भिंगरी तयार करणे
साहित्य व साधने: पुठ्ठा ,टूथपिक किंवा प्लास्टिक सारख्या माध्यमाचा खेळा, छोटे मणी, कात्री, गोंद इत्यादी.कृतीक्रम:
१)पुठ्ठ्यावर 2 सेमी त्रिज्या चे वर्तुळ काढून ते कापून, त्यांच्या मध्यबिंदूवर छिद्र पाडा.
२)टुथपिक किंवा खिळ्यात प्रथम मोठा मनी ओवून वरील भागावर चिटकवा.
३)पुठ्ठ्याची चकती मन्याच्या खाली खीळ्याच्या मध्यावर आणून चिटकवा.
४)पुन्हा एक छोटा मनी ओवून पुठ्ठ्याच्या चकतीच्या खालच्या बाजूस चिटकवा. (मोन्या ऐवजी कागदाच्या गुंडाळी चा वापर केला तरी चालेल)
५)तयार भिंगरी च्या वरची बाजू बोटात पकडून टोकदार बाजू जमिनीच्या गुळगुळीत पृष्ठभागावर गिरकी दिल्यास भिंगरी गरगर फिरते.
0 टिप्पण्या