धनुरासन


 धनुरासन

मूळ स्थिती : पोटावर झोपा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंना. हाताचे तळवे वरच्या दिशेला.पाय एकत्र चवडे ताणलेले. हनुवटी जमिनीवर टेकलेली.
एक : गुडघ्यातून पाय मागे दुमडून नितंबा जवळ आणा. दोन्ही हातांनी पाय घोट्याजवळ घट्ट पकडा.दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडे अंतर असावे.
दोन : पाठीचा कणा व धड शिथील ठेवून पाय सावकाश मागे ताना. पाय हातांनी घट्ट पकडले असल्याने हातापायात निर्माण होऊन मस्तक,छाती, गुडघे ,मांड्या आदी अवयव वर उचलले जातील.
तीन : पायावरील पकड जास्तीत जास्त वर नव्या. गुडघे ,घोटे जवळ आणा. त्यामुळे छातीचा खालचा भाग आणि मांड्यांचा जागेपर्यंतचा भाग वर जाईल. यावेळी शरीराचा सर्व भार नाभी भोवतालच्या पोटावरील भागावर पडेल.हीच धनुरासनाची अंतिम स्थिती होय.उलट क्रमाने आसन सोडा.
फायदे
१) पाठीचा कणा लवचिक बनतो.
२) बरगड्यांची स्नायू ताणले जाऊन श्वसन क्रिया सुधारते.
३) संबंध शरीराचा भार पोटावर पडल्याने पोटावरील चरबी कमी होते.
४) छाती पोट यांचे विकार बरे होतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या