अर्ध पद्मासन


 अर्ध पद्मासन 

मूळ स्थिती : जमिनीवर बसा.पाय समोर, ताठ व जुळलेले.हात शरीराजवळ ताठ.तळवे जमिनीवर.
एक : डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्या. आणि पाऊल उजव्या मांडीखाली ठेवा.
दोन : उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्या आणि पाऊल डाव्या मांडीवर ठेवा.अशा प्रकारे सहज मांडी घाला.पाठ ताठ ठेवा.
तीन : अंगठा व तर्जनी एकमेकांना लावून,उरलेली तीन बोटे सरळ ठेवून,तळहात वर करून हात सहजपणे गुडघ्यावर ठेवा.
चार : डोळे बंद करून ध्यानस्थ बसा. पाठ ताठ ठेवा.
पाच : थोड्या वेळाने सावकाश डोळे उघडा.
सहा : हात बाजुला घ्या.शरीरालगत जमिनीवर टेकवा.
सात : उजवा पाय सरळ करीत पुढे घ्या.
आठ : डावा पाय सरळ करीत पुढे घ्या.मूळ स्थिती.
फायदे :
१) छाती रुंद होते.
२) श्वसनक्रिया सुधारते.
३) पाठीचा कणा सुस्थितीत राहतो.
४)मांड्यांच्या स्नायूंना ताण मिळतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या