वर्तुळ शिवाशिवी पूर्वतयारी :
विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा एक कमी इतकी छोटी छोटी वर्तुळे गोलाकार मार्गावर आखा. प्रत्येक वर्तुळात एक एक विद्यार्थी उभा राहिल.सर्व विद्यार्थ्यांची तोंडे आत असतील.
कृती :
ज्या विद्यार्थ्यांवर राज्य असेल तो विद्यार्थी मोठ्या वर्तुळाभोवती फेरी मारता मारता कोणत्याही एका विद्यार्थ्याला स्पर्श करून पुढे धावेल. स्पर्श केलेला विद्यार्थी लगेचच उलट दिशेने धावेल. दोन्ही विद्यार्थी एकमेकांस जेथे भेटतील,तेथे ते एकमेकांना नमस्कार करून राम राम पाव्हणं म्हणतील. आणि तसेच पुढे पळत जाऊन रिकामे वर्तुळ गाठण्याचा प्रयत्न करतील. जो विद्यार्थी वर्तुळ गाठू शकणार नाही.त्यावर राज्य येईल आणि पुढे चालू राहील.
0 टिप्पण्या