अभिनंदन पर पत्र
सैन्यात भरती झालेल्या भावाचे गौरव करणारे पत्र लिहा111 गणेश नगर
मुंबई 412204
दिनांक 12 ऑगस्ट 2019
तीर्थस्वरूप दादास,सा.न.वि.वि.
कालच तीर्थस्वरूप विनू मामाचे पत्र आले. त्यांनी तू सैन्यात भरती झाल्याचे कळवले घरातील आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे. आम्ही सर्वजण तुझे मनापासून अभिनंदन करतो.
दादा तुझी अगदी लहानपणापासूनची सैनिक होण्याची महत्त्वाकांक्षा होती. ती आज तू पूर्ण केलीस.आई सांगते की लहानपणी तू खेळणे म्हणून बंदूक हातात घेत असे. आपल्या घरात आजही त्या खेळण्यातल्या अनेक बंदुका आहेत.
लहानपणी तुला शूरवीरांच्या आणि त्यांच्या लढायांच्या गोष्टी ऐकायला आवडत. वाचता येऊ लागल्यावर तु अनेक समरकथांचा फडशा पाडलास. लष्करी शिक्षणा बाबत मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तके वाचून काढली व आठवीनंतर पुण्याच्या शिवाजी मराठा प्रशालेत दाखल झाला. आई बाबांनी ही तुला त्याबाबत कधीही विरोध केला नाही. सैन्य भरतीच्या कामी तुला शालांत परीक्षेत मिळालेले उत्तम यश पूरक ठरले.या पुढील काळातही तुला उत्तम यश मिळो ही माझी मनापासून इच्छा आहे.
गावातील बऱ्याच व्यक्तींना ही बातमी कळली आहे.आणि तुझ्यावर प्रेम करणाऱ्या या मंडळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. मामांनी कळवलेल्या पत्त्यावर हे पत्र पाठवत आहे.तू तिथे स्थिरस्थावर झाल्यावर सविस्तर पत्र पाठव. पुन्हा एकदा तुला भावी काळातील यशासाठी शुभेच्छा आणि आई-बाबांची शुभाशीर्वाद पत्र उत्तर पाठवायला विसरु नकोस.
0 टिप्पण्या