व्यावहारिक पत्रे १ (निमंत्रण पत्र)

 


निमंत्रण पत्र 

शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी विज्ञान मंडळाच्या विद्यार्थी प्रतिनिधी नीरज काळे पुणे येथील प्रसिद्ध शास्त्रज्ञ श्री सतीश कुर्लेकर यांना निमंत्रण करत आहे.
नीरज काळे 
विद्यार्थी प्रतिनिधी 
महाराष्ट्र विद्यार्थी मंडळ प्रशाला 
पुणे 411030 
दिनांक 15 मार्च 2005 
मा.श्री सतीश कुर्लेकर,
संचालक,आयुक्त संशोधन संस्था,
पुणे विद्यापीठ,पुणे.
विषय - विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण.
सन्माननीय महाशय,
स.न.वि.वि.
महाराष्ट्र विद्यार्थी मंडळाच्या प्रशालेतील विज्ञान सभेचा मी विद्यार्थी प्रतिनिधी आहे.मी इयत्ता नववीत शिकत आहे. आणि विज्ञान हा माझा आवडता विषय आहे.
आमच्या शाळेत विज्ञानाच्या अध्ययनाला खूप प्रोत्साहन दिले जाते.त्यासाठी विज्ञानावरील विविध पुस्तके आणि वैज्ञानिक उपकरणे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातात.त्यामुळे अनेक विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी शाळेत विविध उपकरणे तयार करत असतात.या कामी आम्हाला आमच्या शिक्षकांचे अमुल्य मार्गदर्शन मिळते.
दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या सुट्टीनंतर आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवले जाते.यंदा प्रदर्शनासाठी 'अशी मात करू या बेकारी वर' हा विषय दिला आहे.दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग करून विद्यार्थिनी लघु उद्योगासाठी विविध उपकरणे बनवली आहेत. त्यांचे प्रदर्शन शाळेत 27 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरवले जाणार आहे.या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यासाठी आपण 27-11-2005 रोजी सकाळी नऊ वाजता आमच्या शाळेत येऊ शकाल का ?
आपण आणि आपल्या आयुका संस्थेविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना खूपच उत्सुकता आहे आणि आपल्या भेटीची तीव्र इच्छा आहे तरी आपण आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आमचे हे निमंत्रण स्वीकारावे अशी नम्र विनंती आहे. आपल्याकडून संमतीचे पत्र आल्यावर शाळेकडून रीतसर निमंत्रण पत्र येईलच. हे पत्रही मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीनेच पाठवत आहे. तसदीबद्दल क्षमस्व.

आपला नम्र
मिरज काळे
विद्यार्थी प्रतिनिधी 
महाराष्ट्र विद्यार्थी मंडळ प्रशाला विज्ञान संघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या