व्यावहारिक पत्र लेखन (चौकशी पत्र)

 


चौकशी पत्र 

अजय जगदाळे,मुक्काम पोस्ट कोराळे बुद्रुक,जिल्हा नाशिक येथून व्यवस्थापक शारदानगर मालेगाव जिल्हा नाशिक यांना पत्र लिहून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी वसतिगृह निवासव्यवस्था होण्या बाबत चौकशी करणारे पत्र लिहित आहे.
अजय जगदाळे,
जगदाळे वाडा, कोराळे बुद्रुक,
पुणे 412203,
दिनांक 15 जून 2019
प्रति,
माननीय व्यवस्थापक,


करन वसतिगृह, शारदानगर,
विद्यानगरी मालेगाव 423203.
विषय - पुढील शिक्षणाकरिता वसतिगृहात निवास व्यवस्था होण्यासाठी.
सन्माननीय महाशय,
मी अजय जगदाळे कोराळे बुद्रुक येथे राहतो. यंदा मी येथील आदर्श विद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा 87 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण केली आहे. या शाळेत मी पहिला आलो आहे.
आमच्या खेडेगावातील या शाळेत यापूर्वी कोणालाच ऐवढे उत्तम गुण मिळाले नव्हते.शालान्त परीक्षा उत्तीर्ण होणारा गावातील मी पहिलाच मुलगा आहे. सर्व गावकऱ्यांचे मला पुढील शिक्षणासाठी सर्व परी मदत देण्याचे ठरवले आहे.
पण आमच्या गावात तर महाविद्यालय नाही म्हणून मला पुढील शिक्षण घ्यायचे म्हणजे मालेगावात यावे लागणार. यासाठी मी वेणूताई चव्हाण महाविद्यालयात शास्त्र विभागात प्रवेश द्यायचे ठरवले आहे.
मालेगाव येथे माझी राहण्याची काही व्यवस्था नाही.ती व्यवस्था झाली नाही तर मी महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकणार नाही. सर करन वसतिगृहात माझी राहण्याची व्यवस्था होऊ शकेल का ? त्यासाठी मला आगाऊ किती रक्कम भरावी लागेल ? मासिक फी किती भरावी लागेल ? कृपया मला ही माहिती या माझ्या वरील पत्त्यावर त्वरीत कळवू शकता का ? त्यावरच माझ्या पुढील शिक्षण अवलंबून आहे.
कृपया पत्राचे उत्तर त्वरित पाठवावे. मालेगावात प्रत्यक्ष येऊन चौकशी करणे मला शक्य नाही.तेवढा खर्च मला परवडणारा नाही.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला कृपाभिलाषी 
अजय जगदाळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या