व्यावहारिक पत्र लेखन (गौरव पत्र)


 गौरव पत्र

सुनील जोशी१२३५/२ लिली कॉर्टरडेक्कन जिमखाना पुणे येथून त्यांच्या शाळेतील स्काऊट शिक्षक श्री प्र.शि.माने यांना त्यांनी शाळेतील स्काऊट पथकाला पंतप्रधान ढाल मिळवून दिल्याबद्दल त्यांचा गौरव करणारे पत्र लिहीत आहे.
सुनील जोशी,
माजी विद्यार्थी,
आदर्श विद्यालय,
१२३५/२ लेले कॉटर्स,
डेक्कन जिमखाना,
पुणे 411004 ,
दिनांक 10-2-2019.
प्रति,
माननीय श्री प्र.शि.माने,


आदर्श विद्यालय,डेक्कन जिमखाना,
पुणे 411004.
विषय- स्काऊट पथकाला मिळालेल्या पंतप्रधान ढाली बद्दल अभिनंदन.
आदरणीय गुरुवर्य,
सादर नमस्कार.
आजच्या वृत्तपत्रात आपल्या शाळेतील म्हणजे आदर्श विद्यालयातील स्काऊट पथकाला पंतप्रधान ढाल मिळाल्याचे वृत्त वाचले आणि आनंद झाला. त्या निमित्ताने आपले अभिनंदन करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.
सर मी पण आपला विद्यार्थी आहे.आणि आपल्या स्काऊट पथकातही मी होतो.अगदी पाचवीपासून आठवी पर्यंत आम्ही बालवीर पथकाचे नियमितपणे शिक्षण घेतले. त्याचा फायदा मला पुढे एनसीसी आणि नंतरच्या जीवनातही नक्कीच झाला. त्यावेळी लागलेल्या चांगल्या सवयी आजही उपयोगी पडतात.
आपल्या शाळेला मिळालेल्या पंतप्रधान ढालीचे संपूर्ण श्रेय आपल्या कडे जाते. या पथकातील सर्व बाल चमूचे अभिनंदन.या पथकाचा गौरव समारंभ जेव्हा शाळेत साजरा होईल तेव्हा मी निश्चितच उपस्थित राहील. पुन्हा एकदा आपले व आपल्या शाळेचे अभिनंदन करून पत्र पूर्ण करतो.
आपला नम्र विद्यार्थी,
सुनील जोशी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या