जंगल तोड एक समस्या निसर्गाचे चिकित्सक अभ्यासक सांगतात की मुंगीपासून गरुडा पर्यंत सर्व मानवेतर प्राणी धरतीची प्रकृती सांभाळून आपली जीवन यात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची कार्यशक्ती निसर्गाला शाप ठरले आहे.जंगलात लागणाऱ्या वनवा ही एक नैसर्गिक आपत्ती आहे.
माणसांनी जास्तीत जास्त जंगल संपत्ती नष्ट केली आहे. जंगले तोडून माणसाने नगरे वसवली. वनक्षेत्रच कमी झाल्यामुळे मातीची धूप व क्षाराचे प्रमाण वाढले आहे. अधिकाधिक भूप्रदेश वसाहत ओसाड बनले आहेत. पर्जन्याचे प्रमाण कमी झाले आहे .पर्यावरण संतुलनाची समस्या निर्माण झाली आहे.
लाकडाचा उपयोग कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जातो.यासाठीही अनेक जंगले तोडली जातात जंगल तोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे वन उत्पादनामध्ये लाख डिंक औषधी वनस्पती मध मोह विविध प्रकारचे गवत रेशीम वेत बांबू इत्यादी असंख्य वस्तूंचा समावेश होतो.वनातील वृक्षावरील एक प्रकारच्या किड्या पासून लाख मिळते. बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधासाठी उपयोगी असते. शेतकऱ्यांची अवजारे क्रीडा साहित्य काडीपेटीतील काड्या यासाठीही जंगलतोड होते.जंगलनाशाबरोबर जंगलातील प्राणी पक्षी कमी होत आहेत. वाघ व मोर यांची हौसेखातर प्रचंड हत्या होते. हे थांबवायला हवे आहे.वृक्ष संरक्षण कायदा 1985 मध्ये केला गेला आहे पण सर्व गोष्टी केवळ कायद्याने होत नाहीत.त्यासाठी सर्वसामान्य जनतेची त्याला हार्दिक व विधायक सहकार्य हवे. जंगले नष्ट झाली की तेथील आदिवासींचे ही प्रश्न उभे राहतात मेळघाट प्रकल्प सारख्या अनेक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत.आणि वनाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे नाहीतर पुढील काळात एखाद्या भल्यामोठ्या ओसाड जागेवर पाटी लावावी लागेल येथे पुर्वी जंगल होते.
0 टिप्पण्या