ची सुरुवात त्यांनी केली.इ.स.1880 ते 1890 अशी दहा वर्ष शिक्षण क्षेत्रात रममाण राहिले. कॉलेजमध्ये ते गणित व संस्कृत हे दोन विषय शिकवत असत.
टिळकांनी देशभक्त निर्माण करण्याच्या हेतूने 'न्यू इंग्लिश स्कूल' व 'फर्ग्युसन कॉलेज' या संस्थांची स्थापना केली होती. पण मुंबईचे गव्हर्नर यांनी विद्यार्थ्यांना विचारले की,'सरकारी नोकरी करायची इच्छा आहे का'? तेव्हा मोठा वाईट प्रत्येक टिळकांना दिसून आला .खूप विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरी करण्याची इच्छा प्रकट केली. टिळकांचा ध्येयवाद मानणारे शिक्षकही आता नको म्हणून बोलू लागले. अधिक पगाराची मागणी करू लागले.
विद्यार्थी शिक्षकांच्या अशा वर्तनाने त्यांचे मन दुःखी झाले. दुखावलेल्या टिळकांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खाजगी शिकवणी घेऊन आपल्या शिकविन्यांच्या व्यासंगाला पूर्ण करावे व त्यातून थोडी आर्थिक मदतही होईल या हेतूने त्यांनी कायद्याचे वर्ग सुरू केले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
राजकारणात प्रवेश
शिक्षण संस्थांशी संबंध संपल्यामुळे मोकळा वेळ त्यांच्याकडे होता.' केसरी' व 'मराठा' या वृत्तपत्रात फायदा नसल्यामुळे यांना चालविणारे मंडळी काढता पाय घेऊ लागले. तेव्हा या पत्रावरील संपूर्ण कर्जा सह टिळकांनी ही वृत्तपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. टिळक म्हणजे एक झंजावात! गर्जना करत टिळकांनी केसरी ला चोहीकडे पसरविणले. सरकारच्या व जनतेच्या चुका धीटपणे 'केसरी'त प्रसिद्ध होऊ लागल्या .जनतेच्या पिळवणुकीचा वेदना1891 पर्यंत वाढल्या. आता जन आक्रोश भडकणार असे दिसताच थोड्याशा सुधारणा जनतेला देऊन जनाक्रोध शांत करण्याचे धूर्तपणा चे धोरण इंग्रज सरकारने अवलंबिले. टिळक कायदेमंडळाच्या निवडणुकीलाउभे राहिले व निवडून आले. येथूनच टिळकांचा राजकारणात प्रवेश झाला .पुणे नगरपालिकेचे सदस्य.मुंबई विधानसभेचे सदस्य होण्याचा मान त्यांना मिळाला. मुंबई विद्यापीठाने'फेलो' पदावर त्यांची निवड केली. काँग्रेस संघटनेत ते सक्रिय सहभाग घेऊ लागले.
सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव
टिळकांनी जनजागृतीच्या दृष्टीने गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. या उत्सवात देशभक्तांची व्याख्याने त्यांनी सुरू केली. देशभक्ती जागविणाऱ्या गाण्यांचे कार्यक्रम तरुणांनी आखले.' गणेश ही विघ्नहर्ता देवता आहे, तिचे वंदना करा' असे टिळक सांगू लागले. अख्ख्या महाराष्ट्रात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे होऊ लागले.
'केसरी' वृत्तपत्र, गणेशोत्सव या माध्यमातून जनजागृती होत असताना आणखी एक उत्सव सुरु करायचा कार्यक्रम त्यांनी आखला. शिवाजी महाराजांचा इतिहास टिळकांना मिळाला. रयतेच्या सुखासाठी जीवनभर घोडदौड करणारे महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान पोवाडे गावे असे शिवाजी महाराज महाराष्ट्रात होऊन गेले. टिळकांनी छत्रपती चा इतिहास लोकांना कळावा म्हणून पावले उचलली.
किल्ल्यावरील महाराजांची समाधी दुरुस्ती करायचा विषयी त्यांनी हाती घेतला. छत्रपतींवर नाटके, गीते ,पोवाडे गायले जाऊ लागले .हजारोंच्या झुंडी किल्ले पाहायला येऊ लागल्या. संपूर्ण हिंदुस्थानात छत्रपती चा इतिहास लोकांना कळला. तेव्हा त्यांच्यामध्ये देशाभिमान जागृत होऊ लागला. टिळकांचा हेतू साध्य झाला.
या वर्षी पुण्याला चांगला योग जुळला. काँग्रेसचे अधिवेशन पुण्याला भरले टिळकांचे कार्यक्षेत्र पुणे शहर असल्यामुळे व त्यांना सन्मानित करण्याच्यादृष्टीने 1894 मध्ये मद्रास येथे आल्फ्रेड वेड यांच्या अध्यक्षतेत भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात ठरले होते की ,पुढील अधिवेशन पुणे शहरी घेऊ. फक्त तीन वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांना हा सन्मान मिळाला होता. विविध माध्यमातून त्यांनी जनजागृती केली राष्ट्राचे नेतृत्व करायला सिद्ध होती. या अधिवेशनात शिव स्मारक उभारण्याचा आपला मानस यांनी बोलून दाखविला.
एखादा विषय हाती घेतला की, तो पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नव्हते. नवीन वर्षात शिवजयंती उत्सव रायगडावर सुरू करण्याची योजना सुद्धा टिळकांनी आखली. रायगडावर टिळकांनी एप्रिल महिन्यात शिवजयंती उत्सव धडाक्यात साजरा केला .संपूर्ण महाराष्ट्र छत्रपतीच्या गर्जनेने दुम-दुम लागला.
सक्त मजुरीची शिक्षा
इ.स.1896च्या सुरुवातीला पाऊस खुप पडला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. पुढे अजिबात पाऊस न आल्यामुळे कोरडा दुष्काळ पडला. लोकांना अन्न मिळेल असे झाले. परिणामी लोकांची भटकंती वाढू लागली. लुटालुट वाढली. सरकारला सगळे दिसत असूनही ते फक्त बघ्याची भूमिका घेऊ लागले. लोकांनी जगावे असे त्यांना वाटतच नव्हते. ख्रिस्ती मिशन-यांनी धान्याचे आमिष दाखवून लोकांना आपल्या धर्माला घ्यायचा उद्योग सुरू केला. टिळकांना देश बांधवांची ही अवस्था बघवत नव्हती. सार्वजनिक सभा घेऊन यावर त्यांनी चर्चा केली. सरकार, व्यापारी यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करायला पाहिजे याविषयी' केसरी 'लिखाण सुरु केले. शक्य झाले तिथे टिळकांनी स्वतः जाऊन दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.
दुष्काळाचे संकट ठाण मांडून होते. यातच प्लेगच्या महाभयंकर संकटाची भर पडली. प्लेग म्हणजे साक्षात मृत्यूच! सकाळी अंगात ताप भरला की संध्याकाळपर्यंत माणूस चालताहोत असे. त्याकाळी या रोगावर औषध ही नव्हते .मोठा कठीण प्रसंग होता. टिळकांनी या रोगाविषयी ची प्राचीन माहिती मिळविली. व ती 'केसरी'तून छापली. या रोगापासून वाचावे म्हणून काय करता येईल अशी सर्व माहिती या लेखात दिली. शहरात फिरून फिरून डॉक्टरांना उपाय करायला जागृत केले. नगरपालिकेला सज्ज केले. आवश्यक असेल तेथे नवी शुश्रुषा केंद्रांना उघडण्याची व्यवस्था करून लागले. वर्तमानपत्रे, सभा यांच्या जागृतीमुळे सरकारने घराघरात निर्जंतुक औषधांचा उपाय करायचा कार्यक्रम सुरू करण्याच्या नावाखाली वेगळेच प्रकार सुरू केले. गोरे सैनिक लोकांच्या घरातील मौल्यवान वस्तू पाहून लागले. स्त्रिया व मुलांना त्रास देऊ लागले. लोकांनी सैनिकाच्या अशा वागणुकी बद्दल सरकारला अर्ज केले. टिळकांनी 'केसरी'त याबद्दल कडक शब्दात लेख लिहिले. पण सरकारने यावर लक्ष दिले नाही. इकडे हिंदुस्थानी जनता धाय मोकलून रडत होती, तर सरकार आपल्या राणीच्या राज्याचा हीरक महोत्सव साजरा करण्यात गुंग होती. लोकांमधील असंतोष अधिक पसरू नये म्हणून रॅंड नावाच्या अधिकार्‍याची नियुक्ती केली. पण यापेक्षाही भयंकर निघाला. त्याने घरातील सर्वांना रुग्णालयात डांबले व सामानाची होळी केली.
22 जून 1897 रोजी पुण्याच्या गव्हर्नर साहेबांच्या बंगल्यावर मेजवानीचा कार्यक्रम होता. हिंदुस्थानातील जनता उपाशी असताना इंग्रज मस्त मौज करतात! हे महाराष्ट्रातील चाफेकर बंधूंना असह्य झाले. आपला अस्सल हिंदुस्तानी हिसका दाखवायचे त्यांनी ठरवले व कार्यक्रम आटोपताच रॅंड व आयस्र्टर या अधिकाऱ्यांना आपल्या पिस्तूल च्या गोळ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात लोळविले .हे पाहून इंग्रज संतापाने लालबुंद झाले.' इंग्रज अधिकाऱ्यांना मारले या गुलामांनी...' दडपशाहीचा कहर मांडला. इंग्रजांनी सरकारच्या धोरणाविरुद्ध केसरीमध्ये 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' अशा शब्दांत टीका केली .टिळकांच्या या टीकेमुळे इंग्रजांना संधीच मिळाली. त्यांनी 'टिळक लोकांना चिथा वतात' असा त्यांच्यावर आरोप लावला. पण टिळक केसरीत गर्जत राहिले.त्यांनी दुसरा लेख लिहिला.' राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे.'यामुळे आणखी संतापून इंग्रजांनी टिळकांना अटक करून तुरुंगात डांबणे ची तयारी केली. रॅंडच्या खुणा अगोदर 'केसरी'त टिळकांनी 'शिवाजींची कविता' छापली. यावरही सरकारने लोकांना या चित्त विण्यासंबंधीचा आरोप लावला. टिळकांच्या भाषेत भाषणात 'म्लेच्छाना' इथे राज्य करण्याचा ताम्रपट कोणी दिलेला नाही.' हे वाक्य आले होते. कवितेतील सारांश व या वाक्याचा अर्थ हा राजद्रोहाचा आहे. यामुळेच रॅंटचा खुन झाला असा आरोप टिळकांवर लावत सरकारने त्यांना अटक केली. व अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
राष्ट्रीय नेतृत्व
महाराष्ट्रातील दुष्काळ, प्लेग, रॅंडचा जुलमी पणा, टिळकांचा कारावास या सर्व बातम्या केसरीमधून सगळीकडे पसरल्या. या लेखाचा परिणाम तरुण वर्गावर झाला. त्यांच्यामधील देशाभिमान जागा झाला. टिळकांबद्दल ही त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. टिळकांना तरुण वर्ग नेतृत्व स्थानी मानू लागला. त्यामुळे टिळकांना तुरुंगात टाकले की जण जनजागृती थांबणार असे सरकारला वाटत होते. पण असे झाले नाही. हिंदुस्थानातील तरुण वर्ग टिळकांना राष्ट्र प्रमुख मानू लागला. टिळकांच्या मागे तरुण वर्गाने कणखरपणे चळवळी चालू केल्या.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर व सिंहगडावरील विश्रांतीनंतर ते सरळ मद्रास येथे भरणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला गेले. तेथून रामेश्वर ,सिलोन असा प्रवास त्यांनी केला. व तेथील स्थितीचे निरीक्षण केले. सोबतच राष्ट्र जागृतीचे कार्य ही केले. दरम्यानच्या काळात वेळेअभावी त्यांना 'केसरी' कडे लक्ष देता आले नाही. पण प्रवास आटोपल्यावर त्यांनी पुण्यात येऊन पुन्हा 'केसरी'मध्ये लिखाण सुरू केले. व्हाईसरॉय पदावर लॉर्ड कर्झन हा जुलमी अधिकारी होता. दडपशाहीच्या मार्गाने त्याची कारकीर्द चालू होती. जनतेवर अत्याचार चालूच होते. याविरुद्ध टिळक केसरी मधून लिहू लागले. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाला मान्यता मिळू लागली.
व्हाईस रॉय लॉर्ड कर्जन हा कट्टर साम्राज्यवादी होता .जनतेत राष्ट्राभिमान निर्माण होऊ नये यासाठी तो प्रयत्नशील असायचा. पण एव्हाना टिळकांच्या राष्ट्र जागृतीने चांगलाच जोर धरला होता. चळवळी थंडावल्या ऐवजी अधिक जोमाने सुरू होत्या.
आर्कटिक होम इन द वेदांत
इ.स.1890 नंतर लोकमान्य टिळकांनी 'ओरायन' हा प्राचीन काळाची माहिती देणारा लेख लिहिला होता. पण या अगोदरच्या काळाची परिस्थिती कशी होती याची माहिती देणारा ग्रंथ येरवडा तुरुंगात असताना लिहिण्याचा विचार त्यांनी केला. तुरुंगातून सुटका, सिंहगडावरील थोडी विश्रांती, प्रवास व नंतर केसरी ची जबाबदारी सांभाळल्या वर 'आर्यांचे मुळस्थान कोणते असावे' हा विषय घेऊन त्यांनी 'आर्कटिक होम इन द वेदाज' हा ग्रंथ लिहायला सुरुवात केले. इ.स.1901 पर्यंत वाचन- टिपण संपवून त्या वर्षीच्या मे-जून महिन्यात सिंहगडावर शांत वातावरणात त्यांनी या ग्रंथाला लिहून पूर्ण केले.
आपल्या लोकांना ही इंग्रजां प्रमाणेच अधिकाराच्या व वरिष्ठ च्या जागा मिळाव्यात म्हणून 1850 नंतर पुढारी मंडळांनी संघ स्थापण्यास सुरुवात केली. 1851 मध्ये डॉक्टर राजेंद्रलाल मित्र यांनी कलकत्त्याला 'ब्रिटिश इंडिया असोसिएशन.' दादाभाई नवरोजी यांनी' बॉम्बे असोसिएशन',इ. सारख्या अनेक संस्था स्थापन केल्या. जनतेवरील अन्याय याच्या बातम्या वर्तमानपत्रात वेळोवेळी प्रसिद्ध होऊ लागल्या म्हणून वर्तमानपत्रावर निर्बंध घातले. टिळकांचे विचार जहाल होते म्हणून त्यांनी जहाल गटाचे नेतृत्व केले. जहाल गटाच्या सभेत टिळकांनी जनतेला चळवळीत सहभाग करण्यावर भर दिला. या सभेला एक इंग्रज पत्रकार हजर होता. त्याने सुद्धा टिळकांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली.
सरकारच्या दडपशाही विरुद्ध 'केसरी'त "आमच्यातरुणांनी हा मार्ग पत्करला हे देशाचे दुर्दैव आहे." असा लेख लिहिला. या लेखामुळे जून महिन्यात त्यांना अटक झाली. 13 जुलैपासून इंग्रज सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला सुरू केला. टिळकांना सहा वर्षे हद्दपारीची शिक्षा सुनावली. शिक्षेची बातमी वाऱ्यासारखी पसरली लोकांना फार दुःख झाले. त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरूंगात ठेवले.
गीतारहस्य
सहा वर्षाचा काळ्यापाण्याच्या शिक्षेच्या वेळी टिळकांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. सतत सहा महिने टिळक हा ग्रंथ लिहीत होते. मंडाले येथील तुरुंगात टिळकांनी चारशे -साडेचारशे पुस्तकांचे वाचन सुद्धा केले. पाली, हिब्रू, फ्रेंच, जर्मन या भाषा येथे अवगत केल्या.8 जून 1914 रोजी सरकारने त्यांचा तुरुंगवास संपविला.
5 फेब्रुवारी 1918 पासून टिळकांनी वऱ्हाड प्रांताचे दौरा काढला.सतत सोळा दिवस त्यांच्या सभा गाजत राहिल्या. बेळगावच्या सभेत त्यांनी,' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हा महामंत्र देशातील जनतेला दिला. गावोगावी एक मंत्र लोकांच्या कानी घुमु लागला, तो म्हणजे"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच." यावरून त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येते. सततच्या धावपळीमुळे ते फार थकले होते. टिळक 12 जुलै 1920 कोर्टाच्या काम करता मुंबईला गेले असता तेथे त्यांना' निमोनिया' झाला. डॉक्टरांनी उपचाराची शर्थ केली. पण 31 जुलै 1920 रोजी रात्री टिळकांची प्राणज्योत मालवली. संपूर्ण देश शोक सागरात बुडाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या