हस्तपादासन मूळ स्थिती : सावधान.
एक : सावकाश कमरेत वाकून ओणवे व्हा.गुडघे ताठ ठेवा आणि दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.शरीर शिथिल सोडा.
दोन : दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवा. डोके दोन्ही हाताच्या मधून घेऊन गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. गुडघे ताठ ठेवा.
तीन : डोके वर घ्या. दोन्ही हात वर घेऊन गुडघ्यावर ठेवा.गुडघे ताठ ठेवा. शरीर शिथिल करा.
चार : सावकाश उठत उभे राहा.मूळ स्थिती सावधान.
फायदे :
१) मान पाठ खांदे कमर मांड्या व घोट्यांच्या स्नायूंना ताण मिळतो.
२) पोटावर दाब पडल्याने आतील अवयवांची कार्यक्षमता सुधारते.
३) पोट साफ होते.
0 टिप्पण्या