ससोबाचा मुखवटा तयार करणे साहित्य व साधने :वर्तुळ तयार करण्यासाठी चार्ट पेपर ,कात्री/ कटर, चीकटपट्या, रंग -ब्रश , डीक,जाडदोरा इत्यादी.
कृती क्रम:
१) गुलाबी रंगाच्या चार्ट पेपरची 17.5 व्यासाची दोन वर्तुळे कापून घ्या.
२) एका वर्तुळावर चित्रात दाखवल्या प्रमाणे परिघा पासून मध्यबिंदू पर्यंत एक छेद घ्या. एक बाजू दुसऱ्यावर चढवा. त्यानंतर आतील बाजूस चिकटपट्टी कापून घट्ट चिटकवा. अशा तऱ्हेने सशाचे कान तयार करा.
३) पहिल्या वर्तुळावर डोळ्याचे वर्तुळाकृती आकार कापा. त्यानंतर नाक व तोंड रंगवा.
४) दोऱ्या अडकवण्यासाठी दोन्ही बाजूंना भोके पाडा.
५) सशाचे तयार केलेले कान योग्य जागी (चित्रात पहा)घट्ट चिटकवा.
झाला पहा मुखवटा तयार.
0 टिप्पण्या