व्यावहारिक पत्र लेखन (मागणी पत्र)

 मागणी पत्र

वन महोत्सव वृक्षारोपण करण्यासाठी रोपे मागणारे पत्र रजनी प्रधा, विद्यार्थी प्रतिनिधी,शारदा विद्यालय मालेगाव.पुणे 39 येथून वन अधिकारी वन विभाग पुणे 411005 यांना लिहीत आहे.

रजनी प्रधान,
विद्यार्थी प्रतिनिधी,
शारदा विद्यालय,
मालेगाव,
पुणे 413115,
दिनांक 1 जून 2019.
प्रति,
मा. वन अधिकारी,
वन विभाग,
पुणे 411005.
विषय - वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी.
सन्माननीय महाशय,
पुढील महिन्यात येणारा वनमहोत्सव आमच्याही शाळेत साजरा केला जाणार आहे. महोत्सवासाठी शाळांना आपल्या खात्याकडून वृक्षांची रोपे पुरवली जातात असे कळले.आमच्या शाळेलाही अशी रोपे हवी आहेत. त्यासाठी हे पत्र लिहीत आहे. तरी कृपया आपण खालील तपशील आम्हाला पुरवल्यास आभारी राहू.
१) आपण कोणकोणत्या झाडांची रोपे लावण्यासाठी देऊ शकता.
२)साधारणता शाळेला दोनशे रोपे हवी आहेत. ती आपण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात देऊ शकाल का ?
३)या रोपांसाठी शाळेला काही किंमत द्यावी लागेल का ? किंवा आपण शाळांना अशी रोपे विनामूल्य देता का ?
४) रोपे घेण्यासाठी आम्हाला कार्यालयात यावे लागेल की तुम्ही शाळेच्या पत्त्यावर ती पाठवाल.
कृपया वरील सर्व गोष्टींचा खुलासा व्हावा म्हणजे पुढील व्यवस्था करता येईल.हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे.
आपली कृपाभिलाषी,
रजनी प्रधान,
विद्यार्थी प्रतिनिधी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या