पुठ्ठा व काडी पासून पिंजऱ्यातील पोपट तयार करणे.


 पुठ्ठा व काडी पासून पिंजऱ्यातील पोपट तयार करणे.

साहित्य व साधने: १०×८ सेमीचे पुठ्ठे- २, २५ सेमी ची जाड काडी- १ ,गोल, पेन्सिल, रबर ,रंग ,स्केच पेन इत्यादी.
कृती क्रम:
१) १०×८ सेमी चा एक पुठ्ठा घ्या. या पुठ्ठ्यावर पिंजर्‍याचे चित्र काढा.
२)१०×८ सेमी चा दुसरा पुठ्ठा घ्या. या पुठ्ठ्यावर पोपटाचे चित्र काढा. पोपट अशा बेताने काढा की, तो पिंजर्‍यात बसू शकेल. तो पोपट छान असावा.
३)२०ते२५ सेमी उंचीची एक काठी घ्या. या काठीवर वरील दोन्ही चित्रांची पुठ्ठे चिटकवा .काठीला पुठ्ठे नीट चीकटू द्या. सुकू द्या.
४) ताक करताना रवी जशी घुसळतात तशी काठीचा खालचा भाग तळहातावर घेऊन काठी उलट-सुलट फिरवा .
पहा पोपट पिंजऱ्याच्या आत असल्याचा भास होईल!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या