स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी

 


प्रसाद विश्वनाथाचा

खरोखरच सारं देहभान विसरून पाहत रहावे असे ते एक आगळेवेगळे प्रभावी व्यक्तिमत्व अंगी मस्तकावर फेटा तोही भगव्या रंगाचा ,शांत प्रसन्न धीर-गंभीर प्रभावी भावमुद्रा विलक्षण तेजस्वी डोळे चेहऱ्यावर ज्ञान बुद्धी वैराग्य ह्याची आगळी वेगळीच झळाळी.
उभे राहण्याची एक खास पद्धत एक पाय थोडासा पुढे तिरकी नजर हाताची घडी असं एक भव्य-दिव्य व्यक्तिमत्व नजरेसमोर पाहिलं की कोणी भारतीय चे तत्व प्रभावित होतं माथा नतमस्तक होतो आणि त्यांच्या ओठावर एकच नाव येतं स्वामी विवेकानंद या भव्य दिव्य आणि अवघ्या विश्वाला वंदनीय असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं जन्म या भारत भूमीत झाला आहे हे माझं बाळ आहे हे सांगताना खरोखर भारतमातेला ही केवढा आनंद होत असेल. नाही का ?
भारत आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचे हिंदु धर्माचे नाव जगभर प्रसिद्ध करणाऱ्या आणि गाजवणाऱ्या या थोर सुपुत्राचा जन्म १२जानेवारी १८५३ या दिवशी कलकत्ता या शहरात श्री विश्वनाथ बाबू दत्त आणि त्यांच्या धर्मपत्नी भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी झाला.
श्री विश्वनाथ बाबू दत्त हे कलकत्ता येथील नामांकित कायदेपंडित.फारसी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे खास प्रभुत्व होते. त्यांचा स्वभाव शांत गंभीर बोलणे पण मोजकेच पण तेही सडेतोड आणि मुद्देसूद.
एक नावाजलेले वकील म्हणून त्यांचा पंचक्रोशी मध्ये लौकिक होता. परिस्थिती ने सुद्धा चांगले होते त्यांच्याकडे कामानिमित्ताने येणारी व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाचं काम ते अगदी मनापासून व प्रामाणिक पणाने करीत. सरस्वती आणि लक्ष्मी चा एक अनोखा संगम त्यांच्या जीवनात होता. विश्वनाथ बाबू दत्त यांना गोरगरीब अनाथ अपंग यांच्याबद्दल कणव होती. अशा गरजूंना ते आपल्या कमाईतील बराचसा वाटा मोठ्या आनंदाने राजीखुशीने देत असत. त्यांच्या विद्ववतेला उदारतेची साथ या ठिकाणी लाभली असावी.
त्यांच्या धर्मपत्नी पत्नी भुवनेश्वरी देवी या पण शांत, प्रसन्न, सात्वीक वृत्तीच्या अन सदाचरणी अणि देवभक्त पण होत्या. मात्र विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवी यांच्या जीवनात एक कमतरता होती ती म्हणजे त्यांना अपत्य म्हणजेच मुली होत्या. पण मुलगा नव्हता पुत्रासाठी ते दांपत्य आतुर होते.आणि म्हणूनच की काय जो जो कोणता उपाय उपवास उपासना सांगितली जाई ती मोठ्या श्रद्धेने करीत.
एकदा पुत्रासाठी दुःखीकष्टी होणाऱ्या माता भुवनेश्वरी देवी यांना पुन्हा एक वृद्ध अनुभवी अन् सश्रध्द महीलेने काशी यात्रेचा सल्ला दिला.
झालं भुवनेश्वरी देवी काशीक्षेत्री भगवान श्री काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गेल्या.तेथे नित्य गंगास्नान दर्शन मनापासून पूजा नामस्मरण इत्यादी साधना करून त्यांनी काशीविश्वेश्वला एक सुपुत्राची मागणी केली आणि....
सश्रद्ध भक्त मातेची ती रास्त मागणी भगवान आदिनाथ नाकारू शकले नाही.एके रात्री देवांनी भुवनेश्वरी देवी यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की माई जा तुझी मनोकामना पूर्ण होईल. एका जगदवंश अशा सुपुत्राची माता होण्याचे परमभाग्य तुला लाभणार आहे.
तो मंगल आशिर्वाद घेऊन भुवनेश्वरी देवी कलकत्त्यास परत आल्या ऋतू चक्र सुरुच होते एका शुभ दिनी त्यांना ती जाणीव झाली आणि त्या मोहरल्या.त्यावेळी त्यांना नेहमी ऋषीमुनी ,पवित्र गंगा नदी,सीमांवर यांची स्वप्न प्रदर्शने होऊ लागली.एका वेगळयाच अनुभुतीने त्या मनोमन मोहरू लागल्या.ह्या खेपेला त्यांना मिटल्या डोळ्यांपुढे तेजोवलये दिसू लागली.
दिसामासाने मातेच्या उदरात गर्भ वाढू लागला आणि मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर संक्रांतीच्या मंगल दिवशी भुवनेश्वरी देवी यांनी १२ जानेवारी १८५३ या दिवशी एका दिव्य बालकाला जन्म दिला.
पुत्राच्या मंगलमय आगमनानं अवघा परिवार आनंदित झाला. भगवान काशीश्वराने दिलेला स्वप्नं संकेत खरा झाला.एक चांगलासा शुभ दिवस पाहून बाळाला पाळण्यात घालण्यात आले. काशीविश्वेश्वराचा आशीर्वाद आण कृपाप्रसादाने झालेला बाळ म्हणून माता भुवनेश्वरी देवी यांनी त्यांचे नाव विरेश्वर असे ठेवले. मात्र प्रेमाने त्याला कधीकधी बिले या नावानेही हाक मारी.
विश्वनाथ बाबू हे मात्र आपल्या या पुत्राला जणू त्यांच्या भावी जीवनाचा आढावा घेऊन नराचा म्हणजेच अवघ्या मानव समाजाचा इंद्र म्हणजे देवांचा ही देव मानव म्हणून त्याला
नरेंद्र या नावानेच हाक मारीत.विरेश्वर,बिले, नरेंद्र, नरेंद्रनाथ अन् पुढे स्वामी विवेकानंद असा हा प्रवास आहे ‌.


शिवनामाचा उपाय
बिले लहानपणी दिसायला फार छान आणि गोंडस दिसायचा. त्यांच्या नटखट लीला पाहिल्या की माता पिता यांना खूप आनंद व्हायचा.
कधी दंगा कर, मस्ती कर, नको त्या उचापती कर, घरात पसारा घाल,एखादी वस्तू मुद्दाम लपवून ठेव,सर्वांची फजिती कर व टाळ्या वाजवून त्या व्यक्तीला खिजवायचे अशा अनेक बारीक-सारीक खोड्या करून बिले सर्वांनाच नको नकोसे करून सोडायचा.
त्या नटखट कृष्णकन्हैयाने नंद यशोदेला गोकुळात किती नको नको केले असेल.याचा अनुभव कलियुगात बिलेच्या खोड्यामधून येथे त्यांच्या माता-पित्यांना येत होता.
बिलेची आणखी एक गोष्ट त्यांच्या आईला खूप त्रास द्यायची.ती म्हणजे त्यांचा रागीट स्वभाव.बंर छोट्या बिलेला रागवायला,चिडायला, घरात गोंधळ घालायला,कोणतीही छोटासं कारण पुरत असे.
एकदा आई अशीच त्यांच्या खोड्या रागाला पाहून फार चिडली आणि ती त्याला मारत असतानाच.
एक साधु दारी आला त्यांनी विचारले आई असं लेकराला का मारतेय. काय करू साधुमहाराज आहो एकदा का हा पोर रागवला.चिडला संतापला म्हणजे अगदी काहीही करतो. हो किती समजून समजूत घाला याला कोणतीही गोष्ट पटत नाही खरंच याच्या या संतापाला तांडवनृत्य त्याला काय कसा आवर घालावा हेच कळत नाही.आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. देवी साधू महाराजांना होणार आहे ना त्याचा आवडता येणार आहे उपाय आहेतो बिले च्या आईने विचारले हे बघ बाई महापौर रागवला चिडला किंवा संतापला ना म्हणजे एक करत जा त्याच्या डोक्यावर शिव म्हणून थंड पाण्याची धार धरत जा .लगेच शांत होत जाईल इतका सांगून पुढे आलेली भिक्षा घेऊन तो निघून गेला.
आई त्या दिवसापासून माता भुवनेश्वरी देवी हा उपाय करू लागल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खरोखर या उपायाने पोर शांत होऊ लागला शिवाचे नाव कानी पडले की काही वेळातच इतका शांत गंभीर व्हायचा की थोड्या वेळापूर्वी त्याने घर डोक्यावर घेतले होते ही गोष्ट सांगूनही कोणाला खरी वाटायची नाही


अनोखी एकाग्रता
पिता विश्वनाथ बाबू हे मात्र आपल्या या लाडक्या मुलाला नरेंद्र म्हणून हाक मारीत .नरेंद्रची कुशाग्र बुद्धी याचा एकपाठीपणा कोणताही विषय हा चटकन आत्मसात करण्याची त्याची क्षमता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वयाच्या सहाव्या वर्षीच नरेंद्रला शाळेत घालण्यात आले.
मात्र जेव्हा नरेंद्र आपल्या मित्रांच्या संगतीने बिघडेल की काय अशी शंका विश्वनाथ बाबांच्या मनात आली तेव्हा घरी खास शिक्षक वर्ग नेमून त्यांच्याकडून अभ्यास करवून घेतला गेला. वयाच्या सातव्या वर्षी नरेंद्रला ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शिक्षण संस्थेत दाखल करण्यात आले.स्वत विश्वनाथ बाबू यांचे इंग्रजी भाषेवर मोठे प्रभुत्व. त्यामुळेच स्वाभाविक पने त्यांना असे वाटे की नरेंद्रानेपन ही भाषा शिकावी.मात्र इंग्रजी ही तर परकीयांची भाषा आहे. ती विदेशी भाषा आहे.तर आपण भारतीयांनी ती भाषा का शिकायची. नरेंद्रला त्या भाषेची आवड नव्हती.ती भाषा आपण प्रयत्नपूर्वक शिकावे असेही त्याला वाटत नव्हते.
आपल्या भाषा आपली संस्कृती यांचा अभ्यास करण्याकडे नरेंद्रचा फार ओढा होता. माता भुवनेश्वरी देवी यांना मात्र असे वाटत होते की श्री काशिविश्वेश्वर यांच्या आशीर्वादाने प्रमाणेच उद्या जर माझा पुत्र हा जगतवंद्य व्हायचा असेल तर त्याला ती विश्व मान्य भाषा यायला नको का ? एक विदेशी भाषा म्हणून नव्हे तर जगमान्य असल्याने अवघ्या जगातल्या मानव समाज उपयोगी पडेल म्हणून. आईनेच नरेंद्रला ती भाषा शिकवली.त्या भाषेबद्दल त्यांच्या मनात प्रेम जागवले आणि त्या भाषेतही त्याला चांगले तयार केले.
नरेंद्र चा स्वभाव जिज्ञासू होता प्रत्येक गोष्ट का आणि कशासाठी हे नीट जाणून घ्यायची यावर त्यांचा विशेष भर असे.
एकदा नरेंद्रने आपल्या एका शिक्षकांना एक प्रश्न विचारला एकाग्रता म्हणजे काय ती कशी साधायची.
खरं तर हा प्रश्न नरेंद्रच्या वयाच्या मानाने फार मोठा होता. पण त्याहीपेक्षा तो विषय नीट समजावून घेण्याची त्यांची जिज्ञासा त्याहून मोठी होती.
बाळ नरेंद्र आपल्याला जी गोष्ट साध्य करून घ्यायची असेल.त्या एकाच गोष्टीकडे आपले मन लक्ष एकाग्र करायचे त्या वेळी अन्य कोणत्याही इतर गोष्टींचा थोडासुद्धा विचार मनात न आणता त्या एका ठिकाणी समर्पित भावाने एकाग्र होणे याला एकाग्रता असे म्हणतात .असे शिक्षकांनी सांगितले.
आता हा असा प्रश्न तोही एवढ्याशा वयात नरेंद्रने विचारला होता.कारण बालवयापासूनच त्याला ईश्वरचिंतन ध्यान याची विशेष आवड होती.मुलांच्या खेळण्यात ही त्यांची ही खास आवड दिसून येते.नरेंद्र आपल्या काही मित्रांना घेऊन देव देव खेळत होता.आणि हे बघा मित्रांनो आपण सारे मिळून आता या देवाचे ध्यान करू या असे म्हणून नरेंद्र त्यांना शिकवू लागला.
असं बसायचं अशी मांडणी घालायची पाठीचा कणा असाता ठेवायचा असे डोळे मिटायचे देवाचे रूप डोळ्यासमोर आणून तोंडाने त्यांची नामस्मरण करायचे हे नाम घेताना हे ध्यान करताना एकाग्र होऊन जायचे नरेंद्र असं सांगत होता आणि मित्र त्याचप्रमाणे करत होते. मित्र नरेंद्रची नक्कल करीत होते तर नरेंद्र स्वतः कधीच त्या भावात पूर्णपणे एकाग्रता पावला होता.
थोडा वेळ असाच शांततेत गेला आणि दुसर्‍या क्षणी कोपऱ्यात कसलीतरी सळसळ ऐकू आली मुलांनी कान टवकारले डोळे उघडुन समोर पाहीले तो काय एक भला मोठा साप त्या मुलांना दिसला त्याचबरोबर इतर सर्व मुले घाबरली बाहेर पडले आरडाओरडा साप साप म्हणत त्या खोलीतून बाहेर पडली.
अरे काय झालं नरेंद्रच्या आईने विचारले आई साप साप असं ओरडत मुलं निघून गेली.अरे खोलीत साप आहेत तर मग माझा नरेंद्र कुठे आहे.असं म्हणत आईने आत जाऊन पाहते तो काय त्याच्या समोरच तो सापही बापरे असं म्हणताच भुवनेश्वरी देवी च्या हातातली काठी खाली पडली. आवाज झाला आणि दुसर्‍याच क्षणी तो साप जनावर सळसळ करीत निघून गेला .असतानाही त्या बालकाची ध्यान एकाग्रता काही मोडली नाही तिथेच बसून राहिला नरेंद्र बाहेर आला तेव्हा त्यांनी समोर आईला पाहिले आणि विचारले सर्व प्रकार सांगितला तेव्हा तो मला यातलं काहीच माहित नाही.

देणारे हात
जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा
या वचनाप्रमाणे साधुत्वाच्या खुणा नरेंद्रच्या अंगी अगदी बालपणापासूनच होत्या. दुखी प्राणी गोरगरीब लोकांना पाहिले की त्यांच्या हृदयातल्या माणूसकीला प्रेमाचा पाझर फुटत असे.
अशा लोकांना जी काही मदत करता येईल ती करावी त्यांच्या अश्रूंची फुले करावीत त्यांना सहकार्य द्यावे तहानलेल्यांना पाणी भुकेल्याला अन्न उघड्या नागड्या ला अंग झाकायला वस्त्र द्यावे याकडे नरेंद्र चा ओढा फार होता. आपल्या घासातला घास दुसऱ्या भुकेलेल्या घालायचा तृप्तीचा आनंद त्याच्या डोळ्यात पाहायचा हाताला येईल ती वस्तू मागचा-पुढचा कोणाचाही विचार न करता समोरच्या याचकाला देऊन टाकायची.प्रसंगी आपल्या अंगावरचे वस्त्र ही दुसऱ्याला द्यायचे ह्या अशा साधुसंतांच्या गोष्टी करण्यात नरेंद्रला नेहमीच धन्यता वाटे आनंदही वाटे.
नरेंद्रने आपल्या अंगावरचा नवाकोरा सदरा असाच कोणाला तरी असा देऊन टाकला.त्या दिवसापासून या पोराचा काही भरवसा नाही उद्या एखाद्याला घरातली एखाद्या मौल्यवान वस्तू देऊन टाकायला मागेपुढे पाहत नाही. त्यापेक्षा आपणच आता काहीतरी उपाय शोधायला हवा करायला हवा.असा विचार करून भुवनेश्वरी देवी ने नरेंद्रला मांडीवरच्याखोलीत कोंडून ठेवले.
नरेंद्र चे मन दयाळू होते त्यांचा हात देण्यासाठी नेहमीच सरळ होता समाजातील गोरगरीब दुःखी पीडित दिन दुर्बल अपंग आजारी अशा लोकांना त्यांची देणारे हात कधी कधी वस्त्र कधी पैसे तर कधी प्रेम आधार देत.दानाची वृत्ती नरेंद्रच्या मनात बालपनापासूनच सक्रीय होती.
आणि म्हणूनच की काय नरेंद्राने संन्यास घेऊन आपले सारे जीवनच या समाजकार्याला अर्पण करून टाकले एकदा छोट्या नरेंद्रला त्याच्या आईने वरच्या खोलीत कोंडून ठेवले होते ते आता रोजच होते रोजचेच होते नरेंद्र कसल्यातरी खेळात रमला होता तोच त्याच्या कानावर एक भजनाची धून आली धावत खिडकीपाशी आला त्यांनी खाली डोकावून पाहिले तर काय एक पंधरा वीस साधू वैराग्याचा जथा रस्त्याने चालला होता. बैरागी मुखाने देवाचे भजनकरीत चालले होते पण त्यांची नजर मात्र पुन्हा दारा खिडकीत माडीवर कोणी काही देणार दाता दिसतोय का म्हणून शोध घेत होती. देवाचे नाव घेत आकाशाकडे पाहणाऱ्या आणि देणार आहात शोधणाऱ्या त्या जागेला खिडकीत उभा राहून वैराग्याच्या ज्याच्याकडे पाहणारा नरेंद्र दिसला हातात येईल ते दे बैराग्यांची झोळी भर.
आशीर्वाद घे दुवा घे गरिबाला काहीतरी दे रे बाळा नरेंद्र नरेंद्र खाली बोलावले आणि आता त्या जागेला नेमकं काय द्यायचं याचा नरेंद्र विचार करू लागला कारण तिथे त्या माडीवरच्या खोलीत आपण त्या आहे त्याला काहीतरी द्यायला हवं पण काय विचार करीत असताना त्याला पलंगावर शाल दिसली.खरंतर ती त्याच्या वडिलांची होती पण क्षणाचाही विचार न करता नरेंद्रने शालीची घडी वैराग्याच्या हातात टाकून दिली .नरेंद्र चे फक्त देणारेच आहात ते त्यांना फक्त द्यायचं आणि देतच राहायचं एवढंच माहीत होतं.

भुताची भीती
रोज रात्री झोपण्यापूर्वी आईकडून एक तरी उदबोधक गोष्ट ऐकायची समजून घ्यायची हा नरेंद्रचा जवळजवळ एक अलिखित नियमच होता.
हा असा रोज बौद्धिक खुराक खाल्ल्याशिवाय नरेंद्रला चैनच पडत नसे. एके दिवशी नरेंद्रने आईला विचारले आई भीती म्हणजे काय ग ती का वाटते ? भुवनेश्वर देवींना तर असं वाटत होतं की माझा नरेंद्र हा निर्भय पराक्रमी व्हायला हवा. तर मग नरेंद्रच्या मनात भीती ची कल्पना येऊन कसं चालेल. आणि म्हणूनच त्या प्रश्नांची संधी घेऊन त्यांनी नरेंद्रला समजावून सांगितले की नरेंद्र जन्म होत असतो.
एखाद्या गोष्टीचं अज्ञान असणे म्हणजे भीती. हे बघ ज्याला पोहता येत नाही तो माणूस पाण्याला घाबरून त्याच्यापासून दूर पळतो पण ज्याला आपण पाण्यात पडल्यावर पोहायचे कसे चालवायचे कसे मारायचे पायाची हालचाल कशी करायची आपण पाण्यात पडलो तरी स्वतःला कसे वाचवू शकतो हा आत्मविश्वास त्याच्या मनात बळकट आहे तो नदीच्या पाण्यातही निर्भयपणे उडी घेतो.
माणसाला भीती वाटते ती अंधाराची. अंधार हे अज्ञानाचे प्रतिक आहे. नरेंद्र तू निर्भय होऊन कोणत्याही गोष्टीची उगाच भीती बाळगू नकोस लक्षात ठेव अज्ञानात असुरक्षितता खोट्या कल्पनाही यामुळेच भीतीही दाखवली जाते. आणि मग भित्र्या असुरक्षित म्हणाला लहानसहान गोष्टींची भीती वाटते. अज्ञान दूर केलं,कल्पना मोडून काढल्या स्वतःला सुरक्षित सतर्क सबल सक्षम बनवलं म्हणजे मग कशाची भीती.भीती ही असुरक्षिततेची भावना आहे ती दूर झाली की भीती दूर पळून जाते नाहीतर भित्यापाठी ब्रह्मराक्षस ही म्हण ठाऊक आहे ना.
हो ग हो आई मी कधीच भिनार नाही घाबरणार नाही संकटाला पाठ दाखवणार नाही. तर त्याला धैर्याने धाडसाने तोंड देईल आई देव मला तेवढी ही शक्ती तेवढे बळ देईल ना.नरेंद्रने विचारले नरेंद्र नाही हा निश्चय हे तुझे धाडस हा आत्मविश्वास असेल तुला सगळ बनवेल जा बाळा निर्भय होऊन आईचा आशीर्वाद मिळाला आणि त्या दिवशी नरेंद्रला एक वेगळ्याच आनंदात छान झोप आली.
दुसऱ्या दिवशी शाळा झाली नरेंद्र खेळायला म्हणून गेला नेहमीच्या त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन पोचतो तो काय आज एकही मित्र तिथे आला नव्हता खरं तर सगळ्या मुलांनी एकत्र जायचं चिंचेच्या झाडावर चढायचा खेळायचं दंगामस्ती करायची जमले की बारीक दगड मारून चिंचा पाडायच्या खायच्या आणि मस्त मौज करायची हा त्याचा नित्यक्रम होता.
चिंचेच्या झाडाखाली वाट पाहत उभा होता तोच नरेंद्रला दूर उभी असणारी त्यांची मित्रांची टोळी दिसली नरेंद्रने हात केला हाका मारल्या त्यांच्या काही करून आपल्याकडे बोलवीत होती. अखेर नरेंद्र त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले अरे काय झालं तुम्ही सारे असे दूर उभे का चला ना त्याची चिंचेवर चढू या खेळूया. राम राम राम नको रे बाबा अरे त्या चिंचेच्या झाडावर एक भूत आहे म्हणे. एक भित्रा आवाज काय चिंचेच्या झाडावर भूत कसं काय काल परवापर्यंत तर तिथे काहीच नव्हतं अचानक एका क्षणी हे कुठून आलं तुम्हाला भूत दिसलं का तुमच्यापैकी कुणी त्या भुताला पाहिले का मित्रांना निर्भय खंबीरपणे विचारत होता.नरेंद्र अरे तुला वेड लागलेलं नाही ना अरे त्या आजोबांनी सांगितले की त्या चिंचेच्या झाडावर भूत आहे.जो कोणी त्या झाडावर चढेल त्यांना भूत धरणार पकडणार एक मित्राने ही माहिती दिली आणि दुसर्‍या क्षणी त्या चिंचेच्या झाडाच्या मालकाची ती युक्ती नरेंद्रच्या लक्षात आली. ही मुलं दर शनिवारी रविवारी दुपारी इथे येतात दंगामस्ती आरडाओरडा करतात म्हणून. मुलांच्या मनात असणाऱ्या भूता यांच्या भीतीचा फायदा घेत या मालकाने काढली काढलेली ती एक युक्ती आहे. हे चाणाक्ष नरेंद्रच्या चटकन लक्षात आले.
मुलांच्या मनातली भुताची भीती दूर करण्यासाठी तो म्हणाला अरे मित्रांनो त्या झाडावर भूत वगैरे काही नाही घाबरू नका मी आहे तुमच्या बरोबर नरेंद्रने त्यांना आधार देण्याचा त्यांना निर्भय बनवण्याचा प्रयत्न केला खरा पण या कल्पनेनेच भूत त्यांच्या मनावर इतका घट्ट बसलो होतो की कोणी पुढे येईना तेव्हा नरेंद्र म्हणाला थांबा तुम्ही नका येऊ कोणी मीच जातो झाडावर चढतो.बघू मला कोणती भूत काय करते.आणि असं नुसतं बोलून नरेंद्र थांबला नाही तो सरळ धावत गेला झाडावर चढला बापरे.आता ते भूत नरेंद्रला धरणार मारणार खाणार ह्या भीतीने कित्येकांनी तर डोळे मिटून घेतले. कोणी रामराम म्हणत किलकिल्या नजरेने नरेंद्र कडे पाहीले. तो काय नरेंद्र चांगल्या झाडावर चढला होता फांद्यांना लोंबकळत होता खेळत होता.छान गाणी म्हणत होता.त्याला भुताने भीती दाखवली नाही. भुताने पकडले नाही. तो चांगला मजेत होता खुशीत होता उलट तोच घाबरू नका कोणी नाही असं पटवून देत होता.
खरोखरच नरेंद्रला काही होत नाही हे लक्षात आल्यावर मुलांच्या मनातली भुताची भीती हळूहळू दूर झाली.एक-दोन-तीन असे करत करत सगळ्या सगळी मुले जमा झाली आणि निर्भय होऊन आनंदाने नाचू खेळू लागली मुलांचा दंगा वाढला झाडाच्या मालकाने मात्र आपली युक्ती फसली म्हणून कपाळाला हात लावला ही गोष्ट जेव्हा आई आली तेव्हा स्वतः नरेंद्र मनात भीतीचे भूत दूर करून त्यांनाही निर्भय केले या गोष्टीचा आईला अभिमान वाटला.

चूक माझीच आहे
मुलांनो आपले पालक आपल्याला अनेक वेळा असं सांगतात की कोणतेही एक काम नीट कर उगाच या ठिकाणी लक्ष देऊ नकोस तसं करशील तर काहीच नीट जमणार नाही.पण काही मुलं माणसं जशी पण असतात की जी एका वेळी अनेक गोष्टीकडे तेवढ्याच क्षमतेने अवधान देऊ शकतात.
नरेंद्रचं पण तसच होतं. तोंडाने जरी बोलत असला तरी तिकडे दुसरा काय सांगतोय याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असायचं. एकदा वर्गात असं झालं एक तास संपला दुसरा तासाच्या गुरुजींना वर्गात यायला वेळ लागला. त्या वेळातच नरेंद्र मुलांना काहीतरी गोष्ट सांगू लागला. बरे नरेंद्रची निवेदन शैली इतकी सुंदर प्रभावी होती की ती ऐकणारा भाव विसरून जात असे त्यावेळी पण तसंच झालं वर्गातली मुलं नरेंद्र काय सांगतो याकडे लक्ष देऊन ऐकत होती.तिकडे शिक्षक वर्गावर आले त्यांनी आजचा विषय फळ्यावर लिहिला त्यांनी मागे वळून पाहिले तो काय कोणतेही मुलांचं वर्गात नीट लक्ष नव्हतं नरेंद्र काय सांगतोय हे ऐकण्यात गर्क होता. इतकंच नव्हे तर मुलांची चक्क फळ्याकडे पाठ होती.
त्यांना गुरुजी वर्गावर आले.त्यांनी आल्यावर आजचा विषय लिहिला आहे.याची काहीच कल्पना नव्हती.त्यामुळे गुरुजी रागवले त्यांनी जवळ जाऊन मी काय सांगत होतो काय शिकवत होतो असं विचारलं पण एकाच ही नीट लक्ष नसल्याने कोणी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही.शेवटी जेव्हा नरेंद्रची पाळी आली त्यांनी त्याला तोच प्रश्न विचारणार तेव्हा नरेंद्र शांतपणे म्हणाला गुरुजी तुम्ही वर्गावर येऊन पाच मिनिटे झाली तुम्ही आज कविता शिकवणार आहात त्या कवितेचे नाव आहे.तुम्ही त्या फळ्यावर लिहिले आहे.
नरेंद्रच्या या उत्तराचे गुरुजीं सह सर्व वर्गातल्या मुलांना आश्चर्य वाटले सगळा वर्ग नरेंद्र बोलत होता ते ऐकण्यात गर्क होते नरेंद्र सोडला तर कुणालाच उत्तर देता आलं नव्हतं गुरुजींनी छान असं लक्ष हवं वर्गात असे म्हणत नरेंद्रला खाली बसवायला सांगितले बाकीच्या सर्व वर्गाला बाकावर उभे राहायची शिक्षा दिली गुरुजींनी मागे वळून पाहिले तो काय नरेंद्र सर्वांबरोबर उभा अरे नरेंद्र तू उत्तर बरोबर दिलं मग तू काय शिक्षा घेतो तेव्हा नरेंद्र शांतपणे म्हणाला गुरुजी चूक माझी आहे.मी गोष्ट सांगत होतो मुले ते ऐकत होती म्हणून त्यांचे दुर्लक्ष झाले शिक्षा मला व्हायला हवी नरेंद्रचा हा प्रामाणिकपणा सर्वांनाच अतिशय आवडला.                         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या