भुताची भीती


 


भुताची भीती
रोज रात्री झोपण्यापूर्वी आईकडून एक तरी उदबोधक गोष्ट ऐकायची समजून घ्यायची हा नरेंद्रचा जवळजवळ एक अलिखित नियमच होता.
हा असा रोज बौद्धिक खुराक खाल्ल्याशिवाय नरेंद्रला चैनच पडत नसे. एके दिवशी नरेंद्रने आईला विचारले आई भीती म्हणजे काय ग ती का वाटते ? भुवनेश्वर देवींना तर असं वाटत होतं की माझा नरेंद्र हा निर्भय पराक्रमी व्हायला हवा. तर मग नरेंद्रच्या मनात भीती ची कल्पना येऊन कसं चालेल. आणि म्हणूनच त्या प्रश्नांची संधी घेऊन त्यांनी नरेंद्रला समजावून सांगितले की नरेंद्र जन्म होत असतो.
एखाद्या गोष्टीचं अज्ञान असणे म्हणजे भीती. हे बघ ज्याला पोहता येत नाही तो माणूस पाण्याला घाबरून त्याच्यापासून दूर पळतो पण ज्याला आपण पाण्यात पडल्यावर पोहायचे कसे चालवायचे कसे मारायचे पायाची हालचाल कशी करायची आपण पाण्यात पडलो तरी स्वतःला कसे वाचवू शकतो हा आत्मविश्वास त्याच्या मनात बळकट आहे तो नदीच्या पाण्यातही निर्भयपणे उडी घेतो.
माणसाला भीती वाटते ती अंधाराची. अंधार हे अज्ञानाचे प्रतिक आहे. नरेंद्र तू निर्भय होऊन कोणत्याही गोष्टीची उगाच भीती बाळगू नकोस लक्षात ठेव अज्ञानात असुरक्षितता खोट्या कल्पनाही यामुळेच भीतीही दाखवली जाते. आणि मग भित्र्या असुरक्षित म्हणाला लहानसहान गोष्टींची भीती वाटते. अज्ञान दूर केलं,कल्पना मोडून काढल्या स्वतःला सुरक्षित सतर्क सबल सक्षम बनवलं म्हणजे मग कशाची भीती.भीती ही असुरक्षिततेची भावना आहे ती दूर झाली की भीती दूर पळून जाते नाहीतर भित्यापाठी ब्रह्मराक्षस ही म्हण ठाऊक आहे ना.
हो ग हो आई मी कधीच भिनार नाही घाबरणार नाही संकटाला पाठ दाखवणार नाही. तर त्याला धैर्याने धाडसाने तोंड देईल आई देव मला तेवढी ही शक्ती तेवढे बळ देईल ना.नरेंद्रने विचारले नरेंद्र नाही हा निश्चय हे तुझे धाडस हा आत्मविश्वास असेल तुला सगळ बनवेल जा बाळा निर्भय होऊन आईचा आशीर्वाद मिळाला आणि त्या दिवशी नरेंद्रला एक वेगळ्याच आनंदात छान झोप आली.
दुसऱ्या दिवशी शाळा झाली नरेंद्र खेळायला म्हणून गेला नेहमीच्या त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन पोचतो तो काय आज एकही मित्र तिथे आला नव्हता खरं तर सगळ्या मुलांनी एकत्र जायचं चिंचेच्या झाडावर चढायचा खेळायचं दंगामस्ती करायची जमले की बारीक दगड मारून चिंचा पाडायच्या खायच्या आणि मस्त मौज करायची हा त्याचा नित्यक्रम होता.
चिंचेच्या झाडाखाली वाट पाहत उभा होता तोच नरेंद्रला दूर उभी असणारी त्यांची मित्रांची टोळी दिसली नरेंद्रने हात केला हाका मारल्या त्यांच्या काही करून आपल्याकडे बोलवीत होती. अखेर नरेंद्र त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले अरे काय झालं तुम्ही सारे असे दूर उभे का चला ना त्याची चिंचेवर चढू या खेळूया. राम राम राम नको रे बाबा अरे त्या चिंचेच्या झाडावर एक भूत आहे म्हणे. एक भित्रा आवाज काय चिंचेच्या झाडावर भूत कसं काय काल परवापर्यंत तर तिथे काहीच नव्हतं अचानक एका क्षणी हे कुठून आलं तुम्हाला भूत दिसलं का तुमच्यापैकी कुणी त्या भुताला पाहिले का मित्रांना निर्भय खंबीरपणे विचारत होता.नरेंद्र अरे तुला वेड लागलेलं नाही ना अरे त्या आजोबांनी सांगितले की त्या चिंचेच्या झाडावर भूत आहे.जो कोणी त्या झाडावर चढेल त्यांना भूत धरणार पकडणार एक मित्राने ही माहिती दिली आणि दुसर्‍या क्षणी त्या चिंचेच्या झाडाच्या मालकाची ती युक्ती नरेंद्रच्या लक्षात आली. ही मुलं दर शनिवारी रविवारी दुपारी इथे येतात दंगामस्ती आरडाओरडा करतात म्हणून. मुलांच्या मनात असणाऱ्या भूता यांच्या भीतीचा फायदा घेत या मालकाने काढली काढलेली ती एक युक्ती आहे. हे चाणाक्ष नरेंद्रच्या चटकन लक्षात आले.
मुलांच्या मनातली भुताची भीती दूर करण्यासाठी तो म्हणाला अरे मित्रांनो त्या झाडावर भूत वगैरे काही नाही घाबरू नका मी आहे तुमच्या बरोबर नरेंद्रने त्यांना आधार देण्याचा त्यांना निर्भय बनवण्याचा प्रयत्न केला खरा पण या कल्पनेनेच भूत त्यांच्या मनावर इतका घट्ट बसलो होतो की कोणी पुढे येईना तेव्हा नरेंद्र म्हणाला थांबा तुम्ही नका येऊ कोणी मीच जातो झाडावर चढतो.बघू मला कोणती भूत काय करते.आणि असं नुसतं बोलून नरेंद्र थांबला नाही तो सरळ धावत गेला झाडावर चढला बापरे.आता ते भूत नरेंद्रला धरणार मारणार खाणार ह्या भीतीने कित्येकांनी तर डोळे मिटून घेतले. कोणी रामराम म्हणत किलकिल्या नजरेने नरेंद्र कडे पाहीले. तो काय नरेंद्र चांगल्या झाडावर चढला होता फांद्यांना लोंबकळत होता खेळत होता.छान गाणी म्हणत होता.त्याला भुताने भीती दाखवली नाही. भुताने पकडले नाही. तो चांगला मजेत होता खुशीत होता उलट तोच घाबरू नका कोणी नाही असं पटवून देत होता.
खरोखरच नरेंद्रला काही होत नाही हे लक्षात आल्यावर मुलांच्या मनातली भुताची भीती हळूहळू दूर झाली.एक-दोन-तीन असे करत करत सगळ्या सगळी मुले जमा झाली आणि निर्भय होऊन आनंदाने नाचू खेळू लागली मुलांचा दंगा वाढला झाडाच्या मालकाने मात्र आपली युक्ती फसली म्हणून कपाळाला हात लावला ही गोष्ट जेव्हा आई आली तेव्हा स्वतः नरेंद्र मनात भीतीचे भूत दूर करून त्यांनाही निर्भय केले या गोष्टीचा आईला अभिमान वाटला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या