क्षमा पत्र वर्गातील वस्तूंची मोडतोड केल्याबद्दल क्षमेची याचना करणारा विनंती अर्ज सर्व वर्गातर्फे दहावीतील वर्गप्रमुख मुख्याध्यापकांना लिहीत आहे.
देवेंद्र चिटणीस
वर्गप्रमुख दहावी अ,
डी एस प्रशाला,
वांद्रे मुंबई 400051,
दिनांक 10-10-2019,
प्रति,माननीय मुख्याध्यापक,
डी एस प्रशाला,
वांद्री मुंबई 400063.
विषय - झालेल्या चुकीबद्दल माफी मागण्यासाठी.
आदरणीय पूज्य गुरुवर्य,
सादर नमस्कार,
मी देवेंद्र चिटणीस इयत्ता दहावी चा वर्गप्रमुख सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने हे क्षमा पत्र लिहीत आहे.
परवा आठ तारखेला आमचा वर्ग प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी गेला असताना तास संपता संपता वर्गातील काही मुलांनी दंगा सुरू केला एक दोन विद्यार्थी वगळता सर्वांनीच मस्ती सुरू केली. त्यामुळे प्रयोगशाळेत बरेच नुकसान झाले. आज या गोष्टीचे फार वाईट वाटते.याबद्दलची शिक्षा म्हणून आमच्या पालकांना हे सांगून तुम्ही त्यांच्याकडून आम्हाला शासन करवले आमच्यापैकी कोणाचाही पालकांनी आमच्या वर्तनाचे समर्थन केले नाही. त्याबद्दल आम्हाला काही ना काही शासन झालेच आम्हाला आमची चूक उमगली आहे. पुन्हा केव्हाही आमच्या हातून असे गैरवर्तन होणार नाही. अशी सर्व वर्गाच्या वतीने मी हमी देतो सर.
आम्ही केलेले नुकसान मोठे आहे.त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही आमच्या वैयक्तिक खर्चातून काटकसर करून काही रक्कम जमा केली आहे ही एक हजार रुपयांची रक्कम सोबत देत आहोत. हे आमच्या चुकांची शालन निश्चितच नाही पण यातून प्रयोग शाळेतील काही वस्तू घेता येतील. आमच्या इतर शालेय बंधूंचे नुकसान होऊ नये हाच उद्देश आहे.
पुन्हा एकदा सर्व वर्ग बंधू च्या वतीने आपली क्षमा मागतो.
आपला नम्र, विद्यार्थ,
देवेंद्र चिटणीस,
वर्गप्रमुख
0 टिप्पण्या