चूक माझीच आहे


 


चूक माझीच आहे
मुलांनो आपले पालक आपल्याला अनेक वेळा असं सांगतात की कोणतेही एक काम नीट कर उगाच या ठिकाणी लक्ष देऊ नकोस तसं करशील तर काहीच नीट जमणार नाही.पण काही मुलं माणसं जशी पण असतात की जी एका वेळी अनेक गोष्टीकडे तेवढ्याच क्षमतेने अवधान देऊ शकतात.
नरेंद्रचं पण तसच होतं. तोंडाने जरी बोलत असला तरी तिकडे दुसरा काय सांगतोय याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असायचं. एकदा वर्गात असं झालं एक तास संपला दुसरा तासाच्या गुरुजींना वर्गात यायला वेळ लागला. त्या वेळातच नरेंद्र मुलांना काहीतरी गोष्ट सांगू लागला. बरे नरेंद्रची निवेदन शैली इतकी सुंदर प्रभावी होती की ती ऐकणारा भाव विसरून जात असे त्यावेळी पण तसंच झालं वर्गातली मुलं नरेंद्र काय सांगतो याकडे लक्ष देऊन ऐकत होती.तिकडे शिक्षक वर्गावर आले त्यांनी आजचा विषय फळ्यावर लिहिला त्यांनी मागे वळून पाहिले तो काय कोणतेही मुलांचं वर्गात नीट लक्ष नव्हतं नरेंद्र काय सांगतोय हे ऐकण्यात गर्क होता. इतकंच नव्हे तर मुलांची चक्क फळ्याकडे पाठ होती.
त्यांना गुरुजी वर्गावर आले.त्यांनी आल्यावर आजचा विषय लिहिला आहे.याची काहीच कल्पना नव्हती.त्यामुळे गुरुजी रागवले त्यांनी जवळ जाऊन मी काय सांगत होतो काय शिकवत होतो असं विचारलं पण एकाच ही नीट लक्ष नसल्याने कोणी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही.शेवटी जेव्हा नरेंद्रची पाळी आली त्यांनी त्याला तोच प्रश्न विचारणार तेव्हा नरेंद्र शांतपणे म्हणाला गुरुजी तुम्ही वर्गावर येऊन पाच मिनिटे झाली तुम्ही आज कविता शिकवणार आहात त्या कवितेचे नाव आहे.तुम्ही त्या फळ्यावर लिहिले आहे.
नरेंद्रच्या या उत्तराचे गुरुजीं सह सर्व वर्गातल्या मुलांना आश्चर्य वाटले सगळा वर्ग नरेंद्र बोलत होता ते ऐकण्यात गर्क होते नरेंद्र सोडला तर कुणालाच उत्तर देता आलं नव्हतं गुरुजींनी छान असं लक्ष हवं वर्गात असे म्हणत नरेंद्रला खाली बसवायला सांगितले बाकीच्या सर्व वर्गाला बाकावर उभे राहायची शिक्षा दिली गुरुजींनी मागे वळून पाहिले तो काय नरेंद्र सर्वांबरोबर उभा अरे नरेंद्र तू उत्तर बरोबर दिलं मग तू काय शिक्षा घेतो तेव्हा नरेंद्र शांतपणे म्हणाला गुरुजी चूक माझी आहे.मी गोष्ट सांगत होतो मुले ते ऐकत होती म्हणून त्यांचे दुर्लक्ष झाले शिक्षा मला व्हायला हवी नरेंद्रचा हा प्रामाणिकपणा सर्वांनाच अतिशय आवडला.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या